नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

दुरून डोंगर साजरे – भाग २

उषाने आम्हाला नंदिताच्या  (तिच्या मुलीच्या) नृत्याच्या कार्यक्रमाला नेलं. कार्यक्रम छान झाला. मला माझ्या कॉलेजातल्या गॅदरिंगच्या कार्यक्रमाची आठवण झाली. उपस्थित तरूण मंडळी उगीचच हल्लागुल्ला करत होती, परत येतांना एके ठिकाणी मध्येच भर रस्त्यात कारंजातून पाणी उडत होतं-पाण्याचे फवारे उडत होते ते  पाहिले, लहान थोर सर्वजण उन्हाळ्याचा आनंद घेत होते. मुलंच काय पण मोठी माणसं सुद्धा सचैल स्नान […]

बेटी – धनाची पेटी ( सत्य घटनेवर आधारित एक लघुकथा )

नेहमीच्‍या कोपर्‍यावर मी मोटार थांबवली. माझे ऑफिसातले मित्र आंत चढले. मोटार ऑफिसच्‍या दिशेनं धावूं लागली. ‘‘आज साठे दिसत नाहीं’’, मी म्हणालो. ‘‘तुम्‍हाला माहीत नाहीं कां पराडकर ? साठेला मुलगी झाली.’’ पाटीलनं सांगितलं, ‘‘हो कां ? अरे वा !’’, मी. साठे हा आमच्‍या ऑफिसातला एक तरुण ऑफिसर. त्‍याच्‍या खेळकर स्‍वभावामुळे तो सर्वांनाच आवडत असे. दीडएक वर्षांपूर्वी त्‍याचं […]

साहित्यिकाची समाजाप्रती जबाबदारी

साहित्य संमेलन भरवण्याची कल्पना आणि परंपरा मला वाटत फक्त मराठी भाषेतच असावी. देशातील अन्य कोणत्या भाषांची संमेलन भरत असतात किंवा नाही, याची मला नीटशी माहिती नाही. मराठीत साहित्य संमेलने भरवणे ही परंपरा असल्यानेच कदाचित मराठी जनमानसावर याचा खूप चांगला परिणाम झालेला दिसतो. मराठी माणूस देशातील इतर कोणत्याही प्रांतातल्या माणसापेक्षा जास्त विचारी आहे, संकुचित नाही याच्या मागे असलेल्या अनेक कारणांपैकी नित्य नेमाने भरणारी साहित्य संमेलने हे ही एक कारण असू शकेल अशी माझी खात्री आहे. […]

दुरून डोंगर साजरे – भाग १

दूरून डोंगर साजरें…….. (प्रवास वर्णन – भाग एक) प्रयाण ! आम्ही बॅंगलूरहून कॅनडाला  आल्याला 11 जानेवारी 2017 ला सहा महिने झाले. हे सहा महिने कसे गेले कळलंच नाही.  इकडे येण्याआधी कॅऩडा हा प्रदेश कसा असेल अशी उत्सुकता होती. 2016 जुलैच्या १0 तारखेला आम्ही दोघे बेंगलूरूहून निघालो. ऐन वेळी घोटाळा होऊं नये म्हणून हिने टॅक्सी संध्याकाळी 5 वाजतांच […]

सेकंड इनिंग

आपण जसे आपल्या पहिल्या ‘ इनिंग ‘ कडे ,- म्हणजे शिक्षण , नौकरी -व्यवसाय , लग्न – या कडे जसे लक्ष देतो तसे आपल्या ‘ सेकंड इनिंग ‘ कडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत . सेकंड इनिंग म्हणजे निवृत्ती नंतरचे आयुष्य . या उतरत्या आयुष्याचे नियोजन गरजेचेच असते . ‘वेळ आल्यावर पाहू ‘ ‘ आत्ताच काय घाई आहे ?’ म्हणून टाळून देतो . […]

पाकिजा – हिंदी चित्रपटसृष्टीतील एक दंतकथा

कमाल अमरोही- मीनाकुमारी यांचा पाकिजा ही हिंदी चित्रपटसृष्टीतील एक दंतकथा. आणि त्यातील सारी गाणीही. खरंतर एका पातळीवर हा संपूर्ण चित्रपटच एक भव्य- करुण काव्य आहे. […]

त्रासाचे झाड 

मामांच्या कार्यालयात त्यांचाच भाचा कामाला होता. दूरचे नाते असले तरी कामात मात्र दोघांचे सगळेच पटायचे. कामाचा, कर्जाचा व मंदीचा व्याप वाढत असल्यामुळे तणाव, चिडचिड आणि वैताग हे रोजचेच झालेले. मामांना परिस्थिती सोसेनाशी झालेली. ‘ऑफिसमध्ये त्रास आहेच आणि घरीदेखील शांतता नाही,’ असे पुटपुटत मामा निघाले. संध्याकाळी घरी जायची वेळ होती. भाचाही घरी जाण्याच्या तयारीत होता. दोघे एकदमच […]

व्हॅलेन्टाइन डे : दिवस प्रेमाचा

‘प्रेम’ या शब्दातच प्रचंड सामर्थ्य आहे.. त्याचा हेतू हि फार उदात्तह.. प्रेमाची व्याख्या करून त्याला शब्दात सामविणे जवळजवळ अशक्यच, एव्हढी त्याची व्याप्ती आहे. प्रेम केवळ जोडीदारांमध्ये असते असे नाही तर समाजाच्या, कुटुंबाच्या प्रत्येक घटकावर आपल्याला प्रेम करता येते… ते कुठेही आणि कसही करता येत. प्रेमभावना काय असते याचे सुरेख वर्णन मंगेश पाडगावकरांनी केलं आहे. […]

कठोर शिक्षा – भाग १

“अरे…..! तू नानू नां रे ?” कोणीतरी पाठीमागून हांक मारली आणि नानूच्या  पाठीवर थाप मारली. सुविख्यात वकील श्री. नारायण – (ऊर्फ नानू)  प्रभु याला अशी सलगी मुळीच आवडली नाहीं. तो कामात गर्क होता. इतर वकीलांबरोबर कोर्टाच्या प्रतीक्षालयात  (Common Room मध्ये) बसून आजच्या कामाचा आढावा घेत होता.  त्याची पाठ दाराकडे होती म्हणून कोण हांक मारत होतं ते […]

तबला आणि मी

तबला हे खरेच एक तालेवार प्रकरण असते . हे महाराज कधी खाली भुईवर बसत नाहीत . याना स्वतंत्र बैठक लागते ! तबल्याला आणि डग्ग्याला वेगवेगळी ! गिटारी सारखे हे गळ्यात पडत नाहीत कि लाडे – लाडे त्या गिटारी सारखे खांद्यावर चढत नाहीत , कि ‘माऊथ ऑर्गन ‘सारखा मुका घेत नाहीत ! तबला म्हणजे एकदम खानदानी काम हो ! […]

1 406 407 408 409 410 517
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..