एका राजाने दोन गरुड आणले आणि त्यांना शिकविण्यासाठी माणूस ठेवला . काही दिवस गेले . एक गरुड उंच भराऱ्या घेऊ लागला, अगदी बघत रहावे असे . दुसरा मात्र उडेचना. राजा काळजीत पडला , अगदी सारखे दोन पक्षी. एक भरारी घेतोय दुसरा थंड. काय करावे.. काय करावे..? राजाने दवंडी पिटविली, गरुडाला कोणी उडवून दाखवावे म्हणून . दुसऱ्या दिवशी पहाटेस राजा बागेत […]
कोण म्हणतं एकदा वेळ निघुन गेली की परत येत नाही… ‘ती सध्या काय करते ‘ हा सिनेमा पाहिला आणि या विषयावर थोडा विचार करावासा वाटला. ‘ती सध्या काय करते’ यावरून बरेच विनोद झाले, अतिशयोक्ती झाली. यातला विनोदाचा भाग सोडला तर हा विषय मनाच्या खुप जवळचा वाटला. यातल्या अन्याचा बायकोची (उर्मिला कानेटकर) भुमिका मनाला स्पर्श करून गेली. […]
ही मूळची जपानी पद्धत आहे. बोन म्हणजे लहान, साय म्हणजे झाड. छोट्या कुंडीत झाड वाढवून त्याची मुळे, फांद्या छाटून छोट्या कुंडीला शोभेल असा वेगवेगळा आकार देणे म्हणजे बोनसाय. परंतु ते लावणे, वाढवणे व त्यासाठी झाडाची निवड करणे यामागे मोठे शास्त्र आहे. त्या त्या पद्धतीने ते तयार केले तर कुणीही बोन्साय आपापल्या घरात व घराजवळच्या जागेत वाढवू […]
मैत्री फक्त माणसा-माणसांमध्येच असते असे नाही तर मनुष्य आणि प्राणी यांचीही मैत्री असू शकते. ही मैत्री इतकी जीवापाड होऊ शकते प्रसंगी तो प्राणी किंवा तो माणूस आपल्या मैत्रीसाठी काय करतील याचा नेम नसतो. एका अरबाला घोडेस्वारीचे अतिशय वेड होते. मात्र तो खूपच गरीब ०८००० घोडा विकत घेण्याची त्याच इच्छा तशीच राहिली होती. शेवटी १-१ जमा करून […]
बिथोवन हा एक जगातील सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक. त्याच्या संगीत रचनांनी असंख्य रसिकांना अक्षरश: वेड लावले. बिथोवन ने एकदा एका अंध मुलीला पाहिले. त्याने सहज तिची चौकशी केली, तेव्हा ती जन्मापासूनच अंधळी असल्याचे समजले. थोडक्यात तिच्या जीवनात पहिल्यापासून अंधार होता. कारण ती उगवत्या सूर्याचे दर्शन घेऊ शकत नाही वा सूर्यास्तही पाहू शकत नव्हती. पांढरेशुभ्र चांदणे म्हणजे काय […]
आरती प्रभू किती उच्च दर्जाचे कवि होते याची साक्ष अनेक साहित्यिक / कवि देतात. आरती प्रभू कोंकणात एक खाणावळ चालवित. पण त्यांचं मन नेहमीच काव्यनिर्मितीत दंग असे. गल्ल्यावर बसून ते पुढ्यातील कागदावर काव्य लिहिण्यात मग्न असंत. त्यांचं धंद्यात लक्ष नव्हतं हे ओघाने आलंच. असंच एकदा काव्य लिहित असतांना ते कागद तसाच ठेवून आंतील खोलीत गेले. त्या […]
संत एकनाथ महाराज हे खऱ्या अर्थाने धर्मात्मा होते. एकदा आषाढीच्या वारीसाठी पैठणहून दिंडी निघाली. त्या दिंडीत एकनाथ महाराज ही होते. वाटेत एका गावी दिडींचा रात्रीचा मुक्काम होता. त्या गावातील एका गावकर्याला संत एकनाथ महाराजांचे दर्शन घेण्याची फार इच्छा होती. मात्र दिंडीत एवढे असंख्य लोक होते, की आपल्याला त्यांचे दर्शन कसे मिळणार व आपण त्यांना ओळखणार कसे? हाच प्रश्र्न त्याच्यापुढे पडला. शेवटी त्याने एक युक्ती केली. […]
बाराव्या शतकात फ्रान्समध्ये फिलीप गस्ट नावाचा राजा होऊन गेला. तो स्वतः अत्यंत पराक्रमी होता मात्र इतर पराक्रमी सैनिकांना वा सरदारांनाही तो सतत प्रोत्साहन द्यायचा. मुख्य म्हणजे त्याला सत्तेची कसलीच हाव नव्हती. आपल्या पदावर आपल्यासारखाच पराक्रमी व धाडसी राजा – मग तो कोणीही का असेना – बसावा, हीच त्याची इच्छा होती. त्या काळी देशाचे साम्राज्य वाढविण्यासाठी बऱ्याच […]
आजकाल शहरापासून आणि छोट्याछोट्या गावापर्यंत हॉटेलिंगचे प्रमाण खूप वाढले आहे. खरंच आजकाल हॉटेलचे खाणे आनंददायी आहे काय? आपण कुटुंबीयांसह, मित्रांसह हॉटेलमध्ये, बदल म्हणून म्हणा अथवा ठरावीक निमित्ताने म्हणून जेवण्यासाठी जातो. पण, खरंच आपण तेथे प्रशस्तपणे, आनंदाने एन्जॉय करतो काय? सध्या तर कुठेही हॉटेलात गेलो की, आपण खुर्चीवर बसतपण नाही तोपर्यंत तेथील वेटर (कर्मचारी) लगेच प्रश्न विचारतो […]
मायकेल अँजेलो हा आंतराष्ट्रीय ख्यातीचा चित्रकार व शिल्पकार होता. त्याच्या चित्र आणि शिल्पाला फारच मागणी असे. एकदा एका श्रीमंत माणसाने त्याला आपल्या दिवाणखान्यात लावण्यासाठी चांगल्या चित्राची मागणी केली. त्यासाठी अँजेलोला वाट्टेल ती किंमत द्यायला तयार झाला. परंतु अँजेलोने त्याला नम्रपणे नकार दिला. कारण त्याला माहित होते की, दिवाणखान्यी शोभा वाढेल मात्र रोज तेच ते चित्र पाहून एकदिवस तो श्रीमंत माणूसही कंटाळेल. नव्याचे […]