काळ बदलला. विकासाचें वारे वाहू लागलें. गल्लीतील घरे ३ माल्याचें झाली. गल्ली हि सिमेंट कांक्रीटची झाली. जिथे पिण्याच्या पाण्यासाठी टेंकर सुरु झाले तिथे बागवानी साठी पाणी कुठून येणार. घरा समोरचे वरांडे अदृश्य झाले. प्रत्येक प्लॉट वर १०० टक्के निर्माण. लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारली. कार आणि AC घरात आले. अदृश्य झाले ते रात किडे, पावसाळी किडे आणि डरांऊ-डरांऊ करणारे बेडूक. […]
आता बहुतेक जण निघून गेले होते . थोडे निवांत झाले होते . फक्त एकाच व्यक्ती भयानक बिझी होती . कौल ! ते पोटतिडकीने,’ मी कशी वेळेवर आणि तत्परतेने कार्यवाही केली ? आणि हजारो जीव वाचवले . ‘ हे टीव्ही चॅनल्स ला सांगत होते ! आणि चॅनलवाले ते लाईव्ह टेलेकास्ट करत होते ! […]
मी भग्या , आवंदा चौथी पास झालाय ह्यो गब्रू ! आता तर उन्हांळ्याचा सुट्ट्या हैत . रट्टाऊन जेवायचं अन गावभर हुंदडायचं , हेच आपलं काम . तस बी शाळा आसन तर बी हेच काम असत आपलं ! आत्ता बी मी आमच्या रानात चिंचाची बोटक खाया आल्तो . खाऊन खिसभर संग घेतल्यात . […]
याही गोष्टीला ११ पेक्षा जास्त वर्षे झाली. सध्या आमच्या लग्नाला ५१ हून जास्त वर्षं झाली. ही दागिने गमावल्याचं दु:ख विसरली. मी अजून नलूला विसरूं शकत नाहीं. […]
अर्ध्या तासात तिन्ही पित्ज्झे डिलिवर करून तो पुन्हा पित्ज्झा शॉपवर येऊन पोहचला. डोक्यावरचे हेल्मेट काढून बाईकच्या आरश्यात स्वत:चा चेहरा बघितला. चेहर्यावर अनेक सुरकुत्या पसरलेल्या दिसल्या. पुन्हा विचारचक्र सुरु झाले, हेच काम आणिक काही वर्ष केले, तर आपण लवकर म्हातारे दिसणार. जो पर्यंत दुसरी नौकरी मिळत नाही, हे काम करावेच लागेल. पोटाचा गड्डा भरायला. त्याला वाटले पित्ज्झा डिलिवर करता करता तो हि एक पित्ज्झा झाला आहे…… जंगली श्वापदे त्याचे लचके तोडतात आहे….. […]
मोहन्याच्या पावलांचा आवाज दूर गेल्यावर , रामा अंदाजे आपल्या घराकडे वळला . हातातली काठी हलकेच जमिनीवर आपटून पहिली . उघड्या पायाच्या तळव्याने अदमास घेत सराईतपणे घरा समोरची नाली ओलांडली . चार पावलावर अपेक्षे प्रमाणे घराच्या पायऱ्या लागल्या . एक ,दोन ,तीन तो पायऱ्या चढून गेला . हात सावध पणे समोर केल्यावर हाताला लाकडी दराचा स्पर्श झाला . हलका हात फिरवून आपल्याच घराचे दार असल्याचे त्याने खात्री करून घेतली . अन मग कडी वाजवली . […]
मी घरी आलो तेंव्हा खूप उशीर झाला होता. आईला काळजी वाटत होती. आप्पांना (माझ्या व़़डलांना)ही काळजी वाटत असावी. मी आईला सांगून गेलो होतो असं म्हणट्ल्यावर त्यांचं समाधान झालं. […]
मी त्यावेळी चौदा वर्षांचा होतो. तो दिवस मला आठवतो. 30 जून ही तारीख होती. महिन्याचा शेवटचा दिवस-‘मंथ एण्ड’ म्हणून शाळेला अर्धा दिवस सुट्टी मिळाली होती. म्हणजे शाळेचं काम चालूंच होतं पण मुलांना अर्ध्या दिवसाची सुट्टी मिळाली होती. कोंडवाड्यातून सुटल्याप्रमाणे मी धावत घरी आलो. […]