साहित्य
विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…
ड्रग्जच्या विळख्यात होस्टेल १
निवांतच्या दरवाजाची बेल वाजली आणि सदूने दार उघडले. दोन प्रौढ गृहस्थ बाहेर उभे होते. सदूने त्यांना विचारले, “अपोंटमेंट आहे कां तुमची ?” सोफ्यावर बसलेले यशवंत हंसले आणि म्हणाले, “सदू पाहुण्यांच स्वागत आपण असं करतो कां ? येऊ दे त्यांना आंत.” दोघेही आंत आले. दोघे लांबून प्रवास करून आलेले वाटत होते. थकलेले दिसत होते. यशवंत त्यांना म्हणाले, […]
परण्या निघालो रे
असं काय माहित ऐन टाईमला मला टाय बांधता येणार नाही अन् तसं माहित असतं तर तो मी बस्त्यात घेतलाच नसता. मी सुटा बुटातले कपडे नेसून बराच वेळ झाला तयार होतो पण ती गळ्यातली लांब दोरी कधी आयुष्यात बांधण्याचा प्रसंग आलाच नव्हता म्हणून बराच सावळा गोंधळ उडाला! […]
खेड्यातले येडे
लहानपणापसुन गण्या खेड्यातच राह्यलेला आसते.त्यालं त्या खेड्याच्या बाहिरच कायबी माहीत नसते…….त्यानं आयुष्यात कव्हा त्याच्या गावच्या बाहिर गेलेला नसते.गण्या नेमकाच मॅट्रिक पास झालता.त्याच्या गावातले बरेच जनं मॅट्रीकनंतर शहरात कामधंद्यासाठी जायाचे,पिर्या,मव्हण्या,सुरश्या,संज्या,ज्ञान्या आसे बरेचजनं मॅट्रीकनंतर शहरात गेलते.ते गावाकडं आले कि शहरातल्या लय गप्पा टप्पा सांगायचे.शहरातले लोकं आसे राहतातं,तसे राहतातं. […]
वाढदिवस आणि जन्मोत्सव
लहानपणा पासूनच प्रत्येकाला आपल्या वाढदिवसाचं एक कौतुक आणि नावीन्य असत तो दिवस म्हणजे फक्त आपल्या साठी साजरा केला जाणार याची अपूर्वाई असते . आमच्या लहानपणी ती असायची पण अगदी साध्या सरळ पद्धतीने म्हणजे ज्या कोणाचा वाढदिवस असेल त्या दिवशी बाबा आम्ही आबा म्हणतो ते पेढे घेऊन यायचे ते आणले कि संध्याकाळचं देवाची दिवाबत्ती व्हायची मग स्तोत्र जप झाला कि बाबा देवाजवळ पेढे ठेवून पहिला पेढा ज्याचा वाढदिवस त्याला भरवायचे . […]
पुडिंग (अलक)
विद्या सकाळी उठली. श्वेताला उठवलं.श्वेता ९ वर्षांची तिची गोड मुलगी.श्वेता ब्रश करुन आंघोळीला गेली आणी विद्या किचनमधे आली तिचा डबा करायला.ओट्यावर पोळ्यांचा डबा दिसला आणी तिला आठवलं ,काल रात्री पोळ्या उरल्या आहेत. […]
बालपणीचे कुतुहल
वाडीतून धूळ उडवत चाललेल्या एस.टी.बसच्या मागे धावण्यात एक वेगळीच मज्जा वाटायची.बालमनाला तो आनंद वाटायचा. आमचं अभेपुरी नजीक पाचपुतेवाडी गाव तसं डोंगराळ भागात वसलेलं, आमच्या अभेपुरी खोऱ्यातील शेवटचं गाव. त्यातच पावसाचं प्रमाण अधिक असल्याने चार महिने पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने रस्ते, पूल वाहून जायचे. […]
ठकास महाठक
देसाईआजोबांनी जोऱ्यात फोन आपटला . रागानी ते अगदी हिरवे पिवळे पडले होते , टकलाला घाम आला होता , त्यांनी हाताशीच असलेल्या टॉवेलनी टकालाचा घाम पुसल्यावर टकलाला आधीच्या पेक्षा जास्त केस चिकटलेले वाटले तेंव्हा लक्षात आले कि तो त्यांच्या मनीचा बसायचा टॉवेल होता . […]
भाकित
तसं पाहिलं तर रभाजीच्या विहिरीला जेमतेमच पाणी होतं. यावर्षी बऱ्याच दिवस पावसानं दडी मारल्यामुळे गावातल्या सगळ्या शेतकऱ्यांची पंचायत झाली होती. जून महिना संपत आला तरी काळे ढग तोंड दाखवायला तयार नव्हते. त्यानं अन् रखमीनं सगळं यावर्षीच बी भरान कधीच तयार करून ठेवलं होतं फक्त त्यांना पावसाची वाट होती. […]
गुलामांची उदारकर्ती हॅरीएट टबमन
एकोणिसाव्या शतकात अमेरिकेत आफ्रिकेतील कृष्णवर्णीयांना किंवा निग्रोंना गुलाम म्हणून विकत घेऊन राबविण्याची कुप्रसिद्ध समाजपद्धती होती. […]