वाडीतून धूळ उडवत चाललेल्या एस.टी.बसच्या मागे धावण्यात एक वेगळीच मज्जा वाटायची.बालमनाला तो आनंद वाटायचा. आमचं अभेपुरी नजीक पाचपुतेवाडी गाव तसं डोंगराळ भागात वसलेलं, आमच्या अभेपुरी खोऱ्यातील शेवटचं गाव. त्यातच पावसाचं प्रमाण अधिक असल्याने चार महिने पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने रस्ते, पूल वाहून जायचे. […]
देसाईआजोबांनी जोऱ्यात फोन आपटला . रागानी ते अगदी हिरवे पिवळे पडले होते , टकलाला घाम आला होता , त्यांनी हाताशीच असलेल्या टॉवेलनी टकालाचा घाम पुसल्यावर टकलाला आधीच्या पेक्षा जास्त केस चिकटलेले वाटले तेंव्हा लक्षात आले कि तो त्यांच्या मनीचा बसायचा टॉवेल होता . […]
तसं पाहिलं तर रभाजीच्या विहिरीला जेमतेमच पाणी होतं. यावर्षी बऱ्याच दिवस पावसानं दडी मारल्यामुळे गावातल्या सगळ्या शेतकऱ्यांची पंचायत झाली होती. जून महिना संपत आला तरी काळे ढग तोंड दाखवायला तयार नव्हते. त्यानं अन् रखमीनं सगळं यावर्षीच बी भरान कधीच तयार करून ठेवलं होतं फक्त त्यांना पावसाची वाट होती. […]
सुमारे चाळीस वर्षांपुर्वीची गोष्ट..१९८१ साल असावं.मी पाचवी -सहावीत असेन.बहीण माझ्यापेक्षा बरीच मोठी.ती कॉलेजात होती. बहीण माझं रोल मॉडेल..ती जे करेल ते करायचं एवढीच त्या वयात अक्कल होती.त्यामुळे तिची पाठ मी सोडत नसे. ती कुठे जातेय या सुगाव्यावर मी असे..अन् तिला मात्रं त्या वयात मला घेऊन जायला लाज वाटायची..त्यांच्या त्या फुलपाखरीवयातल्या रेशमी गप्पागोष्टींत माझा अडसर व्हायचा.त्यामुळे ती […]
माणसाला स्वप्ने पडत असल्याची नोंद ५००० वर्षांची तरी आहे. आधीही पडत होतीच असतील. जंगलात रहाणाऱ्या माणसालाही स्वप्ने पडत होतीच असतील की. कारण स्वप्न माणसाला आपोआप पडतात. कांही करावचं लागत नाही. अर्थात किमान झोपावं लागतेच म्हणा. तर ह्या आपोआप पडणाऱ्या स्वप्नांना तो आदिमानव कसा सामोरा गेला असेल ? घाबरला असेल ? त्याची स्वप्ने कशी असतील ? […]
नोव्हेंबर चे कालनिर्णय चे पान उलटले आणि चाहूल लागली ती माझा पन्नाशीचा उंबरठा ओलांडण्याची. Age is जस्ट a number, all is in your mind.. असं अनेकदा ऐकलेलं असतं आणि ते खरं आहे. तरीही मागे वळून पाहिलं की आपलाच प्रवास आपण कसा केला याचं चित्र समोर उभं राहतं. अनेक आनंदाचे क्षण, यशाची शिखरे, संघर्ष आणि काय असतं […]
अमेरिकेत एप्रिलमध्ये “ड्रायव्हिंग आणि टेक्स्टिंग वीक (driving and texting week)” पाळला जातो. यासंबंधी मुलाने माहिती दिली ती फार उद्बोधक असल्याने आणि मी ती आपल्यापर्यंत पोहोचवावी असे त्याने सुचवल्याने इथे लिहीत आहे. […]
महाभारत पाहणं हा लहानपणी हृद्य सोहळा असायचा… त्या वेळेत भूक लागली म्हणायची बिशाद नव्हती… आजी लोक सॉलिड बडवत. रस्त्यांवर शुकशुकाट सगळे tv समोर …साधारण अर्धा तास आधी प्रक्रिया सुरू व्हायची. घरावर भले मोठे अँटीना नावाचे विमानसदृश्य उपकरण असायचे….काका /दादा पैकी कुणाला तरी वर चढवून ते adjust करावे […]