“आहीस्ता चल जीन्दगी, अभी कर्ज चुकाना बाकी है..! कुछ दर्द मिटाना बाकी है, कुछ फर्ज्ञ निभाना बाकी है..!” आज इसवी सन २०१६ चा शेवटचा दिवस.. वर्षाचे दिवस, महिने व शेवटी आख्ख वर्षच कधी आलं आणि कधी सरलं हे कळलही नाही एवढा आयुष्याचा वेग वाढलाय.. एखादी गोष्ट प्राप्त व्हावी म्हणून धडपड करून ती मिळवावी तोच आयुष्य सर्रकन […]
चारकोप, मुंबई येथे रविवार दि. १८ डिसेंबर २०१६ रोजी नक्षत्राचं देणं काव्यमंचच्या वतीने चौथे अखिल भारतीय मराठी नक्षत्र महाकाव्यसंमेलन २०१६ प्रचंड कवींच्या सहभागाने अत्यंत जल्लोषात पार पडले. सादर महाकाव्यसम्मेलनाचे महाकाव्यसंमेलनाध्यक्ष प्रसिद्ध कवी व गीतकार प्रा.प्रविण दवणे होते. काळी 9.30 वा. नवनिर्माण मराठी ग्रंथालय ते महाकाव्यसंमेलन स्थळापर्यंत भव्य काव्यग्रंथ दिंडीचे आयोजन देखील करण्यात आले होते. त्या दिंडीत अंदाजे […]
रात्रीच्या वेळी पलंगावर पडल्या-पडल्या, भाई भतीजावादाची प्रथा आपल्या देशात केंव्हा सुरु झाली असेल, हा विचार करत होतो. अचानक ती पुराणकथा डोळ्यांसमोर चमकली. …. […]
” ऐ , ऐक ना ” ” त्यासाठी whatsapp वर काहीतरी पाठवावे लागते . ” ” मी एक फोटो तुला पाठवला आहे . तो तू बघ . आणि लगेचच delete करून टाक . ” ” ओके ” . ” पाठवला . ” ” बघितला . ” ” Delete केलास ” ” तू काय आहेस ? फोटो […]
आज शैलेंद्रला जाऊन पन्नास वर्षं झाली. त्याच्या जीवनाच्या शोकांतिकेवर आतापर्यंत अनेकदा लिहिलं गेलयं. त्याचा शोकात्म शेवट आठवला की मन हमखास खिन्न होतं. म्हणून ठरवलं की आज त्याच्या फक्त आनंददायी आठवणींची उजळणी करायची आणि मस्त गाणी ऐकायची !! आणि मग जाणवलं की एक tragic end सोडला तर त्याचा सगळा कलाप्रवास म्हणजे एक “सुहाना सफर”* आहे. मग मी […]
स्मिता पाटील (जन्म : पुणे, ऑक्टोबर १७, इ.स. १९५५; मृत्यू : मुंबई डिसेंबर १३, इ.स. १९८६) या चित्रपट, दूरचित्रवाणी आणि नाटकांतून कामे करणार्या मराठी अभिनेत्री होत्या. त्यांचे अभिनयाचे शिक्षण पुण्यातील फिल्म अॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियात झाले होते. श्याम बेनेगल यांच्या ‘चरणदास चोर’ या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यांचे लग्न चित्रपट अभिनेते राज बब्बर यांच्याबरोबर झाले […]
आमच्या मुंबईसारख्या शहरात आमचा शिव्यांशी नित्य संबंधं येतो. येवढा की आता त्याचं काहीच वाटेनासं झालंय. इथे गर्दीच येवढी की येता जाता धक्का लागतोच. तो मुद्दामहून दिलेला धक्का नाही हे देणाऱ्याला आणि लागणाऱ्यालाही माबिक असतं. तरी चार दोन शिव्या दिल्या-घेतल्या जातातच. एकमेकाची आय-माय साग्रसंगीत उद्धारली जाते..पण त्यात त्या धक्का देणाऱ्या-घेणाऱ्याविषयी राग नसतो तर त्या ‘व्यवस्थे’ला दिलेल्या शिव्या […]
“राजमहालाच्या दारात मोठा गदारोळ उडाला होता. जवळपास सगळी नगरी तिथे लोटली होती. प्रसंगच तसा होता. त्या दिवशी भल्या सकाळी एक भिक्षुक राजाच्या महाली भिक्षा मागण्यासाठी आला होता. राजा म्हणाला, तू पहिला याचक आहेस आजच्या दिवसातला. काय हवं ते माग. मिळेल. भिक्षुक म्हणाला, माझ्याकडचं भिक्षापात्र फारच छोटं आहे. त्यात बसेल एवढीच भिक्षा मला पुरेशी आहे. पण, वचन […]
सिग्मंड फ्राईड एकदा बायको व मुलाला घेऊन बागेत फिरायला गेला. मुलगा छोटा होता. आई-वडील गप्पात गुंग झाल्यावर तो हळूच तेथून संधी साधून गायब झाला. थोडया वेळानंतर समोरच खेळणारा मुलगा गेला कुठे म्हणून आई कासावीस झाली. घाबरून ती इकडे तिकडे त्याला शोधण्यासाठी पळू लागली. घाबरलेल्या, सैरावैरा पळणार्या आपल्या पत्नीला फ्राईड म्हणाला, ‘‘अगं मला एवढंच सांग आपला बागेत […]
लोकमान्य टिळक लहानपणी म्हणाले होते. “मी शेंगा खाल्ल्या नाहीत… मी टरफलं उचलणार नाही” आता बाकीच्या व्यक्ती काय म्हणाल्या असत्या बघा: महात्मा गांधी: “मी शेंगा खाल्ल्या आणि मीच टरफलं उचलणार आणि दुसर्याने शेंगा खाल्ल्या तर ती पण टरफलं मीच उचलणार” बाळासाहेब ठाकरे: “यांच्या बापाचा माल आहे काय? शेंगा फ़क्त मराठी माणसालाच खायला मिळाल्या पाहिजेत आणि खाताना टरफलं सांडली […]