ज्याचे कुणी नसते त्याचा हिंदी सिनेमा असतो. स्वतःच्या घरापेक्षाही थिएटरच्या अंधाऱ्या घरात जास्त सहजतेने वावरणाऱ्या,तेथील मिट्ट काळोखात आपल्या मनातील काळोख बेमालूमपणे मिसळणाऱ्या आणि समोरच्या चौकोनी सेल्युलॉइडच्या तुकड्यावर जीव लावणाऱ्या कडव्या पण असंघटित फिल्लमबाजांचा शिरीष कणेकर हे बुलंद आवाज होते.
‘आम्ही शिर्डीला जाणाऱ्यांना हसत नाही. […]
मी एक गरीब सेवानिवृत्त बँक अधिकारी आहे. मी माझ्या पत्नीसह काही दिवस रत्नागिरीतील आमच्या मूळ गावी जायचे ठरवले. आम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी आहेत,मुलीचे लग्न झाले आहे आणि ते ती कुटुंबासह दूरच्या शहरात राहतात. […]
त्यानं दिलेल्या उपम्याची चव अजून जिभेवर रेंगाळत होती . तिला वाटलं , अजून थोडा उपमा हवा होता पोट भरण्यासाठी नाही , केवळ चवीसाठी . तिनं इकडे तिकडे पाहिलं . ट्रेनमध्ये बऱ्यापैकी गर्दी होती . बहुतेक सगळ्यांच्या हातात त्यानं दिलेल्या उपम्याच्या डिश दिसत होत्या . आणि सगळे चवीनं खात होते . ” उपमा विकणारा गेला का पुढच्या […]
क्रिकेटच्या मैदानात किंवा मैदानाबाहेर क्रिकेटबाह्य कारणांसाठी गाजलेल्या खेळाडूंची संख्या काही कमी नाही.
एक दिवसीय सामन्यात न्यूझीलंडला शेवटच्या चेंडूवर सहा धावा हव्या असताना,कर्णधार व आपला वडीलभाऊ ग्रेग चॅपलच्या आदेशावरुन (मी माझ्या दिड वर्षाच्या नातवाला टाकतो तसा) ट्रॅव्हर चॅपलने फलंदाजाला सरपटी चेंडू टाकला होता. […]
सत्य मिथ्या ऐसें कोणें। निवडावें। सत्य म्हणों तरी नासे। मिथ्या म्हणों तरी दिसे ।। बाळाच्या जन्मवेळी आणि पुढे प्रत्येक वर्षी साजऱ्या होणाऱ्या वाढदिवसाच्या समयी… तसं पाहिल तर या संपूर्ण विश्वात आपली ग्रहमाला मग पृथ्वी, नंतर सजीवप्राणी, तद्नंतर चौऱ्यांशी लक्षयोनी या सर्वातून सजीव मानव मग बुद्धीयुक्त व्यक्ती बरोबरीने सधनता, सक्षमता या मुख्य पात्रता फेऱ्या पार केल्यास आपसूकच […]
डेव्हिड हा केवळ पत्रकारच नव्हता. तो वृत्तपत्र कर्मचारी संघटनेचा अध्यक्षही होता. निदर्शक दडपशाही विरोध-कृती मोहिम ठरविण्यासाठी दारेसालाम या राजधानीपासून पाचशे किलोमीटर वर असलेल्या या खेड्यात जमले होते. […]
स्थळ : १० वी ‘ब’ वर्गाचा पहिलाच दिवस.बालमोहन विद्यामंदिर,दादर, मुंबई. काळ : (पालकांनी आडून आडून सुचविल्याप्रमाणे) गांभीर्याने घेण्याजोगा. वेळ : १३ जून १९७७, सकाळी १०.४२. प्रवेश पहिला : (वर्गात गलबला. एखाद्या धीरोदात्त नायकाप्रमाणे मराठेसर वर्गात प्रवेश करतात आणि वर्गातील कुजबुज आपोआपच कमी कमी होत वर्गात संपूर्ण शांतता पसरते.) मराठेसर पाच मिनिटे ‘राष्ट्राच्या खऱ्या संपत्ती’समोर स्वागत आणि […]