रेडिओ सिलोन, विविध भारती व ऑल इंडिया रेडिओ या आकाशवाणी केंद्रानी आपल्या देशातील संगीताची विशेषत: चित्रपट संगीताची जेवढी भूक भागवली असेल तेवढी आजतागयत कोणत्याही रेडिओ केंद्राने भागवली असेल असे मला तरी वाटत नाही. एक संपूर्ण पिढी या संगीतावर पोसलेली आढळून येईल. मी तर धाडसाने असे म्हणेन की या संगीताने आमच्या काळातील पिढीला कधीही आत्महत्येचा विचार मनात […]
कथा, कादंबरी, नाटक,कविता… साहित्य प्रकार कुठलाही असो त्यातील शब्द हेच महत्वाचं हत्यार असतं. या हत्याराला वाक्यांची दमदार मूठ लावली की साहित्यातली शब्दकळा फुलू लागते. प्रतिभावान लेखक कवी मग एक ओघवती भाषशैली निर्माण करतो आणि आपण त्यात गुंतून जातो. मात्र चित्रपटात फक्त अशी भाषा असून चालत नाही कारण ते दृकश्राव्य माध्यम आहे. चित्रपटात कथा कादंबरी सारखे हवे […]
मंडळी , पहाटेचे ४.३० वाजलेले, सिंहगडाच्या पायथ्याशी कोंढणपूर नामक एका गावात निर्मिती फार्म्च्या खोलीत बसून खिडकीतून बाहेर अविरत बरसणारा पाऊस अाणि रातकिड्यांची किरकिर….. कधी कधी असा एकांत अापल्याला अंतर्मुख करून जातो……अख्खा जन्म पुरणार नाहि इतकं निसर्ग सौंदर्य अापल्या अाजूबाजूला असतं , पण निव्वळ ऐहिक सुखाच्या मागे लागून अापण असे क्षण जगायचंच विसरून जातो…..बघा कधीतरी असं पहाटेचं […]
महाराष्ट्राला वारकरी सांप्रदाय ही खूप मोठी अध्यात्मिक देणगी लाभलेली आहे.त्यातील वारी हा अविभाज्य भाग. दर आषाढ- कार्तिक महिन्यात असंख्य दिंड्या निघतात. पताका खांद्यावर घेऊन , टाळ आणि मृदंगाच्या गजरात ह्या दिंड्या पंढरीकडे आगेकुच करतात. हरिनामाचा घोष होतो. उत्साही वातावरण असते. मजूर, शेतकरी, व्यावसायिक सर्वच स्तरातील माणसं वारीत सहभागी होतात.आनंदाचे डोही, आनंद तरंग ची अनुभुति घेत.मुलांसाठी हा […]
सरंजामशाही, हुकूमशाही, राजे शाही वा जमिनदारी या सर्वच शोषणावर उभ्या असतात. त्यामुळे या व्यवस्थेतील माणसे बहूतांशी संवेदनहीन असतात… हे एक वैश्विक सत्य आहे आणि हे वास्तव आपण नाकारण्यात अर्थ नाही. प्राचीन काळा पासून भारतीय समाज या सर्वाचाचं अनुभवही घेत आला आहे. ब्रिटीश वसाहतवादी होते व त्यांना आपले साम्राज्य जगभर पसरवायचे होते. ते दूरदर्शी व चलाखही होते […]
मला कुत्रा या प्राण्याची फार ओढ. मलाच कशाला, आमच्या घरातील सर्वांनाच कुत्रा प्रिय. तसे सर्वच प्राणी आम्हाला आवडतात, परंतू मुंबईसारख्या शहरात त्यातल्या त्यात कुत्रा पाळणं सोयीचं, म्हणून कुत्रा एवढंच. मांजरही तशी छान वाटते, पण तिचा आपल्या विषयी पुरेसा विश्वास पटेपर्यंत ती काही आपल्या वाऱ्याला उभी राहात नाही. आणि एकदा का ती आपली झाली, की तिचा स्वत:चा […]
आपला देश ब्रिटिशांच्या जोखडातुन मुक्त व्हायला आणखी २७ वर्षांचा कालावधी होता. दिल्लीतल्या बल्लीमारन या वस्तीत नेहमी प्रमाणेच धावपळ असायची. माणसांची गर्दी, कामाच्या ओढीने बाहेर पडणारे जथ्थे, हातगाडी वाले, मध्येच वाजणाऱ्या सायकलरिक्षांच्या घंटा वगैरे..काहीशा अंधारलेल्या या गल्लीच्या शेवटी काही जुन्या उदासिन हवेल्या पण होत्या. आताही आहेत. अशा प्रकारची एकतरी गल्ली भारतातील सर्वच शहरात आजही आढळते. “सौदागरन” अशी […]