साहित्य
विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…
नलिनी पुंडलिक गोखले – शंभर नाबाद
एक व्यक्ती विशेषतः स्त्री, जगाशी संघर्ष करीत, संसार पुढे पुढे रेटत असते, कठीण परिस्थितीतून मार्ग काढत असते तेव्हा तिचं कौतुकच करावं तेवढे थोडेच ! या शंभर वर्षांचा त्यांनी कथन केलेला त्यांच्या इतिहास चित्रपटासारख्या माझ्या डोळ्यां समोर तारळतो आहे.. […]
गणपतीच्या आठवणी
गणपतीसाठी चांदीची,तांब्या-पितळेची भांडी उजळवत होते. माझ्या अत्यंत आवडीचा उद्योग! हळू हळू सगळी पुटं जाऊन लखलखीत झालेली भांडी देव्हाऱ्याचा नूरच पालटतात. ती उजळवत असताना मन पस्तीस एक वर्ष मागे गेलं. […]
आनंदी व्हा
समुद्रावरचे आल्हाददायक वारे अंगावर घेत तेनाली रामचा मित्र स्वत:शीच विचार करीत झोपाळ्यावर पहुडला होता. तेनालीरामने त्याला विचारले, “मित्रा कसला विचार करतोस?” तेव्हा तेनालीरामच्या मित्राबरोबर त्याचा संवाद सुरू झाला. […]
लेखणीचा शिपाई – प्रेम चंद
इयत्ता पाचवी पासून मला हिंदी व इंग्रजी हे दोन विषय शालेय अभ्यासक्रमात सुरु झाले. बहुतेक सहावीत असताना मुन्शी प्रेमचंद यांचा एक धडा हिंदीच्या क्रमिक पुस्तकात वाचलेला अजूनही आठवतोय.. साध्या सोप्या भाषेतील, कौटुंबिक पार्श्वभूमीवरील ती एक कथा होती. […]
व्यवस्थेचे गुलाम
१. कर्नल सावंत निवृत्त होणार होते. आतापर्यंत त्यांनी कधी निवृत्तीचा व विशेषत: निवृत्तीनंतर कुठे रहायचं, याचा विचारच केला नव्हता. सीमेवर देशाची सेवा करतांना प्राण पणाला लावणाऱ्या सैनिकाला निवृत्तीचे बेत आंखायला वेळ नसतो. सीमेवर तीक्ष्ण नजरेने पहाणारा सैनिक आपल्या भविष्याकडे कधीच नजर लावून बसत नाही. कर्नल सावंत याला अपवाद नव्हते. अतुलनीय पराक्रमाबद्दल मिळालेली पदके छातीवर अभिमानाने लावायची, […]
तेनालीरामाचे वाक्चातुर्य
तेनाली रमण एकदा सपत्नीक मित्राच्या विवाहास जात होते. लग्नसमारंभाला जायचे म्हणून पत्नी महागडी साडी आणि दागिन्याने लखलखलेली होती. चारचौघात उठून दिसावे म्हणून तिने सर्व काळजी घेतली होती. […]
मोटर शर्यतीतील गतीची सम्राज्ञी शर्ले मलडावनी
‘मी गतीचे गीत गाई’ हे बाबा आमटे यांच्या एका गीतासारखे बोल रक्ताच्या थेंबाथेंबात जागवतच शर्ले मलडावनी हिचा अमेरिकेत जन्म झाला असावा! लहानपणी हायस्कूलमध्ये शिकत असतानाच न्यूयॉर्कमधील शेनेक्टॅडी (Schenectady) येथील रस्त्यांवरील शर्यतीत आपल्या गावातील मुलांबरोबर शर्ले दांडगाईने वागत असे. […]
‘श्रीं’चे सदगुण
अनंतचतुर्दशी मावळली. घरोघरीच्या गजाननाच्या मातीच्या मूर्ती आता विसर्जित झाल्या आहेत. हळूहळू वातावरणातला जल्लोष मावळेल. परततानाची रिकामी तबकं पाहून डोळे किंचित भरून येतील. दरवर्षी हे सारं असंच होतं. […]