नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

गोष्ट एका ‘ Post ‘ ची

साली एक साधी पोस्ट सुचू नये ? गणूला आजवर असा कधी प्रश्न पडला नव्हता . आता तुम्हाला ‘हा कोण बुवा , गणू ?’ असा प्रश्न पडला असेल . जर तुमचे फेसबुक असेल तर प्रश्नच नाही . तुम्ही त्याला ओळखत असणारच .! कारण त्याचा फे बु मित्रांची संख्या पावसाळ्यात तुंबलेल्या गटारा प्रमाणे ओसंडून वाहत आहे .! म्हणून ‘गणूच्या गप्पा ‘ नावाचे पेज सुरु केले . तेही लोकल लोकनेत्याच्या ढेरी प्रमाणे दिवसेंदिवस फुगतच आहे . शिवाय तो दहा बारा ग्रुपचा तो ऍडमिन आहे ! यात तुम्ही कोठे तरी असणारच कि ! […]

‘पिंपळ्या’ ! एक लघुकथा

‘जिंदगीमे क्या खाना तो -दम -खाना , और क्या करना तो -आराम -करना ‘ हे नागूचे लाडके तत्व . कामाचा प्रचंड कंटाळा . खाऊन झोपणे . झोपेतून उठून पुन्हा खाणे . याच साठी तो जन्माला होता ! तो म्हणजे साक्षात आळस ! पण यालाही एक कारण होते . […]

‘ती’ तिच्या सोबतच !

मला खूप लहानपणा पासून चष्मा लागलाय ,म्हणजे लावायला लागला . याला माझे क्रिकेटचे वेड कारणीभूत होते . असेन दहा बारावर्षाचा ,फॉरवर्ड शॉर्ट लेग माझी फिल्डिंग पोझिशन , नेहमीचीच . तेव्हा आजच्या सारखी हेल्मेट्स नव्हती . […]

‘साहित्यिक’ ज्ञानेश्वर आणि वाङ्मयीन भाषा-वैविध्य : भाग – १०

‘साहित्यिक’ ज्ञानेश्वर आणि वाङ्मयीन भाषा-वैविध्य व त्या अनुषंगानें एकाच रचनाकाराच्या भिन्नभिन्न भाषास्वरूपाची , (आणि अन्य क्षेत्रातील सृजनशील व्यक्तीँची) उदाहरणें यांची ओळख करुन देणारे सदर…. […]

मंगळ – एक लघुकथा

नाना हे गावातील प्रसिद्ध व्यक्तीमत्व. नानांच्या नावातच दोनदा ‘ना’ असल्यामुळे त्यानी कधी कोणाला नंतर ना म्हटलेच नाही. नानांच वय साधारण 60 वर्षे पण नाना आजही 10 वर्ष वयाच्या बालकांपासुन तर मरणासक्त झालेल्या म्हाताऱ्यां पर्यंत उत्तम पध्दतीने जुळवून घेतात ते नानांच मोठ कौशल्यच म्हणाव लागेल. […]

लग्न; समस्या की समोसा?

‘मनगट आणि बुद्धीच्या जोरावर जगातल्या सर्व समस्यांवर मार्ग काढता येतो’, या अर्थाचं एक विवेकानंदांचं वाक्य आहे. मी काही ते वाचलेलं नाही. विवेकानंदांचं नसलं, तरी जागतल्या बऱ्याच विचारवंत, तत्ववेत्त्यांनी अशाच अर्थाचं काही न काही, कधी ना कधी सांगीतलेलं आहे. […]

डिनर – एक लघुकथा

गाडी चालवता चालवता त्याने डॅश बॉर्डरवरल्या घड्याळावर नजर टाकली . रात्रीचे अकरा वाजून काही मिनिटे झाली होती . डोक्यात नुकत्याच झालेल्या पार्टीची धुंदी होती . पण तो परफेक्ट कंट्रोल मध्ये होता . रस्ता तसा निर्मनुष्यच होता . रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या दिव्यांची निमुळती होतजाणारी रांग आणि त्यातला तो रस्ता एखाद्या स्वप्नातल्या दृष्या सारखा मोहक दिसत होता . […]

मंचकमहात्म्य – बारक्या

सकाळच्या रामप्रहरी अंड्याच्या दोन पोळ्या , दोन शिळ्या भाकरी ,बचकभर जवसाची चटणी, त्यावर कच्चं तेल आणि चार पातीचे कांदे, असा ‘अल्प ‘ नाश्त्याचा मुडदा पाडून ,मंचकराव पोकळ मुठीने आपल्या भरघोस मिश्या गोंजारत चौपस बंगईवर मंद झोके घेत बसले होते . अंगणात कोवळ्या उन्हाचे कवडसे बिचकत बिचकत डोकावत होते . मधेच पायाचा हलक्यासा रेटा देऊन मंचकराव झोपाळ्याची गती कायम ठेवीत . अश्या रम्य वातावरणात आणि भरल्या पोटी डोळे जडावणे साहजिकच होते. […]

मुद्राराक्षस : आधुनिक काळातला..

हल्ली हा जुना मुद्रा राक्षस मोबाईलवर भेटू लागलाय. पुन्हा पुन्हा आणि वारंवार. मुद्रा राक्षस हे नांव सर्व काम छपाईच्या मशिनवर व्हायचं त्या काळातलं आहे. सध्या टायपिंगचा काळ असल्याने याला ‘टायपो डेमाॅन’ म्हणावं का, की त्याला आणखी कुठलं मराठी नांव द्यावं हे कळत नाही. […]

1 401 402 403 404 405 517
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..