अठरा ते बावीस वर्षे पर्यंत त्याने अनेक कामे केली. रेल्वेचा कंडक्टर म्हणून तो अपयशी ठरला. त्यानंतर तो आर्मीमध्ये भरती झाला. तेथूनही तो सुटला. नंतर तो वकील बनण्यासाठी लॉ स्कूलमध्ये प्रवेश घेण्यासाठी गेला. तिकडेही त्याला प्रवेश नाकारण्यात आला. […]
मोटार कार, दुचाकी, मोटार सायकल चोरीच्या गुन्हयांत विलक्षण वाढ झाली होती. नियमितपणे वर्तमानपत्रांत गाडयाचोरी बाबत बातम्या ठळकपणे प्रसिध्द होत होत्या. मी, त्यावेळी ठाणे शहरात गुन्हे शाखेत नेमणूकीस होतो. सन – १९९८ ते २००० या वर्षांत खंडणी विरोधी पथकात असतांना एका चकमकीमध्ये माझ्या डाव्या हाताला गोळी लागून जखमी झालो होतो. […]
कॉलेजमध्ये एक प्राचार्य मुलांना फिलॉसॉफी शिकवत होते. त्यांनी विद्यार्थ्यांना विचारले “जगात देव आहे काय? तुमची श्रध्दा त्याच्यावर आहे काय?” सगळ्यांनी होकारार्थी माना डोलाविल्या. प्राचार्यांनी पुढचा प्रश्न विचारला “हे जग देवाने निर्माण केले आहे यावर तुमचा विश्वास आहे का? ” विद्यार्थ्यांनी पुन्हा आपला होकार दिला. प्राचार्यांनी विचारले “जगात जी वाईट शक्ती आहे ती ही देवानेच बनविली आहे […]
अब्राहम लिंकन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतरची ही हकीकत आहे. पार्लमेंट सुरु झाले. नव्या अध्यक्षांचे स्वागत करण्यासाठी सदस्यांनी स्वागतपर भाषणे करायला सुरुवात केली. […]
माझे वडील डॉक्टर होते तसेच काँग्रेसचे पुढारीही होते. काही काळ त्यांनी आमदारकीही भूषवली. मीही डॉक्टर होऊन त्यांची जागा घ्यावी आणि आपल्याला शांत मनाने निवृत्त होता यावे अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे नाटकाची आवड असूनही शाळेत कधी अभिनय केला नाही. […]
दक्षिण आफ्रिकेत जेव्हा आर्थिक मंदी आली होती तेव्हाची गोष्ट आहे. गोष्ट मोठी रोचक आहे. सगळेच धंदे जेमतेम चालत होते. अशातच एका हॉटेलमध्ये एक परदेशी पाहुणा आला. त्याने हॉटेल मॅनेजरला एक हजार डॉलर्सची नोट दिली. […]
महाकवी महर्षी वाल्मिकी; ज्यांनी हिंदू संस्कृतीचा प्राण असलेल्या अजरामर रामायण या महाकाव्याची रचना केलेली आहे. त्यांच्या जन्माच्या तारखेची नोंद कुठेही आढळत नाही.प्राचीन भारतात त्रेता युगातील काळात त्यांचा जन्म व निर्वाण केव्हा झाला, या संबंधी निश्चित माहिती आढळत नाही. […]
आपल्या आजबाजूला पाहिलं की आपणच एकटे एवढे शहाणे कसे, असा प्रश्न नेहमीच आणि हमखास पडतो. उदाहरणार्थ पावसाचंच घ्या ना. पावसाळा म्हटलं की अनेकांचा उर नुसता भरुन येतो. जरा चार थेंब पडले की व्हाट्सॲपवर कांदाभजी आणि वाफाळलेल्या चहाच्या कपांचा पाऊस पडतो. […]
चष्मा म्हणजे चाळिशी किंवा चाळिशी म्हणजे चष्मा अशा भ्रमात किंवा संभ्रमात राहण्याचे दिवस आता डस्टबिनमध्ये जमा झालेले आहेत. एकेकाळी चष्मा डोळ्यांवर चढला किंवा केसांत रुपेणी छटा झळकली की आयुष्याचा मध्यांतर जवळ आला, या कल्पनेने हुरहूर दाटून घेत असले. आता आई खेळायला जाऊ देत नाही म्हणून रडणारी मुले सुद्धा चष्म्यात दिसतात. ती चष्मा काढून रडतात आणि रडून झाले की डोळे पुसून पुन्हा चष्मा घालतात. […]