आधी लोक घराच्या दारावर एक माणूस ठेवायचे. कारण कुणी कुत्रं घरात घुसू नये. आजकाल घराच्या दारावर कुत्रं उभं ठेवतात. कारण कुणी माणूस घरात येऊ नये. ————————————— पुवीॅ माणूस जेवण घरी करीत होता. आणि शौचालय बाहेर होत. आता जेवण बाहेर करतो आणि शौचालय घरात आहे. _________ पुवीॅ लग्नात घरच्या स्रिया जेवण बनवायच्या. आणि नाचणार्या बाहेरून यायच्या. आता […]
माझे नुकतेच लग्न झाले होते. मी मे महिन्याच्या अश्याच एका गरम दुपारी आपल्या वडिलांसोबत थंडगार पन्हे पीत बसलो होतो. मार्च मध्ये माझे लग्न झाले होते आणि माझ्या वडिलांनी माझ्यात झालेले बदल अनुभवले होते. मी मित्रांना टाळत होतो, भेटी कमी झाल्या होत्या. बायको सोबत गुलुगुलु बोलणे हा माझा आवडीचा विषय झाला होता. मित्रांना टाळून आम्ही सिनेमाला जात […]
बायकांचा रोज मूड वेगळा असतो -कधी जाम खुश असतात – कधी चिडचिड करतात – कधी सगळ्या जगाचा राग येतो – कधी आपल्यावरच कसे कसे अत्याचार झाले हे आठवतं – कधी रोमँटिक असतात – कधी आवराआवरीचा मूड असतो – कधी राहू दे पसारा , कोण बघतंय असं असतं – कधी शॉपिंग करायचं असतं – कधी घराबाहेर पण […]
काल दि.15 मे. रोजी धक धक गर्ल माधुरी दिक्षीत (नेने)हीचा वाढदिवस देशभरात मोठ्या उत्साहानं पार पडला. खरचं तिचं 51 व्या वर्षात पदार्पण, रात्री झोप लागेपर्यंत विचार करीत होतो , उत्तर सापडलेच नाही. . परवा एका whatsup group वर असाच एक message आला. ‘एका नवर्याचे मनोगत- लग्नाआधी नाजूक, सुंदर असलेली बाहुली लग्नानंतर बाहुबली केव्हा होते कळतच नाही’. […]
अहो हे सोडे म्हणजे काय नुसता खायचा पदार्थ वाटला काय तुम्हाला? की टाकली जाळी, काढला समुद्रातून, वाळवला, शिजवला, खाल्ला आणि झालं. अहो सोडे म्हणजे आमचा जीव की प्राण, आमची अस्मिता – आमची शान, आमच्या जीवनाचा अविभाज्य घटक वगैरे वगैरे. या सोड्यांच्या गप्पांवरपण आम्ही तास दोन तास घालवू शकतो. दिवाळीत भेट म्हणून आलेल्या प्रशांत कॉर्नर च्या चमकदार मिठाईच्या बॉक्सकडे जसं प्रेमाने बघतो ना त्या पेक्षा जास्त प्रेमाने टेबलावर आणून ठेवलेल्या सोड्याच्या पिशवीकडे पाहतो आम्ही. […]
मातीकडून घेतलेल्या जीवनरसाचं देणं, सुगंधाच्या रूपात निसर्गाला परत करायचंय. उपकारांची परतफेड करायची आहे याची जाणीव आहे त्याला. कृतघ्न व्हायला…तो काही माणूस नाही नं. […]
जपानी काव्य : जपानीमध्ये अनेक काव्यप्रकार आहेत, जसें की हायकू, तांका, रेंकु वगैरे. त्यातील हायकू हा प्रकार जगप्रसिद्ध झालेला आहे. हायकूमध्ये सहसा निसर्ग-चित्रण आढळते. पण हल्ली इतर विषयांवरही हायकू लिहिले जातात. मृत्यूचा उल्लेख असलेली ही कांहीं उदाहरणें (भाषांतरित) – All the time I pray to Buddha I keep on killing mosquitoes – Kaboyashi Issa (मध्ययुगीन कवी) […]
आपण विविध भाषांमधील, मृत्युविचार express करणार्या काव्यावर ज़रा नजर टाकूं या. ‘जो न देखे रवि । सो देखे कवि ।’ अशी उक्ती आहे. त्यामुळें, हें पाहणें interesting ठरेल की कवींच्या नजरेतून मरण कसें दिसतें. […]