सहा वर्षांचा एक छोटा मुलगा त्याच्या चार वर्षांच्या बहिणीसोबत मार्केटमध्ये गेलेला असतो. ते दोघे बाजार बघत चाललेले असतात. थोड्यावेळाने भावाच्या लक्षात येते की आपत्री बहीण आपल्याबरोबर नाही. तो शोधाशोध करु लागतो. काही अंतर चालल्यावर एका दुकानासमोर त्याची बहीण उभी असलेली त्याला दिसले. […]
दुर्गा भागवतांच्या संशोधनाचे मुख्य क्षेत्र लोकसाहित्याचे. मराठीत भाषांतरित झालेल्या लोकसाहित्याबद्दल दुर्गाबाईंच्या खूप तक्रारी होत्या. मराठीत उत्तम अनुवादकांची वाण तेंव्हाही होतीच. भाषांतरावरून भाषांतरे करणे, संक्षिप्त रुपांतरे करणे, रूपांतर करताना मूळ नावे, स्थळे, घटना इत्यादी बदलून टाकण्याची भ्रष्ट प्रथा महाराष्ट्रात पडली त्याविषयी दुर्गाबाई नाखूष होत्या. या नाखुषीतून त्यांनी आगरकरांच्या हॅम्लेटलाही सोडले नाही. […]
खासदार म्हणून दिल्लीत आल्यानंतर लोकप्रतिनिधीपदाच्या वाढत्या जबाबदारीचे ओझे जाणवत होतेच, शिवाय या नवख्या वातावरणात तसेच अनेक अनुभवी आणि अभ्यासू लोकप्रतिनिधींचा सहवास लाभणार याची हरहूरही होती. तशी इथली जीवनशैली बरीच वेगळी आहे. त्याच्याशी जुळवून घ्यावे लागणार होते. […]
‘व्यवस्थापन’ या विषयावर १९७०च्या दशकानंतर, भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभर गांभीर्याने लक्ष केंद्रित केले जाऊ लागले. मोठमोठ्या औद्योगिक समूहाबरोबरच, मध्यम व लघु उद्योगांनीही सातत्याने नावीन्यपूर्ण, उपाययोजना, कल्पना यांचा समावेश असलेली व्यवस्थापनाची विशिष्ट प्रणाली आपलीशी केली आहे. […]
सलग सहा वेळा एकाच जहाजावर पाठवल्यानंतर कंपनीने मला यावेळी इंडोनेशियात दुसऱ्या जहाजावर पाठवले. जकार्ताहून एक तासाची फ्लाईट पकडुन जांबी या शहरात रात्री हॉटेलला थांबून पहाटे पाच वाजता कंपनीचा एजंट त्याची इनोव्हा घेऊन आला होता. […]
लोकमान्य टिळकांनी ११६ वर्षापूर्वी ज्या उद्देशासाठी सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला तो उद्देश आज किती गणेशोत्सव पार पाडतात हा एक संशोधनाचा विषय होऊ शकतो. बहुतांशी गणेशोत्सव या मुळ तत्वापासून दूर गेले असेल तरी आज ही काही गणेशोत्सव या मुळ उद्देशापासून दूर गेलेले नाहीत. […]
एक राजा होता. त्याला एकच मुलगा. एकुलता एक राजपुत्र म्हणून साहजिकच त्याचे बालपण खूप लाडात गेले. लाड करण्यामुळे त्याच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे तरुणपणीच त्याची प्रकृती बिघडली. काहीही खाल्लेले त्याच्या अंगी लागेना. […]
दररोज सकाळी ऑफिसला आल्या आल्या आमचे वरिष्ठ सहकारी इन्स्पेक्टर चंद्रकांत भोसेकर हे संपूर्ण स्टाफला समोर उभं करून “All’s well” घेत असत. त्या दरम्यान आमच्या गोळे हवालदारांनी शेरू मुंबईत स्पॉट झाल्याबद्दलची खबर दिली. भोसेकर साहेब सावरून बसले. ” कधी समजलं तुला ? “” काल रात्री सर . माझा शेजारी माटुंग्याला डीटेक्शनला आहे . त्याने सांगितलं . […]
बाबांचा (डॉ. बाबा आमटे) परमेश्वरावर विश्वास नव्हता. त्यांनी आपल्या कामातून प्रेरणा देणारे अनेक पर्याय निर्माण केले. अगदी तरुण वयात मी या कामात ओढला गेलो. बाबांच्या मुशीत तयार झाल्याने मीसुध्दा परमेश्वर नावाची कोणी अदृश्य शक्ती आहे ही संकल्पना मानत नाही. […]
व्यवस्थापन म्हणा किंवा सर्वसाधारण प्रचलीत शब्द ‘मॅनेजमेंट’ म्हणा, यात अनेक बाबींचा समावेश होतो. सेल्फ डिसील्पीन म्हणजेच स्वयंशिस्त हा व्यवस्थापन-शास्त्राचा मूळ पाया आहे आणि या पायावरच पुढची व्यवस्थापनशास्त्राच्या माध्यमातून ‘यशाची इमारत’ उभी राहणार आहे. […]