अनेक वर्षांपर्यंत चांगल्या रीतीने काम करण्याबद्दल नोकराने त्याच्याशी करार केला होता. जर कराराप्रमाणे त्याने बरोबर काम केले नाही, तर त्याच्या पाठीचे पेटीच्या आकाराचे चामडे काढण्यात येईल, आणि जर का नोकराने आपली नोकरी चांगल्या रीतीने केली तर हाच व्यवहार पादरी साहेबांबरोबर करण्यात येईल. यापूर्वी पोप साहेबांजवळ पुष्कळ नोकर येवून गेले होते. पण कुणीही टिकू शकला नव्हता. […]
गोदाकाठच्या परिसरात फाल्गुन महिन्यात होळी हा सण अत्यंत आनंदाने साजरा केला जातो. या होळी सणाविषयी एक लोककथा अशी सांगितली जाते: ‘विष्णुच्या दरबारात दोन द्वारपाल राहात होते. इतक्यात भृगु महाऋषी विष्णूस यज्ञाचे फळ देण्यासाठी विष्णुच्या घरी जात असतात. तेव्हा विष्णूचे द्वारपाल जय आणि विजय हे भृगुऋषीला विष्णुच्या दर्शनासाठी जाण्यास सक्त मनाई करतात. […]
फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट. तेव्हा देव देखील दिवाळी साजरी करायचे. देव, देवता, यक्ष, गंधर्व, किन्नर, पन्या आभाळात दिवाळीची मजा करायचे. पृथ्वीवरच्या माणसांना, मुलामुलींना देखील देवांची दिवाळी बघायला मिळायची. त्यावेळीची ही गोष्ट. […]
सकारात्मक राहू या, असे म्हणले की सगळेच, हो हो चला सकारात्मक राहू या, असे म्हणतात. पण सकारात्मक राहायचे म्हणजे समोर आलेल्या प्रत्येक परिस्थितीला हो हो करत पळ काढायचा आणि म्हणायचे मी सकारात्मक विचार केला हो, असे नसते ना. […]
एका शहरात तीन मित्र रहात होते. एक राजपुत्र, एक मंत्रिपुत्र आणि एक वणिक पुत्र. एकदा तिघंही एकत्र आले आणि विचार करू लागले की कोण कशामुळे जिंकला आहे. राजपुत्र म्हणाला, “मी आपल्या पुण्यामुळे जिंकलो आहे.” मंत्रीपुत्र म्हणाला, “मी आपल्या बुद्धिबळावर जिंकलो आहे.” वणिक पुत्र म्हणाला, “मी आपल्या चतुराईने जिंकलो आहे.” तिघे मित्र परदेशात गेले आणि एका शहरातील बगीच्यात थांबले. वणिक पुत्रास जेवण्याची व्यवस्था करण्यास सांगण्यात आले. वणिक पुत्र एका वाण्याच्या दुकानावर गेला. त्या दिवशी कोणतातरी सण होता आणि दुकानात इतकी गर्दी होती की तो वाणी सर्व ग्राहकांना लवकर किराणा देवू शकत नव्हता. […]
एक मौलवी होते. त्यांनी सगळीकडे आपल्या प्रामाणिकपणाचा प्रचार प्रसार केला. मशीदीत बसून दिवसभर मुलांना शिकवित असत आणि जी फी मिळे त्यात आपला उदर निर्वाह करीत असे. एक दिवस संध्याकाळी ते घरी आले आणि पत्नीला म्हणाले, “आज काय स्वयंपाक केला आहे. फार भूक लागली आहे.” ती म्हणाली, “आपण जेवावयास बसा. मी कोंबडा बनविला आहे.” “कोंबडा कुठून आणला?” मौलवीनी विचारले. […]
“बाळ श्रावणा”, आईने हाक मारली. “कोठे आहेस तू?” “हा काय तुझ्या जवळच आहे”, श्रावण म्हणाला. “असा जवळ ये बरं”, आई म्हणाली. “हा आलो, काय पाहिजे आई तुला?” श्रावणाने विचारले. आई म्हणाली, “हे बघ, मी आणि तुझे वडील आता अगदी पिकली पाने झालो आहोत. केव्हा गळून पडू, ते कळायचेही नाही. तेव्हा, त्यापूर्वी….’ “त्यापूर्वी काय? आई मी तुझी […]
अजन्मा पहाडावर बसला होता . सोबतीला बालमित्र सुदामा होता .पण तो काहीसा अंतर ठेवून बसला होता . केवढा तरी पहाड वर चढून येणं त्याला भयंकर वाटत होतं . पण अजन्म्याच्या अंगात प्रचंड उत्साह संचारला होता . […]
फार प्राचीन काळी धौम्य या नावाचे एक महान ऋषी होऊन गेले. ते आपल्या शिष्यांना केवळ ज्ञान देत नसत, तर ज्ञानाच्या जोडीला व्यवहार शिकवीत असत. त्यासाठी शिष्यांना आश्रमात पडतील ती कामे करावी लागत. कामे करीत असताना त्यांना आपोआपच व्यवहारज्ञानही प्राप्त होई; आणि त्यांची शरीरे सुदृढ बनत. धौम्य ऋषींच्या आश्रमातील सर्व शिष्यांत उपमन्यू, वेद आणि आरुणी हे तीन अत्यंत बुद्धिमान आणि आज्ञाधारक शिष्य गुरुजींचे फार आवडते होते. […]
झेलमच्या पाण्याचं दर्शन घ्यायचं , गेल्या पंचाहत्तर वर्षातले साठवून ठेवलेले अश्रू तिला अर्पण करायचे , आई , दोघी बहिणी , आत्या आणि गल्लीतल्या कित्येक जणींना श्रद्धांजली अर्पण करायची , अशी कैक वर्षांची इच्छा होती तिची .
दरवर्षीच्या चौदा ऑगस्टला आशाराणी गप्पगप्प असायची . मौन असायचं तिचं. सकाळपासून पाण्याचा थेंबही घेत नसे ती . छावणीत ती एकटीच बसून राहायची . आणि डोळ्यातून अश्रूंचा अविरत पूर वाहत असायचा . […]