एक धनगर मेढया चरायला सोडुन ढोल वाजवत बसला होता. त्याने पाहीलं की ढोलच्या आवाजाने एक हरीणी त्याच्या शेजारी येऊन बसली. जसजशी त्या ढोलवर धनगराची थाप पडायची तसतसं त्या हरीणीच्या डोळ्यांतुन अश्रु यायचे. एक दिवस गेला. दोन दिवस गेले, तीन, चार, पाच दिवसांमागुन दिवस गेले. पण परिस्थिती काही बदलत नव्हती. धनगर जसजसं ढोल वाजवायचा ती हरीणी तिथे […]
पांडबाच्या छपराच्या भोवताली धूर घोटळत होता.निळ्या रंगात वस्ती गुडूप झाल्ती.वस्तीवर सगळ्या घराच्या चुली पेटल्या होत्या.मसाला भाजल्याचा वास येत होता.काहीतरी गोडधोड ,मसालेदार खाण्याचा बेत सार्या वस्तीचा असावा असे वाटत होते. वस्ती धुंदाळल्यासारखी भासत होती. काळ्या कॅरीबॅगा वार्यानी उडून जात तराडाच्या झाडाला गुतल्या होत्या.येणारा जाणाराच्या नजरा रोखत होत्या.पळापळ वाढली होती.पोर्ही-सोरी लगबगीन इकडं-तिकडं पळत होत्या.गोठयातली जनावरं कावरी-बावरी झाली होती. […]
अत्यंत रोमहर्षक, उत्कंठावर्धक कादंबरी… उत्कंठावर्धक कादंबरी लिहिण्यासाठी खजिन्याचा शोध हा रुळलेला प्रकार बघावयास मिळतो. हॉलिवुड पटांमधली निकोलस केजची नॅशनल ट्रेजर सिरीज किंवा हैरिसन फोर्डची इंडियाना जोन्स सिरीज अश्याच पठडितल्या कथांची उदाहरणे… अशीच एक उत्कंठा लावणारी कथा ती पण मराठी मध्ये नाशिकच्या मुरलीधर खैरणार यांनी लिहिली आहे. शोध…राजहंस प्रकाशन.. या कादंबरीचे मुखपृष्ठच इतके सरस आहे की कादंबरीचे […]
दादरचं खोदादाद सर्कल माहित नाही असा निदान मुंबईत तरी माणूस नाही. महानगरपालिकेच्या दप्तरात व बीईएसटीच्या बसवर जरी ‘खोदादाद सर्कल’ असं नांव असलं तरी हे सर्कल सामान्यजनांत मशहूर आहे ते ‘दादर टी. टी.’ या नांवाने. या नांवातील ‘टी.टी.’चा फुलफाॅर्म ‘ट्राम टर्मिनस’ असा आहे. पूर्वीच्या ट्राम्स इथपर्यंत येऊन, या सर्कलला वळसा घालून पुन्हा कुलाब्याच्या दिशेने परतीच्या प्रवासाला निघत, […]
विदर्भातील एका शहरात सहज भरकटत होतो. सकाळची वेळ असून ही उन्हं चांगलचं चटकत होतं. रसत्यावर गर्दी होती. खरं तर आम्ही चहाच्या शोधात होतोत. फुटपाथवर अनेक टप-या थाटलेल्या होत्या. त्यात चहाच्या टप-या ही होत्या.पण त्यात स्वच्छ तर एक ही नव्हती, पॉश पण नव्हती. अस्वच्छ होत्या. किळसवाण्या होत्या. त्यावर ही लोकांची झुंबड उडालेली होती.आम्हाला पाॉश हॉटेल हवं होत.बरीच […]
‘पिकलेले केस व उरलेलं टक्कल’ या विषयावर काल लिहीलेल्या लेखात टकलाचे फायदे-तोटे या विषयावर लेखाच्या विस्तारभयास्तव लिहीण्याचं मुद्दामहून टाळलं होतं. ते आता लिहीतो. फायदा दिसल्याशिवाय कोणी कुठेही पुढे जात नाही म्हणून माझ्या दृष्टीनं टकलाचे फायदे काय, ते पहिलं सांगतो. टकलावर तेल लावायची आवश्यकता नसते. लावून उपयेगच नसतो. त्यामुळे तेलाचा व केस नसल्यामुळे केसाला लावायच्या कलपाचाही खर्च […]
दिल जवाँ हो, तो बेबसी कैसी.. सफेद बालों की, ऐसी की तैसी..!! या ओळी वाचल्या आणि मला केसांवर काहीतरी लिहावं असं वाटू वागलं..केस (अर्थात पुरूषांचे. स्त्रीयांच्या केशसांभारावर ग्रंथच्या ग्रंथ लिहीले गेलेत) शरिराच्या शीर्षभागी असुनही त्यावर फार काही लिहीलं गेलं नसावं असं मला वाटतं. माझे केस लवकर गेले आणि उरलेले त्याही अगोदर पिकले. मी केस रंगवायचा प्रयत्न […]
नमस्कार मंडळी. जगातील सर्वात मोठ्या बळीराजाच्या वैकुंठधामात आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आमच्या देशाच्या महाराष्ट्र नावाच्या राज्यातील हा भाग एकेकाळी विदर्भ व मराठवाडा या नावांनी ओळखला जात असे. पण आता शेतकऱ्यांच्या या स्मशानभूमीला जगभरात प्रसिध्दी मिळाल्यामुळे विदर्भ व मराठवाडा ही नावं इतिहासजमा झाली आहेत आणि हे जगाच्या नकाशावरील एक महत्त्वाचं पर्यटनस्थळ झालं आहे. पाचशे एकरात पसरलेल्या […]
नुकत्याच झालेल्या ‘महाराष्ट्र दिना’बद्दल काहीतरी लिहावं म्हणून लिहायला बसलो होतो. ह्या दिवसाबद्दल लिहायचं तर महाराष्ट्र, देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात होऊन गेलेल्या विभूती आणि देशरक्षणार्थ वेळोव्ळी धावलेला महाराष्ट्र याचा थोडक्यात आढावा घ्यावा लागतो. आणि असा आढावा घेताना पहिलं नांव चटकन मनात येतं आणि बोटातून बेशुद्धतही उतरतं, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं..! ह्या नांवाला महाराष्ट्रात सोडा, देशातही पर्याय […]