अमृतसरच्या एका गावातून रोज एक फकीर गाणी म्हणत जायचा आणि त्याच्या मागे मागे एक चिमुरडा फकीरच्या पाठोपाठ तीच गाणी म्हणत त्याचा पाठलाग करायचा. फकीर कुठे आराम करण्यासाठी थांबला तर त्या वेळात त्या गाण्यांचा सराव हा चिमुरडा करायचा, हे अगदी रोज घडायचं. एक दिवस या छोट्या मुलाला ती गाणी म्हणताना त्या फकिराने ऐकलं, त्याला कडेवर उचलून घेत […]
सकाळचा उत्तराखंडातल्या नैनीताल जिल्ह्यातील रामनगर ते जुनी दिल्ली असा प्रवास, ‘रामनगर -दिल्ली संपर्क क्रांती लिंक एक्सप्रेस’ अशा त्या रेल्वेसारख्याच लांबलचक नांवाच्या रेल्वे गाडीनं केला. उत्तर प्रदेश-बिहारकडच्या रेल्वेप्रवासातील गर्दीच्या काही फिल्म्स डिस्कव्हरी-नॅशनल जिओग्राफीक चॅनलवर पाहील्या होत्या, त्या प्रत्यक्ष अनुभवल्या. ‘फेव्हीकाॅल’ची ती गाडीला माणसं चिकटलेली प्रसिद्ध निशब्द आणि पकिणामकारक अॅड तिच्या निर्म्यात्याला बहुतेक इथेच सुचली असावी असं मला […]
अर्ध्या तासापुर्वी माझ्या गर्लफ्रेंडचा कॉल आलेला… अगदि ऒक्साबोक्शी रडत होती… वाटलं सासू गचकली , ईतका सिरियस मॅटर…… विचारावं तर भोकाड जोरात सुरू होणार… तरी आंजारून गोंजारून विचारलच… पर्यायही नव्हता… विचारलं अरे बाबा काय झालं? तर म्हणे आईशी वाद झालाय.. “म्हणजे अंदाज बरोबर” कारण काय तर उद्या 31 मार्च jioरिचार्ज करायचय … आणि आईऩे करायचा नाही अस […]
प्रत्येक सजीवाला मृत्यू आहे. जो जन्मतो तो एक दिवस मरतो. माणसाचेही तसेच आहे.तोही मरण पावतो. एकदा शरीरातून प्राण निघून गेला की शरीर निजिर्व होते. मग आप्तस्वकीय दु:ख व्यक्त करतात. रडतात. आक्रोश करतात. त्या व्यक्तीच्या कर्मावर , वयावर या दु:खाची तीव्रता अवलंबून असते. जी व्यक्ती आपल्या जवळ वावरलेली असते.तिचा लळा लागलेला असणे. तिच्या कर्तत्वामुळे अनेकांचे भले झालेले […]
हरीद्वारला आमचा मुक्काम विष्णू घाटावरील एका लहानश्या आणि बऱ्याश्याही हाॅटेलात आहे. हाॅटेलातील रुमच्या खिडकीतून समोर अव्याहत वाहणाऱ्या गंगेचं सततच दर्शन होतं असतं. वेगानं वाहणारी गंगा, तिचा वाहताना होणारा आवाज, दिवसाच्या वेळी जाणवत नसला तरी, रात्री दहानंतरच्या निरव शांततेत हा आवाज मंत्रजागरासारखा जाणवतो. किंचित हिरवट झांक असणारं ते पाणी गेली कित्येक शतकं तसंच वाहतं आहे आणि पुढेही […]
आज हरीद्वारला आलो आहे गंगाजींच्या दर्शनाला. हिला गंगा नाही, गंगाजी बोलायचं. खरंच आहे ते, हिन्दू संस्कृतीच्या शेकडो पिढ्यांच्या पोषणकर्तीला अरे-तुरे करून कसं बोलावणार..? पण आपल्या मराठी भाषेत ‘अहो-जाही’ किंवा ‘जी’ वैगेरे बोललं की उगाच अंतर पडल्यासारखं वाटतं. जेवढी व्यक्ती प्रिय, आपली, तेवढी ती अरे-तुरेतली. आईला कुठं आपण अहो म्हणतो? कुठल्या देव-देवीला कुठं अहो-जाहो करतो आपण? आणि […]
‘विरारच्या नॅशनल शाळेत इयत्ता ४ च्या विद्यार्थ्यांसाठी इतिहासाचे पुस्तका’चं एक पान आज एका ग्रुपवर वाचनात आलं. त्यात तानाजी मालुसरे ह्यांचे टोपण नाव “सिंह” होते असा स्पष्ट उल्लेख आहे. कोंढाण्याच्या लढाईत तानाजी मालुसऱ्यांना वीरमरण आले म्हणून कोंढाण्याचे नाव “सिंहगड” असे ठेवले असा इतिहास असताना, तानाजी मालुसरे ह्यांचे टोपण नाव “सिंह” होते, त्यामुळे कोंढाण्याचे नाव बदलून सिंहगड ठेवले […]
अलीकडे योग, ध्यान (मेडीटेशन, समाधी हो..!) वैगेरे शब्दांची चलती आहे आणि साहजिकच आहे, आणि ज्याची चालती असते त्याच व्यापारीकरण होतेच. त्यामुळे ध्यान, योगचे (‘’योग’साठी आपण ‘योगा’ हा तद्दन चुकीचा शब्द वापरतो. चुकीच इंग्रजी आत्मविश्वासाने शिकवल्याचा आणि शिकल्याचा हा परिणाम. ‘राम’सारख्या देवाचा ‘रामा’गडी या मुळेच झाला. असो, हा विषय वेगळा..!!) काही चलाख लोकांनी व्यापारीकरण केल असल्यास त्यात […]
पहाट होते.जाग येते.सूर्य उगवतो . तसा वेध लागतो.उरक वाढतो. आंघोळ होते . सकाळचा चहा होतो. आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम सुरू असतात. नियमितपणे. बातम्या , भक्तीसंगीत, आरोग्याचे कार्यक्रम वगैरे. जेवणाचा डबा तयार होतो. तोपर्यंत असते दारात हजर वर्तमानपत्र . ठळक बातम्या आणि संपादकीय पानावर लेख वाचण्याची मजा काही औरच. पक्षांचा किलबिलाट.. मंदिरातील घंटा घण्- घण वाजते. सूर्य किरणं […]