गुरूवार दिनांक १३ एप्रिल २०१७ हा दिवस बोरिवलीकरांच्या, विशेषत: प्रबोधनकार ठाकरे सभागृहात उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या, कायमचा स्मरणात राहील. या दिवशी या वर्षातल्या सर्वात देखण्या आणि भारदस्त कार्यक्रमाला उपस्थित राहाण्याचा योग बोरिवलीकरांना आला. कार्यक्रम होता बोरिवलीच्या ‘जनसेवा केंद्रा’ने आयोजित केलेला जगद्विख्यात सिद्धहस्त चित्रकार श्री. वासुदेव कामत यांच्या सत्काराचा आणि तो ही साक्षात परमपुजनीय सरसंघचालक डाॅ. मोहनराव भागवतांच्या […]
पहाटं पहाटं कावळे मास्तर नि शेरगाव गाठलं. झावळातच गडी ग्रामपंचायती समोर हजर. गाडी उभी केली.उपरण्याने आळपलेले थोबाडं मोकळ केल. इकडं तिकडं पाहिलं .कुणाचाच पत्ता नव्हता. कुणाचा म्हंजी पथकातलं एक ही मेंबर अजून टपकालं नव्हता. सीयोची आडर असल्यामुळे येतेल सारी. पण कोणं टॅन्शाॅन घेत एवढं ? ग्रामपंचायतीचा चपराशी सुदाक आला नव्हता अजून… आता काय करावं म्हणून मास्तरं नी […]
तिचे वडील इटालीतील एका छोट्या गावाचे महापौर होते. त्यामुळे गावातील अनेक लोक आपल्या छोट्या-मोठ्या समस्या घेऊन त्यांच्याकडे यायचे. या समस्यांमधून तिच्या बालमनाला लोकांच्या व्यथा कळायच्या व या व्यथा ऐकून तिचे बालमन कळवळायचे. याच व्यथा तिने शब्दबद्ध करायचे ठरविले व आपल्या साहित्य कृतीमधून त्या सादर केल्या. जीवनाचा वेध घेणाऱ्या या साहित्यकृती एवढ्या जबरदस्त होत्या की, मोठेपणी त्या […]
शांती आणि सद्भावना जगात सर्वत्र नांदावी असे तिला लहानपणापासूनच वाटायचे कारण तिच्यावर तिच्या वडिलांचा फार प्रभाव होता आणि वडील होते याच तत्त्वांचे कट्टर पुरस्कर्ते. वडिलांचे स्वप्न साकारण्यासाठी तिने मोठेपणी समाजकार्य सुरू केले व १९४६ मध्ये शांतीसाठी तिला नोबेल पुरस्कारही मिळाला. नोबेल पुरस्कार मिळविणाऱ्या या महिलेचे नाव होते एमिली ग्रीन बालय. वायएमसीए के लीडर जॉन आरमांट यांच्याबरोबर […]
कोणत्याही परिस्थितीत आपण डॉक्टर व्हायचेच हे तिचे लहानपणापासूनचे स्वप्न होते. वैद्यकीय शिक्षण फार अवघड असते हे तिला घरातील लोकांनी व इतरांनी सांगून पाहिले. मात्र ध्येयापासून ती किंचितही ढळली नाही. कठोर परिश्रमाच्या आधारे सर्व अडथळे पार करून ती अखेर डॉक्टर झाली व नंतर रोगाबाबत तिने असे काही संशोधन केले की, अनेक मोठ्या रोगांवरती उपाय शोधणे सहज सोपे […]
ज्या साहित्यिकांनी आपल्या लेखनाद्वारे पूर्व-पश्चिम जोडण्याचे म्हणजेच विश्वबंधुत्व जपण्याचे कार्य केले. त्यामध्ये अमेरिकेची प्रसिद्ध लेखिका पर्ल बक (Pearl Buck) हिचे नाव अग्रभागी आहे. पर्ल बक अमेरिकेत जन्मली, चीनमध्ये वाढली व आयुष्याच्या अखेरीस ती पुन्हा अमेरिकेत येऊन राहिली. पर्ल बकचा जन्म २६ जून १८९२ रोजी अमेरिकेतील हिल्स बार येथे झाला. बालपणी तिचे नाव होते पर्ल सिंडेस्ट्रायकर. तिचे आई-वडील […]
सीन नं – 1 वेळ – रात्रीची ठिकाण – निर्जन रस्ता ( बॅकग्राऊंडला रातकीड्यांचा वैगरे आवाज येतोय ) एक तरुणी ( जॉब वरून आलेली ) रस्त्याने हातात मोबाईल घेऊन चालतेय. ती दोन चार पावले चालल्यानंतर तिचा मोबाईल वाचतो … ती तरुणीः- मोबाईलवर… हा ! आई बोल अगं ! आज ऑफीसमध्ये जरा जास्तच काम होत त्यात […]
भक्ती मग ती कोणावरही असो अगदी मनापासून केली की ‘अर्पण’ करण्याची वृत्ती दिवसेंदिवस वाढतच जाते. अशा अर्पण केलेल्या भक्तीचा महिमा अगाध असतो. या संदर्भात आचार्य विनोबा भावे यांना त्यांच्या लहानपणी त्यांच्या आईने सांगितलेली गमतीदार गोष्ट पुढीलप्रमाणे आहे… एका गावात एक स्त्री राहात होती. गावात श्रीकृष्णाचे मंदिर होते. त्या मंदिरातील कृष्णाच्या मूर्तीवर या स्त्रीची अपार भक्ती होती. […]