राजकारण म्हणजे काय? देशावर अथवा देशाच्या एका भागावर सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचे उद्योग. ही अगदी ढोबळ व्याख्या झाली पण सत्ता मिळवण्याचे प्रयत्न नक्कीच राजकारणाचा केंद्रबिंदू असतो. लोकशाहींत ही सत्ता मिळवायची तर निवडणुका आल्या पक्ष आले. […]
मुंबईत बोरिवली पश्चिमेला राहणाऱ्या माझ्यासारख्या असंख्य सिनेमाभक्तांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय म्हणजे एकेकाळी फुलांनी सजवलेला हाऊसफुल्लचा बोर्ड दिमाखात मिरवणारी आमची चित्रमंदिरे म्हणजेच अजंठा, डायमंड आणि जया सिनेमा ह्यावर काहीतरी लिहूया असा विचार गेले अनेक महिने डोक्यात फिरत होता. मात्र त्या लिखाणासाठी कुठलीच मूलभूत आणि जुजबी माहिती ना माझ्याजवळ होती ना गूगलबाबांकडेदेखील. नुकताच बोरिवलीला जाण्याचा योग जुळून आला होता. […]
उंच झाडावरून तयार नारळ खाली जमिनीवर पडला तरी आतील ” बीज ” सुखरूप राहावे म्हणून चवडांचं भक्कम आवरण त्याचं संरक्षण करतं आणि पाण्यात पडला तरी पाण्याच्या तळाशी न जाता त्या नारळाला तरंगत असतानाही कोंब फुटतो. निसर्ग अगाध आहे. […]
बालपणी धाडशी असलेले समर्थ आठव्या वर्षी ‘चिंता करितो विश्वाची’ असे आईस म्हणाले. पुढे त्यांनी संसाराचा मोहत्याग करून तापी नदीकाठी बारा वर्ष श्री ‘राम मंत्र आणि गायत्री पुरश्चरण’ कठोर तपस्या करून, आसेतु हिमाचल पायी प्रवास केला असे सांगितले. […]
२००९ साली माझ्या फार्मवर पहिली गाय आणली गेली. नंदिनी तिचे नांव. खिलार जातीची , देखण्या लांब शिंगांची, शुभ्र पांढरी , उंच , निळ्या डोळ्यांची आणि फार डौलदार. फार्मची शान होती ती. […]
१९९९ मधे माझे धुळ्याला पोस्टिंग असतानाचा असाच एक हृद्य अनुभव. उन्हाळ्याचे दिवस होते. रात्री ८.३० वाजता सुद्धा डांबरी रस्ता तापलेला. मी धुळे शहरातून स्टाफसह night round दरम्यान नरडाणा मार्गे शिरपूरकडे निघालो होतो. […]
काही लोकांना त्यांच्या शिक्षणाचा त्यांच्या पदाचा, दिसण्याचा किंवा त्यांच्या आर्थिक परिस्थीतीचा ॲटीट्युड असतो ज्यातून त्यांची वृत्ती किंवा त्यांचा दुसऱ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन दिसून येतो ज्यामुळे अशी लोकं आपल्या आयुष्यात पुन्हा येऊच नयेत असं मला वाटायचं. शेवटी जिद्द आणि चिकाटी सोबतच कोणाच्या ॲटीट्युडला कशासाठी आणि किती महत्व द्यायचे हे तर आपल्याच हातात आहे. […]
शुभा आणि शाम बड़ोदा सोडून मुंबईत स्थाईक झाले. दोघांचा राजा राणीचा संसार सुरु झाला. दोघही आपल्या आई वडिलांची एकुलत एक अपत्य होती. दोघांची घर बडोद्याच्या दोन टोकाला होती. […]
१७ व्या मजल्या वरील गच्चीच्या अठरा फूट उंचीच्या वीस वर्ष जुन्या ग्रीलच्या गंजलेल्या शिगा घासून साफ करणे , जास्त गंजलेले आडवे पाइप कापून काढणे , नवीन पाईप वेल्डिंग करून बसवणे आणि सगळ्याच ग्रील्स प्रथम प्रायमर मारून नंतर रंगवणे इत्यादी अत्यावश्यक कामे पावसाळ्यापूर्वी करून घेण्यासाठी अनेक स्थानिक फॅब्रिकेटर्सना मी संपर्क केला होता . […]
मराठी विज्ञान परिषदेच्या ‘पत्रिका’ या मासिकातील द. व्यं. जहागीरदार यांची ही पूर्वप्रकाशित कथा स्वागत कक्ष स्त्री-पुरुषांनी भरून गेला होता. एकही खुर्ची रिकामी नव्हती. सरांनी उभे राहणेच पसंत केले. कागदाच्या कपट्यावर स्वत:चे नाव लिहिले. निवृत्त प्रोफेसर, बीड असा पत्ता लिहिला. “साहेब, दोन-तीन तास थांबावं लागेल. आतसुद्धा सर्व खुर्च्या भरल्या आहेत.” गेटमन म्हणाला. तो चिठ्ठी घेऊन आत गेला […]