अमेरिकेतील अत्यंत धोकादायक भयंकर स्त्री’ असे अमेरिकेतील भांडवलदार आणि कारखानदार यांनी जिचे वर्णन केले आहे, ती मदर जोन्स इ.स. १८३० मध्ये आयर्लंडमध्ये मेरी हॅरिस हे नाव घेऊन जन्माला आली होती. आयर्लंडच्या मातीत आणि पाण्यातच क्रांतिकारकांचे पोषण करण्याचे गुणधर्म असावेत! मेरी हॅरिस जोन्सच्या रक्तातच देशप्रेम, त्यागीवृत्ती, अन्यायाविरुद्धची बंडखोरी आणि बेडर क्रांतिकारक वृत्ती होती. […]
१९३३ सालातील ९ फेब्रुवारी ते १३ फेब्रुवारीच्या पहाटेपर्यंत, या ५ दिवसांत साने गुरुजींनी नाशिकच्या कारागृहात असताना ‘श्यामची आई’ कादंबरी लिहून काढली. […]
नवरात्रातले दिवे अखंडपणे घरोघरी असतील. मंदिरांमधून घरांमधून देवीची उपासना सुरू असेल. नवरात्र हा स्त्रीशक्तीच्या पूजनाचा सण, कधी कालीमातेच्या भयंकर, रणकर्कश रूपात, कधी शारदेच्या साहित्य-संगीत-ज्ञान-विज्ञानात रत झालेल्या रूपात, तर कधी समृद्धीचं, शांतीचं, मांगल्याचं आणि स्थैर्याचं वरदान देणाऱ्या शांत – तेजस्वी महालक्ष्मीच्या रूपात या शक्तीचं पूजन होईल. […]
स्वामी विवेकानंदानी सर्वधर्मपरिषदेला हजर रहावं आणि त्या परिषदेत धर्माबद्दल एक नवाच विचार मांडावा, ही नियतीचीच इच्छा असावी. स्वामीजींचे समर्थक, त्यांच्या प्रवासाची व्यवस्था करणारे राजे, त्यांचे शिष्य कोणालाही परिषदेच्या तारखा जाणून घ्याव्या हे सुचलं नव्हतं. […]
कोण म्हणत पॉलिटिक्समध्ये म्हणजे राजकारणात जायला शिक्षणच हवे असते.. आणि काय गरज आहे पत्रकार म्हणजे चांगला शिकलेला, विचारवंतच असला पाहिजे. दोन्ही वर्गातील लोकांनी काही बोलले, काही लिहिले की, समाजाला नवीन दिशा मार्ग दाखवला जातोच की, खरंच! काय गरज आहे का पत्रकार शिकलेला असण्याची. […]
सॅनफ्रन्सिस्कोच्या दक्षिणेला काही मैलांवर सॅनहोजे, फ्रिमाँट, डब्लिन, लिव्हरमोर, प्लेझंटन ही शहरे येतात. पॅसिफिक महासागर आणि सॅनफ्रान्सिस्को बे हे दोन्ही समुद्रकिनारे असल्याने इथली हवा आपल्या मुंबईकडे असते तशीच असते. पण इथले हवामान लहरी आहे. […]
एक व्यक्ती विशेषतः स्त्री, जगाशी संघर्ष करीत, संसार पुढे पुढे रेटत असते, कठीण परिस्थितीतून मार्ग काढत असते तेव्हा तिचं कौतुकच करावं तेवढे थोडेच ! या शंभर वर्षांचा त्यांनी कथन केलेला त्यांच्या इतिहास चित्रपटासारख्या माझ्या डोळ्यां समोर तारळतो आहे.. […]
गणपतीसाठी चांदीची,तांब्या-पितळेची भांडी उजळवत होते. माझ्या अत्यंत आवडीचा उद्योग! हळू हळू सगळी पुटं जाऊन लखलखीत झालेली भांडी देव्हाऱ्याचा नूरच पालटतात. ती उजळवत असताना मन पस्तीस एक वर्ष मागे गेलं. […]
समुद्रावरचे आल्हाददायक वारे अंगावर घेत तेनाली रामचा मित्र स्वत:शीच विचार करीत झोपाळ्यावर पहुडला होता. तेनालीरामने त्याला विचारले, “मित्रा कसला विचार करतोस?” तेव्हा तेनालीरामच्या मित्राबरोबर त्याचा संवाद सुरू झाला. […]