इतरांप्रमाणे माझ्या मनात एक दिवस आत्महत्येचा विचार आला.आत्महत्येचा कोणता प्रकार निवडावा या विवंचनेत मी होतो.आत्महत्येची तीव्रता कमी होण्या अगोदर निर्णय होणे आवश्यक होते. नसता विचार बदलू शकतो.तीव्रता हेच यशाचे गमक आहे हा सुविचार देखील या निमित्ताने जन्माला आला. […]
जहाजावर सहकाऱ्यांकडून (बऱ्याच वेळा पदाने वरिष्ठ) खाण्याच्या बाबतीत नेहमी येणारा अनुभव आणि एका स्टेशनवर पाहिलेल्या एका प्रसंगातील विरोधाभास. जहाजावर महिन्याला हजारो डॉलर्स किंवा एका हाताची पाचही बोटं मोजायला कमी पडावीत एव्हढे लाख रूपये पगार घेणारे सहकाऱ्यांची कीव वाटावी आणि वयाची एंशी ओलांडलेल्या एका गरीब आजीच्या हातातील घास पाहून मन हेलावणारा प्रसंग. शेळ्या मेंढ्या आणि गुर ढोरं गवत झाडाचा पाला आणि राखण नसलेल्या शेतातील भाजीपाला पीकं खातात. […]
जाणार्या वर्षाला निरोप देताना नवीन वर्षाला आनंदाने सामोरं जाताना , या वर्षांत जे जे धन आपण गमावलं ( माझ्यालेखी धन म्हणजे ही अमूल्य अशी माणसं! ) ते जरूर आठवा , त्यांच्या घरच्यांसाठी दोन हात परमेश्वरापाशी जोडा आणि म्हणा : Happy New Year ! […]
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती महामंडळाने मराठी ग्रंथांच्या अनुवादासाठी प्रोत्साहन देण्याचे ठरवले आहे. अर्थात, राज्याच्या सांस्कृतिक धोरणाचा एक भाग म्हणून ही महत्त्वाकांक्षी योजना पूर्ण करण्याचे निर्देश शासनाने मंडळास दिले आहेत. त्यानुसार, ‘मराठीतील उत्तम साहित्यकृती अन्य भारतीय भाषांमध्ये विशेषतः हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये अनुवादित होण्यासाठी उपक्रम राबविले जातील. […]
“एक वेळ पोलीस होऊन पहा, मग त्याची काय अवस्था असते, त्याचा अनुभव येईल. ” मी जीव तोडून सांगत होतो, पण समोरचा ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याचा एकच हेका होता, “साहेब तुम्ही मला मुर्ख समजता का? बावळट समजता? आम्ही तुमच्याकडे तक्रार घेउन येतो आणि तुम्ही आम्हालाच ज्ञान शिकवता? मी शांतपणे हाताची घडी घालून ऐकत होतो. मी, माझ्यातील पोलिसाला […]
गेले चार दिवस मुंबईतील कमलाबेन हॅास्पिटल चुकीच्या कारणासाठी पेपरांत गाजत होतं. हॅास्पिटलच्या प्रसूती विभागातून तीन दिवसांच बाळ गायब झालं होतं. तिथल्या नर्स, मेट्रन, डॅाक्टर, ह्या त्याबद्दल कांहीच सांगू शकत नव्हत्या. हॅास्पिटल मोठ्या उद्योगपतीचे असल्यामुळे प्रथम त्यांनी ही बातमी दाबून टाकण्याचा प्रयत्न केला गेल्याचा आरोपही हॅास्पिटल मॅनेजमेंटवर होत होता. […]
सर्वसामान्य भारतीयांना असते तसे अमेरिकेचे आकर्षण मलाही होते. पण आजवरचा सारा प्रवास विमानाने झालेला होता. आंतरराष्ट्रीय प्रवास करणारी विमाने सर्वसाधारणपणे जमिनीपासून तेहतीस ते छत्तीस हजार फूट उंचीवरून जात असतात. त्यामुळे ‘टेकऑफ’ किंवा ‘लँडिंग’ करताना काही मिनिटे खालचा, आजुबाजूचा निसर्ग आणि परिसर काय तो आपल्याला दिसतो. डोमेस्टिक ओअर लाईनने अमेरिकेतील दोन शहरांमध्ये प्रवास केला तर हे विमान जमिनीपासून बारा ते सोळा हजार फूट उंचीवरून जाते. […]
किती छोटीशी गोष्ट असते, शुभेच्छा देणं! शुभेच्छा मिळाल्या की प्रसन्न वाटतं… कुणाला तरी आपली आठवण आहे, याचा आनंद होतो. हुरूप येतो. राजकारणी लोक आणि व्यापार-व्यवसायातले शुभेच्छा देण्या-घेण्यात तरबेज असतात. मोठमोठी होर्डिंग्ज लावतात आणि शुभेच्छांच्या बदल्यात मोठमोठ्या हॉटेलमधून पार्ला देतात. […]
लेडी ऑफ कॉन्ट्रासेप्शन’ किंवा ‘कुटुंबनियोजनाची जननी’ किंवा गरिबांची वाली म्हणून विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात जगात सुप्रसिद्ध झालेली अमेरिकेतील महिला म्हणजे मागरिट सॅनगर! कुटुंबनियोजनासारखा तत्कालीन अश्लाघ्य विषय मागरिटने हाताळल्याने अत्यंत धाडसी आणि शूर महिला म्हणून तिची गणना साऱ्या विश्वात केली गेली आहे. […]
‘सत्यनारायणाचं व्रत’ हा अनेकांच्या भक्तिभावाचा विषय तर अनेकांच्या चेष्टेचा. देवधर्म, सणवार या गोष्टींतील निरर्थक रूढींकडेच ज्यांचं लक्ष जातं, त्यांच्या दृष्टीनं हा चेष्टेचाच विषय. पण अध्यात्माच्या गूढ चर्चेत रमणाऱ्यांच्या दृष्टीनेही हे ‘काम्य व्रत ! ‘ म्हणजे कमी महत्त्वाचंच एकदा कशावरून तरी विषय निघाला आणि मी म्हटलं, ‘काही गोष्टी खरंच कळत नाहीत हं. ‘ […]