नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

हृदय परिवर्तन

क्षमाशील वृत्तीमुळे वाईटातल्या वाईट माणसाचेही हृदयपरिवर्तन घडू शकते. यासंदर्भात समर्थ रामदास स्वामींची एक कथा खूपच अंतर्मुख करणारी आहे. समर्थ रामदास रोज भिक्षा मागून त्यावर आपला उदरनिर्वाह करीत असत. एकदा ते असेच भिक्षा मागण्यासाठी एका घरात गेले. त्या घरातील एक बाई शेणाने आपले अंगण सारवत होती. घरात काहीतरी कुरबूर झाल्याने ती बाई आधीच चिडली होती. त्यातच समर्थांनी […]

दिवेलागण

तू सदा फिरस्ता . मी एकाच जागी एकाच चक्रात अडकलेली . पण कुठेही असलास तरी सकाळी मेसेज आणि दिवसभरात एक तरी फोन न चुकता करणारा तू . मी नवीन काहीही लिहिले तरी सगळ्यात पहिल्यांदा तुलाच वाचून दाखवणे . आधी whatsapp आणि मग दिवसभरातला voice call . कारण तुला skype download करायचा कंटाळा . ” जमलय ” […]

देवा, आम्हाला कायम दु:खात ठेव..

आपण एरवी समाजात वावरताना उच-नीचतेच्या किती पायऱ्या सांभाळून वागत असतो, ते ही नकळत. पैसा, प्रतिष्ठा, पद व क्वचित प्रसंगी शिक्षणही माणसा-माणसांत अदृष्य भिती उभ्या करत असतं. अधिकारी शिपायाशी शक्यतो हसणार-बोलणार नाही, रोजचा सलाम करणारा वाॅचमन तर सर्वांचाच दुर्लक्षीत. रिक्शा-टॅक्सीवाले, वेटर यांच्याशी तरी कुठे लोक बोलतात..! बोलणं जाऊ देत, बघतही नाहीत कधी..वरचा माणूस खालच्या माणसाशी बहुतेक वेळा […]

नामस्मरणातील ताकद

जनाबाईचे अभंग दूरदूपर्यंत लोकप्रिय झाले आणि तिची ख्याती कबिरांच्या कानी गेली, इतके सुंदर अभंग रचणारी ही स्त्री आहे तरी कोण या उत्सुकतेपोटी संत कबीर जनाईच्या भेटीसाठी पंढरीस आले. तिथे आल्यावर त्यांना कळाले की ती नामदेवांच्या घरी कामास आहे. तिथे गेल्यावर त्यांना कळाले की ती गोपाळपुरास गोव-या थापायला गेली आहे, तिला येण्यास काही अवधी लागेल. दासीचे घरकाम […]

खरे सुख

संत तुलसीदासाच्या काळातच रैदास नावाचे एक संतकवी होऊन गेले. त्यांचे खरे नाव रविदास. मात्र रैदास या नावानेच ते ओळखले जातात. संत तुलसीदासांनी ‘तुलसीरामायण’ लिहिले तर संत रैदासाने अनेक भक्तिगीते लिहिली. ते वाराणसीत गंगेच्या किनाऱ्यावर एका झोपडीत राहत असत. आपल्या झोपडीच्या बाहेर बसून ते वहाणा शिवत असत. त्याच्यातून जेवढे उत्पन्न मिळायचे त्यावरच त्यांची गुजराण व्हायची. त्यांची पत्नीही […]

धर्मपिता आणि मानसपुत्र

स्वातंत्र्य चळवळीसाठी महात्मा गांधी यांनी केलेल्या कार्याला ज्यांनी तनमनधनाने मदत केली त्यात जमनालाल बजाज यांचा फार मोठा वाटा आहे. जमनालाल बजाज यांच्या पायाशी सारे वैभव लोळण घेत पडलेले असतानाही ते त्याच्यापासून अलिप्तच राहिले. आयुष्यात कोणी तरी चांगला गुरु लाभावा अशी त्यांची मनापासूनची इच्छा होती. त्या वेळी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेहून नुकतेच भारतात परतले होते व त्यांनी […]

पाणिनीची प्रतिज्ञा

आपल्या हातावर अनेक प्रकारच्या रेषा असतात. ज्योतिषशास्त्राच्या मते त्यातील काही रेषा विद्येच्या, धनाच्या तसेच आयुष्याच्या कालमर्यादेच्या असतात. अर्थात अनेकांच्या मते हे थोतांड आहे. त्यामुळे बऱ्याचजणांचा हातावरील या रेषेवर विश्वास नसतो. मात्र या संदर्भात प्रसिद्ध व्याकरणकार पाणिनी यांची मजेदार कथा सांगितली. पाणिनी तरुण असताना एका आचार्याकडे शिक्षण घेत होता. पाणिनीसारखेच आचार्यांचे असंख्य शिष्य त्यांच्या आश्रमात त्यांच्याकडून शिक्षण […]

गीत एक – आठवणी अनेक : “आएगा आनेवाला”

संगीतकार खेमचंद प्रकाश यांच्या जन्मतिथीच्या निमित्ताने खेमचंद प्रकाश यांचे magnum opus “आएगा आनेवाला” *1940 च्या दशकातील सुपरस्टार अशोककुमार एकदा लोणावळ्याला आपल्या मित्राच्या बंगल्यावर रहायला गेले होते . तिथे त्यांना प्रत्येक रात्री काही विचीत्र भास झाले . त्यांनी हे भुताटकीचे आपले अनुभव आपल्या मुंबईतील मित्रांना सांगितले व त्यावरून कमाल अमरोही यांनी “महल” चित्रपट लिहीला. * त्यातलं “आएगा आनेवाला” हे […]

मातृभक्त सैनिक

एक आरमारप्रमुख होता. आपल्या आरमारातील सैनिकांनी साहसी असावे, आपली आज्ञा पाळताना कोणतेही संकटं आले तरी त्यांनी न डगमगता संकटावर मात करावी, असा त्याचा नेहमीच आग्रह असे. त्यामुळे कधी कधी तो आपल्या सैनिकांची परीक्षाही पाही. ही परीक्षा कधीकधी फार कठोरही वाटे. एकदा तो जहाजावरून फिरत असताना त्याला एक सैनिक दिसला. आरमारप्रमुखाने ताबडतोब त्याला समुद्रात उडी मारायला सांगितले. […]

संतुलनाची गरज

निसर्ग शक्यतो सृष्टीमध्ये समतोल राखण्याचा प्रयत्न करतो. कधी कधी मात्र निसर्गाकडून हे संतुलन बिघडले, की त्याचा फटका मनुष्यप्राण्यालाच बसतो. अतिशय कडक उन्हाळ्यामुळे ‘नको तो उन्हाळा’असे म्हणण्याची पाळी येते. तर प्रचंड पाऊस होऊन महापूर आला, की पावसाळाही नकोसा होतो. कडाक्याच्या थंडीमुळे तर अनेक वेळा अनेकांवर जीव गमावण्याची पाळी येते. निसर्गाचे हे संतुलन काही वेळा बिघडत असले तरी […]

1 440 441 442 443 444 515
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..