‘लोकसत्ते’मुळे लागलेली वाचनाच्या गोडीला ‘चांदोबा’ने खतपाणी घातलं. वाचावं कसं, ते मला चांदोबाने शिकवलं. चांदोबाने माझं भावविश्व समृद्ध केलं. ….चांदोबातून ओळखीच्या झालेल्या रामायण, महाभारत, शिवलिलामृत, वेताळ पंचविशीतील कथा पुढे थोड्याशा मोठ्या वयात संपूर्ण वाचून काढल्या, त्या याच पद्धतीेने. कळत फार नव्हतंच, परंतू त्यातलं नाट्य मात्र मोहवत होतं. […]
कठोर परिश्रमाचे फळ नेहमीच चांगले असते. त्यामुळे तू गणिताचा मन लावून अभ्यास केल्यास तुला गणितात चांगले गुण मिळू शकतात. तुझ्या वडिलांनाही समजावून सांगण्यासाठी मी स्वत: तुझ्या घरी येणार आहे. […]
गझल हे काव्य खरे, पण ते गेय काव्य आहे. त्यामुळे, रसिकांनी गझल-गान ऐकावे, गझल स्वतः गावी किंवा गुणगुणावी, आणि वाचून रसास्वाद घेतांना सुद्धा ‘ध्वन्य’ पद्धतीने वाचावी, म्हणजे गझलचा आनंद द्विगुणित होईल. […]