‘सन सेट ‘पाहण्यासाठी साक्षी रिसोर्ट मधून निघाली तेव्हा संध्याकाळचे पाच वाजले होते . रिसॉर्ट पासून समुद्र किनारा फक्त दोन किलोमीटर होता . संध्याकाळच्या थंड वातावरणात बहुतेक पर्यटक पायीच समुद्रा पर्यंत जात . रिसॉर्ट समोरचा छोटासा रस्ता थेट समुद्राला जाऊन भिडत होता . मध्ये खूप झाडी होती पण रात्री सात -आठ पर्यंत माणसांची वर्दळ चालू असे . […]
‘साहित्यिक’ ज्ञानेश्वर आणि वाङ्मयीन भाषा-वैविध्य व त्या अनुषंगानें एकाच रचनाकाराच्या भिन्नभिन्न भाषास्वरूपाची , (आणि अन्य क्षेत्रातील सृजनशील व्यक्तीँची) उदाहरणें यांची ओळख करुन देणारे सदर…. […]
पंकज मलिक या श्रेष्ठ संगीत दिग्दर्शकावर एक चरित्रपट सई परांजपे यांनी बनवला होता. त्या बद्दल बोलताना सई परांजपे म्हणतात…. पंकज मलिक या श्रेष्ठ संगीत दिग्दर्शकावर एक चरित्रपट मी प्रस्ताव मांडला. त्या वर्षी त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला होता, तेव्हा माझ्या प्रस्तावाला लगेचच मान्यता मिळाली. पण स्वत: पंकज मलिक या सिनेमासाठी मुळीच राजी नव्हते. किंबहुना, ते […]
न्यायाधीश, पेंद्या तुला चोरी करताना रंगे हात पकडले आहे. तू चोरी केली हे तू कबूल करतो का? न्यायाधीश महोदय, मी चोरी केली नाही. ‘करता करविता स्वयं भगवान कृष्ण आहेत’. जे घडले ते भगवंताच्या इच्छेने. शिवाय मी रोज सकाळी भगवंताची पूजा करताना आपल्या सर्व कर्मांची फळे भगवंताला अर्पित करतो. ॐ श्री कृष्णार्पणमस्तु. मी चोरी केली हे जरी सिद्ध होत असेल तरीही त्या […]
नुकताच ‘जागतिक मराठी भाषा दिन ‘ झाला अन आम्ही झोपेतून ( कि गुंगीतून ) सपाटून जागे झालो . “मराठी वाचवा ” असे आवाहन करण्यात आले . मराठीचा -बचाव -बचाव असा आक्रोश स्पष्ट एकू येवू लागला . आम्ही बेचॆन झालो . ‘मराठी वाचलीच पाहिजे ‘ (क्रिया आणि क्रियापद दोन्ही )याचा साक्षात्कार झाला ! […]
‘साहित्यिक’ ज्ञानेश्वर आणि वाङ्मयीन भाषा-वैविध्य व त्या अनुषंगानें एकाच रचनाकाराच्या भिन्नभिन्न भाषास्वरूपाची , (आणि अन्य क्षेत्रातील सृजनशील व्यक्तीँची) उदाहरणें यांची ओळख करुन देणारे सदर…. […]
ज्ञानेश्वर मोठे संत होते, तसेच ते मोठे दार्शनिक (तत्वज्ञानी) सुद्धा होते. आणि ( त्यांच्या रचना वाचून असें जाणवतें की) ते विविधरंगी साहित्यिकही होते. ज्ञानेश्वरांचा विचार करायचा तर त्यांचें तत्वज्ञान, अध्यात्म वगैरे पुढें येणें अपरिहार्य आहे . मात्र , या क्षेत्रातील प्रस्तुत माझें ज्ञान ‘शून्य के बराबर’ आहे. त्यामुळे अध्यात्म-तत्वज्ञान वगैरे विषयांवर सखोल चर्चा करायची धृष्टता मी करूं शकत नाहीं, कारण ( हिंदीत म्हणतात, त्याप्रमाणें ), ती ‘अनधिकार चेष्टा’ (प्रयत्न) होईल. आपली चर्चा मुख्यत: साहित्यिक अंगानें जाणार आहे . तिच्यात, अध्यात्म-तत्वज्ञान यांचें जें कांहीं विवरण येईल, त्यासाठी मी (अर्थातच) ज्ञानवंतांचा आधार घेललेला आहे. त्यात, जें कांहीं ज्ञान असेल, त्याचें ‘क्रेडिट्’ त्या-त्या ( नेम्ड् ऑर् अन्-नेम्ड् ) ज्ञानवंतांचें ; आणि रेफरन्स् च्या, अर्थाच्या, व इंटरप्रिटेएशनच्या ज्या कांहीं चुका असतील , त्यांची जबाबदारी माझी, हें सांगायला नकोच. […]
“ही मी त्याला दिलेली कठोर शिक्षा” रजनीने कथा संपवली. रजनीने कथा संपवली खरी, पण कथा संपली नाहीं ! “मी तुमच्या गप्पांत सामिल होऊं कां?” मागून एक आवाज आला. “ओ हो, तुम्ही यशवंत दळवी ? बाळूच्या लग्नाला आलांत ? ” अरविंदने ओळख दाखवली.”तुम्ही मफ्तीमध्ये आलात म्हणून आधी ओळखलं नाही. ” “हे नारायण प्रभू- सुविख्यात वकील आणि ह्या […]
… आणि या प्रवासातला माझा सोबती… माझ्या गत तिनेक वर्षातल्या लेखनप्रवासात मला ज्याने न थकता अखंड आणि अबोल साथ दिली, त्याही त्याच्या तिन पिढ्या, त्या माझ्या सोबत्याचा, माझ्या मोबाईलचा, उल्लेख केला नाही तर ते कृतघ्नपणाचं ठरेल. […]