यशवंत आरामखुर्चीत रेलले होते. चंदू लॅपटॅापवर काहींतरी पहात होता. आत्याबाई चहाचा ट्रे घेऊन आल्या आणि दरवाजाची बेल वाजली. आत्याबाईंनी दार उघडले. बाहेर एक बुरखाधारी स्त्री उभी होती. “मला डिटेक्टीव्ह यशवंतना भेटायचं आहे.” ती स्वच्छ मराठीत म्हणाली. आत्याबाई म्हणाल्या, “या, आंत येऊन बसा. साहेब येतील आता. तुम्ही चहा घेणार कां?” ती स्त्री सोफ्यावर ऐटीत बसली. […]
या सगळ्यात आपल्या भावना आणि विचार एकमेकांशी संभाषण साधून व्यक्त करण्याचे वरदान मानवाला लाभले आहे. पूर्वीच्या काळापासून आपण संदेशवहनासाठी वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करीत आलो आहोत या मागे एकच उद्दिष्ट की, आपल्या मनातल्या भावना व्यक्त करणे तसेच आपले विचार मांडणे. अगदी पूर्वीच्या काळी जलद गतीने संदेश पाठवण्यासाठी तार यंत्रणा अस्तित्वात होती. तसेच पोस्टमनद्वारे येणाऱ्या आपल्या मित्रांच्या-नातेवाईकांच्या पत्राची अनामिक ओढ होती. […]
रोजची पहाट चे संपादक आणि स्वतःस मुलाखत सम्राट म्हणवून घेणारे सूर्याजीराव रविसांडे आज फारच अस्वस्थ दिसत होते. दुपारचा रवि आकाशात तळपत होता आणि इकडे सूर्याजीरावांचा तिळपापड होत होता. ते मोठ्या आतुरतेने त्यांचे मुख्य वार्ताहर आणि मुलाखत तज्ञ, काका सरधोपट यांची वाट पहात होते. […]
चातुर्यकथा एकदा काय झाले, त्याला लागली खूप भूक. त्याने खाल्लेही खूप खूप. पण पाणी नव्हते प्यायला. शोधून शोधून दमला. इतक्यांत त्याला दिसली घागर. गेला तिकडे भरभर. उडून बसला घागरीवर. पाणी होते तळाशी. त्याची चोच पोचावी कशी? पाणी चोचीत येईना, काय करावे कळेना. […]
आई बाबा इतके खूष असतात कारण लेकीला परदेशातल्या सुखवस्तु कुटुंबातलं स्थळ मिळतं. आणि ती ? ती हर्षभराने आकाशाला केव्हाच स्पर्शून येते. धाकटी सोनाली आठवडाभर घरभर नाचत असते, होणार्या जिजाजींचे बहारदार वर्णन असलेलं जणू एकच गाणं तिला पाठ येत असतं […]
अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर कॅलिफोर्निया हे राज्य वसलेले आहे. यात उत्तरेला सॅनफ्रान्सिस्को तर दक्षिणेला मेक्सिकोची सीमा चिकटली आहे. पश्चिमेला पॅसिफिक महासागर. यात लॉस एंजलीस, सांता बारबारा, आरवाईनसारखी शहरे. […]
27 फेब्रुवारीला ‘मराठी भाषा दिन‘ असतो. त्या निमित्ताने समस्त मराठी जनांना मराठीचा पुळका येत असतो. कार्यक्रमांची तर रेलचेलच असते. पण ‘बहुत राजकीय धुमाळी जाहली ऐजी जे‘ अशा बातम्याही 28 तारखेच्या पेपरांमधून वाचायला मिळतात. […]
आटपाट नगर होते. “त्याला राजा नव्हता. एक मुख्य मंत्री होता आणि अनेक मंत्री होते. आधी सुरुवातीला एक मुख्य मंत्री आणि पाच दहा मंत्री असे छोटेसे मंत्रीमंडळ होते. सगळे चांगले चालले होते. हळू हळू मंत्र्यांना कळले की आपण मंत्री आहोत ते लोकांनी निवडून दिलेले असलो तरी त्यांची कामे केलीच पाहिजे असे नाही. एकदा निवडून आलो की लोकांना […]
तेनालीराम आणि त्याची पत्नी घराला कोणता रंग द्यावा हे ठरवत होते. पत्नीला गुलाबी रंग पसंत होता. तेनाली म्हणत होता, आपण सफेद रंग देऊ या. दोघांमध्ये काही केल्या एकमत होत नव्हते. पत्नीने अखेर निकराने सांगून टाकलं की, “मी ठरवलं आहे, गुलाबीच रंग द्यायचा. आणि त्याचं कारण एकच आहे, फक्त गुलाबी रंगामुळेच मी आनंदी राहू शकते. […]