या फेसबुक आणि व्हाट्सअपमध्ये पब्लिक फारच गुंतलेय असं तुम्हाला वाटतं ना? मलाही तसंच वाटतं.’ नुसतं वाटून काय उपयोग काहीतरी करायला पाहिजे!’ असं भाषणात म्हणतात ना ते खरच आहे. मग ठरवलं या सगळ्या दोस्ताना फेसबुक व्हाट्सअप वरून उठवायचं आणि चांगले गेट-टुगेदर करायचं. दोस्तांचा ग्रुप परत जमवायचा. लागलो कामाला. पक्या, दिल्या, उम्या, सूर्या टाकले मेसेज व्हाट्सअप वर एकेकाला. […]
चार दिवसापासून भाऊ कदम आणि ओंकार भोजने या जोडीला पाकिटात घेऊन फिरत होतो म्हणजेच नाटकाचे तिकीट घेवून हो….दिवस उजाडला… संध्याकाळी ७ लाच ऑफिस मधून कल्टी मारली….दोन घास खावून पोरा बाळांना घेऊन नाट्यगृहाच्या गेटवर गाडी लावून दाराशी हजर…. गेटवाला भाऊ (भाऊ कदम नव्हे) बोलला…भाऊ नाटक गह्यरे उशिरा सुरू झाले…तुम्ही या फिरीसन…झाले एक तास काय करू सगळे… यू […]
यंदाच्या वर्षी पाऊस पाणी दरसालापेक्षा चांगलं आलेलं. सावित्री आणि तिचा नवरा सुखदेव दोघे आनंदाच्या भरात नेहमीपेक्षा जास्त जोमाने शेतात राबत होते. एक वेगळाच उत्साह तिच्या हालचालीत जाणवत होता कारण सावित्रीच्या घरी यंदा बाळकृष्णाचं आगमन झालेलं. तिच्या दीड च वर्षाच्या कान्होबाला घेऊन ती शेतात जायची. दिवसभर शेतात झाडाला झुला बांधून त्यात त्याला झोपवायची. त्याचवेळी घरची उरलेली कामं देखील तिच्या डोक्यात पिंगा घालत असायची. सुखदेव तर बिचारा भरून पावला होता. […]
विजय सोफ्यावर बसून पेपर वाचत असतो इतक्यात दारावरची बेल वाजते तो पेपर समोरच्या टेबलावर ठेऊन पुढे होत दरवाजा उघडतो तर दरवाजात रमेश उभा असतो त्याला आत घेताच… […]
गोविंदराव पटवर्धन यांचा जन्म २१ सप्टेंबर १९२५ रोजी गुहागर जवळ असलेल्या अडूर या कोकणातल्या गावी , त्यांच्या आजोळी झाला. ते १९३० च्या सुमारास मुंबईला आले . त्यांचे शिक्षण मुबईतील आर्यन एज्युकेशन स्कुलमध्ये झाले. १९४२ साली मॅट्रिक झाल्यानंतर ते १९४७ साली पोलीस खात्यात नोकरीला लागले. उपजिवेकेसाठी त्यांनी पोलीस खात्यात नोकरी केली परंतु त्यांची खरी निष्ठा संगीतावरच होती. […]
एक प्रवासाने थकलेल्या आईला सांगितले. आई मी बाहेरुन Do not disturb चा बोर्ड लावतो तू रूममध्ये निवांत विश्रांती घे. आईला क्षणभर वाटले घरच्या बेडरुमला असा बोर्ड लावता आला तर किती बरे झाले असते. दोन हॉटेलात रुम सर्व्हिसला चहा ऑर्डर केला. 15 मिनिटे वाट पाहिल्यावर. एका किटलीत दिमाखात चहा आला. किटली छान होती पण चहा मेला गार […]
काल असाच कामानिमित्त घराबाहेर पडलो.कामासाठी वेळ लागणार होता. बराच वेळ घालवूनही वेळ होताच. तेव्हाच रस्त्याच्या बाजूला एक टपरी दिसली.मस्त पातेल्याबाहेर चहाच्या वाफा येताना दिसल्या.चला म्हटलं एक चहा घेऊ या. एकटाच होतो आणि केवळ वेळ घालवायचा होता तशी चहाची वेळ झाली होती. […]
अतिपरीचयाने अवज्ञा झालेली एक मोहक वनस्पती. ऊनपावसाने सतत न्हाऊन सदैव ताजीतवानी असलेली . श्रावणात निसर्गाने धरती रंगवायला घेतली की माळरानांवरील पायवाटांच्या दोन्ही बाजूने तेरड्याच्या भल्या मोठ्या रांगोळ्या पसरायला सुरुवात होते. […]
“ अरे ,पोलिस आला रे पोलीस, पळा पळा पळा” दामूआण्णानं गल्लीत गोट्या खेळत असलेल्या पोरांना जेच आरोळी दिली तशी पोरं चिंगाट ज्याच्या त्याच्या घरी पळू लागली. खाक्या कपडेवाला सायकलला काठी अडकवून आलेला पोलीस पोरं भिंतीच्या आडून पाहू लागली. रामला या गोष्टीचा खूप नवल लागलं. तो त्याच्या मित्रांबरोबर तिथेच दबा धरून आडोशाला उभा होता. दामू अण्णानं दिलेली […]
घरात टी व्ही पहात असताना डोक्यावर भणाणता पंखा असल्याने , पात्रांचे संवाद नीट ऐकू येत नव्हते . मी आवाज मोठा करायला सांगितल्यावर ” अजून ? ” अशी मोठ्ठ्याने सामुदायिक पृच्छा झाली . मी ” हो ” म्हणाल्यावर सर्वांनी एकमेकांकडे पाहून भुवया उंचावल्या . काही दिवसांनी हेडफोनस् लाऊन यू ट्यूब वरची गाणी ऐकत होतो. दरवाज्याची बेल वाजली […]