लग्न ठरलंय, तारीख ठरली, वेळ ठरली, स्थान ठरलंय ना… मग बस्स. हाच माहितीवजा एसएमएस तयार करा अन् धाडा आपल्या गणगोताला, मित्रांना. एवढेच नाही. व्हॉट्स अॅपवरही मस्त वधू-वरांचे छायाचित्र घ्या आणि त्यांखाली हाच मजकूर लिहा अन् करा की तुमच्या ग्रुपला सेण्ड. […]
माझे वडील बडोदा संस्थानमध्ये फडणीस (आजच्या भाषेत कारकून) होते. तेथील शाळेमध्ये मराठी शिकवणारे शिक्षक कविता फार रंगवून सांगत असत. कोणत्याही साहित्यिकाच्या दृष्टीने शालेय जीवनातील मराठीचा अभ्यास फार नि्णयिक ठरत असतो. […]
इंग्लंडच्या गरटूड बेल या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची ओळख आपण स्वतःला कशी करून द्यावी, असा प्रश्न मला पडतो. जगप्रवासी, राजकारणपटू, मानववंशशास्त्रज्ञ, कवयित्री, भाषातज्ज्ञ, गिर्यारोहक, फोटोग्राफर आणि ‘लॉरेन्स ऑफ अरेबियन’ची म्हणजे टी.ई. लॉरेन्स याची हितचिंतक आणि त्याला वैचारिक बळ व दिशा देणारी त्याची मैत्रीणही ती होती! […]
चिणक्या,गोल्या,रवी आन चेंड्या लहानपणापसुनच जिगरी दोस्तं व्हते.एकाच वयाचे अन एकाच शाळतं शिकल्यान तेह्यचा दोस्ताना आंजुकच घट्ट झाला व्हता.ते चौघबी लयच ईपितर व्हते.काम धंदा त काय करायचे नाही पण घरच्यायच्या जिवावरं मस्तपैकी जगुन दिसभर गावात काड्या करत हूंदडायचे.नको तिथं नाक खुपसण्याच्या तेह्यच्या सलयीधं सगळं गाव परेशान व्हतं.एकदिवस आसचं चौघं दोस्त पारावर बसले व्हते.लय दिवसाचं तेह्यच्या जिवनात एंजायमेंटच […]
आपण एखाद्या व्यक्तीला मदत केली. याचा अर्थ आपण मोठे होत नाही. आपण फक्त माध्यम असतो. कर्ता करविता तोच आहे. त्याने मनात आणले तर तो काहीही करू शकतो. कारण तो साक्षात परमेश्वर असतो. त्याची इच्छा नसेल तर या भूतलावर झाडाचे एक पान पण हलू शकत नाही. […]
निवांतच्या दरवाजाची बेल वाजली आणि सदूने दार उघडले. दोन प्रौढ गृहस्थ बाहेर उभे होते. सदूने त्यांना विचारले, “अपोंटमेंट आहे कां तुमची ?” सोफ्यावर बसलेले यशवंत हंसले आणि म्हणाले, “सदू पाहुण्यांच स्वागत आपण असं करतो कां ? येऊ दे त्यांना आंत.” दोघेही आंत आले. दोघे लांबून प्रवास करून आलेले वाटत होते. थकलेले दिसत होते. यशवंत त्यांना म्हणाले, […]
असं काय माहित ऐन टाईमला मला टाय बांधता येणार नाही अन् तसं माहित असतं तर तो मी बस्त्यात घेतलाच नसता. मी सुटा बुटातले कपडे नेसून बराच वेळ झाला तयार होतो पण ती गळ्यातली लांब दोरी कधी आयुष्यात बांधण्याचा प्रसंग आलाच नव्हता म्हणून बराच सावळा गोंधळ उडाला! […]
लहानपणापसुन गण्या खेड्यातच राह्यलेला आसते.त्यालं त्या खेड्याच्या बाहिरच कायबी माहीत नसते…….त्यानं आयुष्यात कव्हा त्याच्या गावच्या बाहिर गेलेला नसते.गण्या नेमकाच मॅट्रिक पास झालता.त्याच्या गावातले बरेच जनं मॅट्रीकनंतर शहरात कामधंद्यासाठी जायाचे,पिर्या,मव्हण्या,सुरश्या,संज्या,ज्ञान्या आसे बरेचजनं मॅट्रीकनंतर शहरात गेलते.ते गावाकडं आले कि शहरातल्या लय गप्पा टप्पा सांगायचे.शहरातले लोकं आसे राहतातं,तसे राहतातं. […]
लहानपणा पासूनच प्रत्येकाला आपल्या वाढदिवसाचं एक कौतुक आणि नावीन्य असत तो दिवस म्हणजे फक्त आपल्या साठी साजरा केला जाणार याची अपूर्वाई असते . आमच्या लहानपणी ती असायची पण अगदी साध्या सरळ पद्धतीने म्हणजे ज्या कोणाचा वाढदिवस असेल त्या दिवशी बाबा आम्ही आबा म्हणतो ते पेढे घेऊन यायचे ते आणले कि संध्याकाळचं देवाची दिवाबत्ती व्हायची मग स्तोत्र जप झाला कि बाबा देवाजवळ पेढे ठेवून पहिला पेढा ज्याचा वाढदिवस त्याला भरवायचे . […]
विद्या सकाळी उठली. श्वेताला उठवलं.श्वेता ९ वर्षांची तिची गोड मुलगी.श्वेता ब्रश करुन आंघोळीला गेली आणी विद्या किचनमधे आली तिचा डबा करायला.ओट्यावर पोळ्यांचा डबा दिसला आणी तिला आठवलं ,काल रात्री पोळ्या उरल्या आहेत. […]