घट्ट स्लॅक आणि टाईट कुर्ता घातलेली, चालती-फिरती आधुनिक जिवंत ‘शिल्पं’, त्या प्राचिन दगडी शिल्पांचीच आठवण करून देतात. अश्या समाजमान्य कपड्यांत, हाफ आणि क्वार्टर पॅन्टीत किंवा बिकीनीत काढलेले फोटो बिनधास्त फेसबुकवर शेअर केले जातात, त्यात कुणाला वावगं, अशिष्ट, अश्लील असं काहीच वाटत नाही. फेसबुकलाही वाटत नाही. […]
मृत्यू हा जीवनाशी-संबंधित इतका मूलभूत विषय आहे की, साहित्यात त्याचा उल्लेख वारंवार येतोच. त्याचा अल्पसा आढावा आपल्याला मृत्यूकडे अधिक डोळसपणें पहायला मदत करेल असा अंदाज करायला हरकत नसावी. विविध भाषांमधील जुन्यानव्या कवींनी मृत्यूबद्दल काय लिहिलें आहे, त्यांचा काय-कसा approach आहे , याबद्दल मनात कुतुहल निर्माण झालें , व त्या जिज्ञासेपोटीं कांहीं वाचन-मनन-चिंतन केलें. त्या मंथनातून मिळालेली कांहीं माहिती मी share करत आहे. […]
खळाळून वाहणारी कृष्णा नदी, तिच्या तीरावरील सुंदर दगडी घाट व रेखीव देवळं त्यात चितारली होती आणि त्या पेंटिंगच्या खाली १९६७ मध्ये प्रदर्शित झालेल्या एका मराठी चित्रपटातील गीताच्या दोन ओळी लिहिल्या होत्या…….. […]
एका जर्मन कंपनीच्या कृषी विभागातर्फे आठ वर्षे कोकणात भटकंती करत असताना इंग्रजांच्या काळातील असा एकही पूल शिल्लक राहिला नाही जिथे थांबून पुलावर लावलेल्या दगडावरील (प्लेक्) माहिती मी वाचली नाही. ३४ वर्षांपूर्वी कोकण रेल्वे अस्तित्वात आली नसल्यामुळे रस्त्यांवरूनच प्रवास करावा लागत असे. मोबाईल अस्तित्वात आला नव्हता व चांगल्या कॅमेऱ्यांच्या किमती आवाक्याबाहेर असल्यामुळे फोटो काढणे शक्य नव्हते. पूल […]
का वागतो आम्ही असे? या जगात दोन व्यक्तींची तुलना होऊ शकते? प्रत्येक व्यक्तीत एक पूर्णपणे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व लपलेलं असतं व त्याला किंवा तिला स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्याची पूर्ण मुभा असायला हवी, असं तुम्हाला नाही वाटत? जोपर्यंत या जगातील दोन व्यक्तींच्या अंगठ्यांचे ठसे तंतोतंत जुळत नाहीत, तोपर्यंत दोघांमध्ये तुलना करण्याचा या पृथ्वीवर कोणालाही अधिकार नाही. अगदी जन्मदात्यांनाही! […]
जगातल्या संपूर्ण मानव जातीतल्या संस्कृतीत स्त्रीचे नेमके स्थान काय? वरवर सोपा वाटणाऱ्या या प्रश्नाच्या खोलात जसजसे आपण जाऊ लागतो तसतसे प्रश्नांचे जाळे आम्हाला चारही बाजूनी वेढू लागते. स्त्रीयांची शेकडो रूपे जगभरातल्या सर्वच प्राचीन अतिप्राचीन ग्रंथात व आधुनिक वाडमयात विखूरलेली आढळतात. यातील एक रूप म्हणजे वारागंना, गणिका, वेश्या. अमरकोशात हे सर्व शब्द समानअर्थी मानले गेले आहेत. ‘मेधातिथी’ […]
माझ्या लहानपणा पासून अनेकजण असे म्हणतानां मी ऐकले आहे की- ‘’ सिनेमामुळे मुलं बिघडतात.’’ त्यापूर्वी असे म्हटले जाई की नाटक वा तमाशामुळे मुलं बिघडतात. त्याही पूर्वी असे म्हटले जाई की नवीन शिक्षणामुळं मुलं बिघडतात… मला पडलेला प्रश्न असा आहे की नाटक, तमाशा, सिनेमा वगैरे वगैरे कलां १८ व्या शतका पासूनच्या आहेत. मग त्यापूर्वी माणसं मुलं बिघडतच […]
जन्मत: प्रत्येक माणसाच्या शरीरात ताल आणि मनात लय असतेच. अगदी लहान बाळ पण आईच्या अंगाई गीताने किंवा बाबाच्या चुटकीने क्षणभर का होईना रडायचे थांबतेच ना !!! खरं तर लक्षपूर्वक आपण निसर्गातले ध्वनी ऐकायला शिकलो तर त्यात नक्कीच लयबद्ध ताल ऐकू येईल. जसजशी आपली वाढ होत जाते तसतसे मग कानावाटे सूर मनात तर शरीराद्वारे ताल शरीरात भिनत […]
जे.जे. चा अप्लाईड आर्ट मधून पासआऊट होऊन वर्ष दिड वर्षे झाले असावे. नांदेडला माझ्या मोठ्या बंधूच्या घरा शेजारी गिरिश नार्वेकर नावाचे महाराष्ट्र शासनातील अधिकारी रहात असत. कला साहित्य सामाजिक क्षेत्रातील आवड त्यामुळे चांगला घरोबा होता. एकदा घरी आले असतानां त्यांनी माझी चौकशी केली व मला म्हणाले- ‘’ तू जे.जे.चा विद्यार्थी मग इथे काय करतोस.? माझ्या बरोबर […]