आज श्रीराम नवमी. मर्यादा पुरुषोत्तम रामाची महती सांगणारे अनेक मेसेज अनेकांडून प्राप्त झाले. मला त्यात मात्र गम्मत दिसली. आपण किती स्टिरिओटाईप वागतोय याचं उदाहरण म्हणजे अशा शुभदिवशी आपल्या मोबाईलमधे येणारे अनेक उत्तमोत्तम मेसेज. आता यात गम्मत अशी, की ‘मर्यादापुरुषोत्तमा’ची फाॅरवर्डेड महती सांगणारे मेसेज पाठवणारे असे किती जण प्रत्यक्ष आयुष्यात ‘मर्यादापुरूषोत्तमा’ची भुमिका खरोखरंच बजावत असतात. माझ्या मते […]
कर्मधर्म संयोगाने अामच्या ठाणे शहराच्या नावातलं शेवटचं अक्षर पण णे असल्यामुळे अाणि संगीतविषयक अतिरथी—महारथी अामच्याकडेहि असल्याने अाम्हाला पण जाज्वल्य अभिमान असणारंच ना ! […]
प्रत्यक्ष कर्म केल्याने जो आनंद मिळतो तो कदाचित त्याचे फळ मिळाल्यानंतर मिळतोच असे नाही. म्हणूनच निष्काम कर्माला जास्त महत्त्व आहे. एक राजा होता. त्याने राज्यातील शेतकऱ्यांना सांगितले, तुम्ही शेतात फुकटचे का राबता,, वर्षाला जेवढे धान्य लागेल ते देण्याची जबाबदारी माझी. या निर्णयाने जवळजवळ सर्वच शेतकरी सुखावले ते म्हणाले की, बरे झाले. नाही तरी आपण शेतीत मरमर […]
मुंबईतलं गिरगाव म्हणजे समुद्राच्या विरूद्ध बाजूला चर्नीरोड रेल्वे स्टेशनच्या बाहेर पडल्यानंतरचा परिसर. हा भाग तसा फोर्ट विभागापासून दूर म्हणजे अगदी सुरूवातीस पाहता इंग्रजांच्या दृष्टीने तसा गावाच्या बाहेरचा किंवा वेशीवरचा भाग. इथे इंग्रजांचं लक्ष दुरूनच असे. गिरगावचा परिसर हा वेगवेगळ्या वाड्यांनी बनलेला आहे. कांदेवाडी (खाडिलकर मार्ग), केळेवाडी (डॉ. भालेराव मार्ग), फणसवाडी, गायवाडी, खोताची वाडी, झावबाची वाडी वगैरे वाड्यांचा पुंजका मिळून गिरगाव बनलेलं आहे. […]
किशोरीताई गेल्या….. यानंतर मनात बरेचसे प्रश्न उपस्थित झाले….. अाज माझ्यासकट सगळेच सौजन्याने अादरार्थी संबोधतो , पण सहेला रे मधली एखादी तान वा रंगी रंगला ची तान कानावर पडली की अापसूकंच काय गळा अाहे हिचा! असंच वाक्य येतं ना ? लता , अाशा काय गाते असंच येतं ना ? या सगळ्या थोर कलाकारांशी अापण अापली तुलना करुच […]
मी वाचन सुरु केल्यानंतर पहिल्या उत्साहात खूप पुस्तकं वाचली. खुप म्हणजे बरीच पुस्तकं वाचली. अक्षरशः एका दिवसात चारचाराशे- पाचपाचशे पानाची पुस्तकं मी संपवली आहेत. तो उत्साह आता कुठे गेलं कळत नाही. असंच एक दिवसात मी एका बैठकीत ‘बनगरवाडी’ हे पुस्तक वाचून काढलं होतं. जी अनेक पुस्तकं कायम लक्षात राहतात त्यापैकी बनगरवाडी हे आहे. मल वाटत नाही […]
आज ३ एप्रिल ! हृदयाच्या एका कप्प्यात कायम विराजमान असणार्या आमच्या महाराजांची आज पुण्यतिथी ! (म्हणजे महाराजांच्या पुतळ्याला हार घालून , पेपरमध्ये आपला फोटो छापून आणण्याचे राजकारण्यांची पुण्य पदरात पाडून घेण्याची तिथी !) ३३७ वर्षे झाली या दु:खद घटनेला , पण का कुणास ठाऊक मन एकदम ३३७ वर्षांनी मागे जातं आणि कुठल्याश्या अनामिक भावनिक सेतूनं ते […]
एकेका लेखाचे भागधेय विलक्षण असते. मी परवा रात्री फेसबुकवर स्पर्शतृष्णा लेख नेहमी प्रमाणेच माझ्या मित्रमैत्रिणींच्या वाचनार्थ पोस्ट केला. सकाळी माझ्या अमेय आणि सुयोग दोन्ही मुलांच्या त्यावरच्या प्रतिक्रिया(ज्या माझ्यासाठी अनमोल आहेत.) आल्या आणि भरून पावले. माझ्या नेहमीच्या मैत्रिणी,मित्र यांनीही भरभरून दाद दिली.हे सगळं खरंतर नेहमीप्रमाणेच झालं. मलाही त्यात माझ्या भावना मोकळ्या झाल्याने हलकं वाटलं होतं इतकंच. पण […]
राजा राममोहन रॉय हे बंगालमधील एक प्रसिद्ध समाजसुधारक. लहानपणापासून अतिशय चिकित्सक बुद्धीचे असलेले राममोहन रॉय यांनी सर्व प्रकारच्या धर्मग्रंथांचा अभ्यास केला. वेदाचा तसेच इतर हिंदू धर्मग्रंथांचा अभ्यास करण्यासाठी तर ते काही काळ काशीलाही (बनारस) जाऊन राहिले होते. सर्व चराचरात व्यापून राहिलेला परमेश्वर एका मूर्तीत कसा असू शकतो याचे समाधानकारक उत्तर त्यांना मिळाले नाही. त्यामुळे ते मूर्तिपूजाविरोधक […]