एक प्रवासाने थकलेल्या आईला सांगितले. आई मी बाहेरुन Do not disturb चा बोर्ड लावतो तू रूममध्ये निवांत विश्रांती घे. आईला क्षणभर वाटले घरच्या बेडरुमला असा बोर्ड लावता आला तर किती बरे झाले असते. दोन हॉटेलात रुम सर्व्हिसला चहा ऑर्डर केला. 15 मिनिटे वाट पाहिल्यावर. एका किटलीत दिमाखात चहा आला. किटली छान होती पण चहा मेला गार […]
काल असाच कामानिमित्त घराबाहेर पडलो.कामासाठी वेळ लागणार होता. बराच वेळ घालवूनही वेळ होताच. तेव्हाच रस्त्याच्या बाजूला एक टपरी दिसली.मस्त पातेल्याबाहेर चहाच्या वाफा येताना दिसल्या.चला म्हटलं एक चहा घेऊ या. एकटाच होतो आणि केवळ वेळ घालवायचा होता तशी चहाची वेळ झाली होती. […]
अतिपरीचयाने अवज्ञा झालेली एक मोहक वनस्पती. ऊनपावसाने सतत न्हाऊन सदैव ताजीतवानी असलेली . श्रावणात निसर्गाने धरती रंगवायला घेतली की माळरानांवरील पायवाटांच्या दोन्ही बाजूने तेरड्याच्या भल्या मोठ्या रांगोळ्या पसरायला सुरुवात होते. […]
“ अरे ,पोलिस आला रे पोलीस, पळा पळा पळा” दामूआण्णानं गल्लीत गोट्या खेळत असलेल्या पोरांना जेच आरोळी दिली तशी पोरं चिंगाट ज्याच्या त्याच्या घरी पळू लागली. खाक्या कपडेवाला सायकलला काठी अडकवून आलेला पोलीस पोरं भिंतीच्या आडून पाहू लागली. रामला या गोष्टीचा खूप नवल लागलं. तो त्याच्या मित्रांबरोबर तिथेच दबा धरून आडोशाला उभा होता. दामू अण्णानं दिलेली […]
घरात टी व्ही पहात असताना डोक्यावर भणाणता पंखा असल्याने , पात्रांचे संवाद नीट ऐकू येत नव्हते . मी आवाज मोठा करायला सांगितल्यावर ” अजून ? ” अशी मोठ्ठ्याने सामुदायिक पृच्छा झाली . मी ” हो ” म्हणाल्यावर सर्वांनी एकमेकांकडे पाहून भुवया उंचावल्या . काही दिवसांनी हेडफोनस् लाऊन यू ट्यूब वरची गाणी ऐकत होतो. दरवाज्याची बेल वाजली […]
राजकारण म्हणजे काय? देशावर अथवा देशाच्या एका भागावर सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचे उद्योग. ही अगदी ढोबळ व्याख्या झाली पण सत्ता मिळवण्याचे प्रयत्न नक्कीच राजकारणाचा केंद्रबिंदू असतो. लोकशाहींत ही सत्ता मिळवायची तर निवडणुका आल्या पक्ष आले. […]
मुंबईत बोरिवली पश्चिमेला राहणाऱ्या माझ्यासारख्या असंख्य सिनेमाभक्तांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय म्हणजे एकेकाळी फुलांनी सजवलेला हाऊसफुल्लचा बोर्ड दिमाखात मिरवणारी आमची चित्रमंदिरे म्हणजेच अजंठा, डायमंड आणि जया सिनेमा ह्यावर काहीतरी लिहूया असा विचार गेले अनेक महिने डोक्यात फिरत होता. मात्र त्या लिखाणासाठी कुठलीच मूलभूत आणि जुजबी माहिती ना माझ्याजवळ होती ना गूगलबाबांकडेदेखील. नुकताच बोरिवलीला जाण्याचा योग जुळून आला होता. […]
उंच झाडावरून तयार नारळ खाली जमिनीवर पडला तरी आतील ” बीज ” सुखरूप राहावे म्हणून चवडांचं भक्कम आवरण त्याचं संरक्षण करतं आणि पाण्यात पडला तरी पाण्याच्या तळाशी न जाता त्या नारळाला तरंगत असतानाही कोंब फुटतो. निसर्ग अगाध आहे. […]
बालपणी धाडशी असलेले समर्थ आठव्या वर्षी ‘चिंता करितो विश्वाची’ असे आईस म्हणाले. पुढे त्यांनी संसाराचा मोहत्याग करून तापी नदीकाठी बारा वर्ष श्री ‘राम मंत्र आणि गायत्री पुरश्चरण’ कठोर तपस्या करून, आसेतु हिमाचल पायी प्रवास केला असे सांगितले. […]
२००९ साली माझ्या फार्मवर पहिली गाय आणली गेली. नंदिनी तिचे नांव. खिलार जातीची , देखण्या लांब शिंगांची, शुभ्र पांढरी , उंच , निळ्या डोळ्यांची आणि फार डौलदार. फार्मची शान होती ती. […]