साडेतीन मोहर्तातला पहिला गटारी अमावस्या , दुसरा शिमगा , तिसरा एकतीस डिसेम्बर आणि अर्धा एक जानेवारी . या मोहर्तावर थोडी का होईना घ्यावी असे ‘पिता मह दत्तू मामा ‘ यांची आज्ञा आहे . तसेच या प्रसंगी एखाद्यास तरी त्याची ‘दीक्षा ‘ जरूर देऊन हा ‘सम्प्रदाय ‘ वाढवण्यास साहाय्य भूत ठरावे , असेहि त्यांनी प्रतिपादन केले आहे . ‘दीक्षांताचा ‘ विधी पण त्यांनी आपल्या ‘मद्यानंद ‘ ग्रंथात लिहून ठेवला आहे . तो येणे प्रमाणे . […]
यावेळी बऱ्याच वर्षांनी गोव्याला कुटुंबासहीत पर्यटनासाठी जाणं झालं. बऱ्याच म्हणजे जवळपास २२ वर्षांनी. तसं दरम्यानच्या काळात मी एकटा गोव्याला बऱ्याचदा गेलोय, पण ते हवाईअड्ड्यावर आगमन-प्रस्थान येवढ्याच कारणांस्तव. सुशेगाद असा आता प्रथमच गेलो. माझा काॅलेजचा मित्र श्री. दत्ता पाटील गेलं पाव शतक गोव्यात स्थायिक आहे. दत्ता एका बड्या आंतरराष्ट्रीय चेन रिसाॅर्टचा बराच बडा अधिकारी आहे. त्याच्याकडे मागे […]
डॉ.अनिरुद्ध जोशी ते परमपूज्य बापू हा प्रवास एक विलक्षण दैवयोग आहे आणि असा सगळ्याच व्यक्तींच्या नशिबी येत नसतो त्यासाठी काहीतरी पूर्व पुण्याई किंवा नियंत्याची योजना असतेचं. त्यांचे लाघवी व्यक्तिमत्व, मर्यादा राखणारा स्वभाव, करारी बाणा, जनमानसावर आईसारखे निर्व्याज प्रेम करण्याची सवय, दुसऱ्याला मदतीला प्रथम धावून जाण्याचे संस्कार, जाती, धर्म, पंथ, लिंग यात त्यांनी कधीच भेदाभेद केला नाही हे सर्व लेखांतून वेळोवेळी प्रगट होतांना दिसते आणि आता परमपूज्य सदगुरु श्री. अनिरुद्ध बापू झाल्यावरही अजून ते सर्वांना आपले श्रद्धावानमित्र व आप्त मानतात. […]
मला अगदी मी वाचायला शिकलो, त्या वेळेपासूनच वाचायची आवड लागली होती. तेंव्हा परिस्थिती यथातथाच. आमचीच नव्हे, तर बहुतेक सर्वच कुटूंब गरीब म्हणता येतील अशीच. वाचायची आवड शाळेच्या पुस्तकांवर भागवायची कारण इतर पुस्तकं मिळणं अशक्यच होतं. संस्कृतीत सण ही एकच गोष्ट असायची, वाचन वैगेरेही संस्कृतीचा भाग आहे, हे कुणाच्या गांवीही नसायचं. पुस्तकं सोडा, रोजचा पेपर मिळणंही दुरापास्त असायचं. पेपर न घेणं यासाठी, परवडत नाही हे एकच कारण असायचं. […]
नुकतेंच, लोकसत्ता, मुंबई आवृत्तीमध्ये, ‘जे आले ते रमले’ हें सुनीत पोतनीस यांचें सदर सुरूं झालें आहे. या सदरात वर्षभर बरेच उपयुक्त व इंटरेस्टिंग मटीरियल वाचायला मिळेल अशी आशा आहे. परंतु, या सदरात आत्तांपर्यंत जो मजकूर आलेला आहे, त्याबद्दल कांहीं ‘जास्तीची’ (additional) माहिती पुढें ठेवणें मला आवश्यक वाटतें, म्हणून ही प्रतिक्रिया. […]
मंचकरावांनी डाव्या हाताची पालथी मूठ आपल्या भरघोस मिशांवरून फिरवली . अशी मूठ फिरवली के ते विचारमग्न आहेत असे समजावे . ‘हे मंचकराव ‘कोण ? असा प्रश्न विचारणारा आमच्यागावात नवा असावा किंवा मंचकराव जेथे आहेत ते गावतरी नवीन असावे ! त्यांची आई ते जन्मल्यापासून त्यांना ‘मंचकराव ‘च म्हणत असे , म्हणून ते लहान पणापासूनच ‘राव ‘ झाले . तेव्हात्यांच्या ‘राव ‘ असण्यास ज्ञानाचा , अनुभवाचा , वा वयाचा काही एक संबंध नाही ! […]
सीता ते कैकेयी, शूर्पणखा ते मंदोदरी, अहिल्या ते तारा, सार्या स्त्रियांची स्थिती समाजात कुठेतरी ‘खालची’ असलेली दिसते. या लेखात, त्यांच्या एकूण-आयुष्याचें या बाबतीतील अल्प-विवेचन आहे. […]
शेवटी युग पाठक यांना अटक झाली. त्यांना पश्चाताप होत असावा, असं ते स्वत:हूनच पोलीसांसमोर हजर झाले त्यावरून वाटतं. श्री. युग पाठक यांना फारशी शिक्षा होऊ नये असं मला मनापासून वाटतं. कारण, पश्चाताप होणं हेच सर्वात मोठं प्रायश्चित आहे, असं आपलं अध्यात्मही सांगतं. श्री. युगजी पाठक गेले सततचे ९ दिवस या पश्चातााच्या आगीत होरपळले आहेत, येवढी शिक्षा त्यांना पुरेशी आहे. ‘शरण आलेल्याला मोठ्या मनाने माफ करावं’ हे ही भारतीय तत्वज्ञानाशी सुसंगतच आहे..! ’युग’परिवर्तन म्हणतात, ते बहुदा हेच असावं..!! […]
शिवी हा कोणत्याही संस्कृतीचा अविभाज्य भाग असतो. शिव्यांच्या शब्दांवरून, पद्धतीवरून त्या त्या भागातील संस्कृती समजते. कोकणात तर ‘शिवी’ ही ‘ओवी’ म्हणूनच स्विकारली जाते. शिवी देणा-याला काही वाटत नाही आणि घेणा-याला तर त्याहून काहीच वाटत नाही. […]
प्रत्येक व्यक्तीच्या घशात “व्होकल कॉर्ड’’ नावाचा अवयव निसर्गत: असतो. एक अत्यंत पातळ पापूद्र्या सारखा दिसणारा हा अवयव आम्हाला बोलताना किंवा गाताना मदत करत असतो. मी कुठे तरी वाचल्याचं आठवतं की लता दिदीनी आपल्या घशाचा विमा उतरविला आहे. कारण त्यांचा घसा हाच सर्वात महागडा असा अवयव आहे. निसर्गत:च आवाजाची देगणी अनेक कलावंताना लाभलेली असते मात्र प्रत्येक आवाजाचा […]