बंकटमल नावाचे एक व्यापारी होते. चांगला व्यापार करून त्यांनी भरपूर धन मिळविले होते. इतके, की ही संपत्ती ठेवायची तरी कोठे या चिंतेने त्यांना ग्रासलेले होते. त्यामुळे एवढा प्रचंड पैसा असूनही त्यांना सुख म्हणजे काय? हेच माहीत नव्हते. एकदा ते असेच संपत्तीची काळजी करत करत गावाबाहेर फिरायला गेले. सायंकाळ सरत आली होती. पाखरे आपल्या घरट्यात परतत होती. […]
तैमूरलंग हा इतिहासातील एकप्रसिद्ध सरदार. तो पराक्रमी होता परंतु तेवढाच अत्याचारी. हल्ले करून जिंकलेल्या प्रदेशातील लोकांवर तो अत्याचार करायला मागेपुढे पहायचा नाही. अशा लोकांना गुलाम करण्यासाठी तो जबरदस्ती करायचा. एकदा त्याने असेच खूप गुलाम पकडले. त्या गुलामांना विकण्यासाठी तो स्वतः सौदेबाजी करायचा व त्याने ठरविलेल्या भावात सौदा झाला की त्या गुलामांना विकायचा. एकदा त्याने पकडलेल्या गुलामामध्ये तुर्कस्तानामधील […]
महात्मा गांधींना गोरगरिबांविषयी अतिशय आपुलकी व जिव्हाळा होता, आपल्या प्रत्येक कृतीमधून गरिबाविषयीचा कळवळा ते व्यक्त करीत असता. गांधीजींच्या आश्रमात एक तरुण डॉक्टर सेवक होता. तो परदेशातही जाऊन आला होता. मात्र महात्मा गांधींच्या कार्याने प्रभावित होऊन तो त्यांच्या आश्रमात आला होता. आश्रमात येणाऱ्या रुग्णांवर तो गांधीजींच्या सल्ल्याने निसर्ग उपचार करीत असे. एकदा सकाळीच आश्रमात एक आजारी महिला […]
पं. जवाहरलाल नेहरू याच्यानंतर भारताची समर्थपणे धुरा सांभाळणारे लालबहादूर शास्त्री यांचे व्यक्तीमत्त्व कमालीचे सोज्वळ शांत व तेवढेच कणखर होते. स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतल्याबद्दल त्यांनाही अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागला. ते नैनी कारागृहात असताना घडलेली एक घटना. कारागृहात असताना त्यांची पुष्पा अचानक आजारी पडली व थोड्याच दिवसानी तिची प्रकृती गंभीर झाली. घरून निरोप आल्यावर कारागृहातील सहकाऱ्यांनी त्यांना […]
श्री शांतपणे सोफ्यावर कॉफीचा मग घेऊन बसला होता . ‘मानसी इंडस्ट्री’चा मालक श्रीकांत, हजारो नसली तरी शेकडो कोटीची उलाढाल असलेली स्टील इंडस्ट्री . वय फक्त सत्तावीस ! स्वप्नांच्या मागे धावणारा एक वेडा , अशी त्याच्या मित्रात त्याची ओळख होती . […]
गावाबाहेर नदीच्या काठावर एका झोपडीत एक सत्पुरुष राहात होते. ही झोपडी त्यांनी स्वतःच बांधली होती. नदीच्या काठावरच शंकराचे देऊळ होते. तेथे दर्शनासाठी बरेच लोक येत. सर्व लोक निघून गेल्यावर हे सत्पुरुष त्या मंदिरात जायचे व त्या मंदिराची स्वच्छता करायचे. त्यांचा हा दिनक्रमच होता. काही लोक त्यांच्या दर्शनाला यायचे मात्र ते सत्पुरुष कोणाकडे काही मागायचे नाहीत वा […]
सतराव्या शतकात गुजरातमधील अहमदाबादजवळील बावला या गावी एका मुलाचा जन्म झाला. त्याचे नाव ठेवले गेले प्रीतम. तो मुलगा जन्मतःच अंध (सूरक्षस) होता. त्यातच त्याच्या लहानपणी आई-वडिलांचे छत्र हरपले त्यामुळे तो पोरका झाला आधीच अंध, त्यातून निराधार यामुळे प्रीतमचे लहानपणी खूप हाल झाले. भिक्षा मागून तो कसेबसे आपली उपजीविका करीत होता. एका कोणाबरोबर तरी प्रीतम भागवत पारायणाला […]
एक राजा होता. तो फारच चिकित्सक होता. त्याला थोडी जरी शंका आली तरी तो ती शंका लगेच विचारी व शंकेचे निरसन झाल्याशिवाय तो स्वस्थ बसायचा नाही. त्यामुळे त्या राजाबरोबर गप्पा वा चर्चा करायला सहसा कोणीही तयार होत नसत. त्या राजाचे जे राजगुरू होते, त्यांना मात्र राजाची या स्वभावाची पूर्ण कल्पना होती. राजाच्या शंकेचे निरसन करण्यासाठी अनेकदा […]
‘वचनं की दरिद्रता’ असे म्हणतात. माणूस कितीही गरीब वा दरिद्री असला तरी ही गरिबी वा दारिद्र्य प्रत्येक वेळी दाखवायलाच पाहिजे असे नाही. उलट कितीही दारिद्र्य असले तरी आपले बोलणे-चालणे, तसेच आचरणातून ‘ श्रीमंती’ दाखविता येते. त्याचीच ही कथा. एका चाळीतील एका खोलीत एक महिला व तिची चार लहान मुले राहात होती. त्यांची परिस्थिती फारच गरिबीची होती; […]