विजय ! एक सर्वसामान्य दिसणारा माणूस एका बऱ्यापैकी महाग असणाऱ्या हॉटेलात कोणीतरी येण्याची वाट पहात झुरका मारत चहा पित असतो पण कपाने ! बशीने चहा पिणे त्याच्या गावातच नव्हते. गरम गरम चहाचा कप तो मिनिटात रिकामा करत असे पण येथे वेळ काढायचा होता म्हणून तो थेंब थेंब चहा पीत होता. चहा पिता पिता आजूबाजूचेच नव्हे तर […]
आपण माणसे हजारो वर्षापासून फक्त देवावर विश्वास ठेऊन जगत आलो. पण खरंच देव असं काही अस्तित्वात आहे का ? हा प्रश्न मला मी अगदी लहान असल्यापासून भेडसावतो ! आज आजूबाजूला जेव्हा मी करोडो रुपये खर्चून लोक देवाची मंदिरे बांधण्याचा अट्टहास करताना दिसतात तेव्हा त्याची कीव येते . स्वतःला समाजाचे सेवक म्हणवून घेणारे नेतेही यांच्यात मागे नाहीत. […]
सकाळी मोकळ्या रस्त्यावरून चालताना विजय कविताला म्हणतो,’ मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचे बोलायचे आहे ! ‘ ते ऐकून दोघेही एका झाडाखाली थांबतात… कविता: ( त्याच्याकडे पहात) हा ! बोला ना ! बऱ्याच दिवसापासून मला जाणवतंय कि तुम्हाला माझ्याशी काहीतरी महत्वाचे बोलायचे आहे ! विजय: ( किंचित सावरत कविताचा हात हातात घेत ) कविता ! आय लव्ह यु […]
भारतीय लष्कराचा मूळ पाया व अंतर्गत गाभा हा ब्रिटीश आर्मीवर आधारलेला आहे. याच ब्रिटिशांकडून १५ जानेवारी १९४९ ला फिल्डमार्शल (तत्कालीन जनरल) के. एम. करिअप्पा यांनी पदभार स्वीकारला. यामुळे हा दिन भारतीय लष्कर दरवर्षी ‘आर्मी डे’ म्हणून साजरा करते. भारतीय लष्कर ही प्रशंसनीय काम केलेली सन्माननीय संस्था आहे व आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपल्या लष्कराला मान आहे. भारतीय लष्कराची […]
भारतीय पत्रकारीचेचा पाया रचणाऱ्या ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन.. ‘निर्भिड पत्रकारिता’ या शब्दाला बट्टा लावण्याचं पातक अगदी गेल्याच वर्षी ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर या एका मराठी संपादकाकडून घडलं आणि बाळशास्त्री, टिळक, गांधी आदिंलारख्या निर्भिड आद्य पत्रकारांची मान शरमेने वर स्वर्गात खाली गेली असावी या बाबत निदान माझ्या मनात तरी काही शंका नाही..बाळशास्त्रींना तर ‘याचसाठी केला होता का […]
आमच्या हरकुळ खुर्दतल्या मंतरलेल्या रात्री नंतरच्या रात्रीचा मुक्काम कुडाळ तालुक्यातल्या पावशी गावातल्या जंगलात होता. आमचा इकडचा यजमान होता माझा रानवेडा मित्र डॉ. बापू भोगटे.. डॉ. बापू भोगटे हा जनावरांचा डॉक्टर. मुंबईतली चांगली ‘गोदरेज’ मधली नोकरी सोडून आपल्या गावी म्हणजे कुडाळ तालुक्यातल्या पावशी गावात स्थायिक झाला..थोडे पैसे गुंतवून काजू, बांबूची लागवड सुरु केली..वेळ मिळेल तसा खांद्यावर बंदूक […]
‘जिंगल म्हणजे नक्की काय?’ असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो. जिंगल म्हणजे जाहिरातीचं गाणं किंवा जाहिरातीकरता बनवलेले संगीत. जिंगलचेही तीन प्रकार असतात. एक म्हणजे नुसतंच गाणं. दुसरा प्रकार- जिंगल कम् स्पॉट. (यामध्ये गाणं आणि निवेदनही असतं. याला ‘व्हॉइस ओव्हर’असं म्हणतात.) आणि तिसरा- नुसतंच पाश्र्वसंगीत व व्हॉइस ओव्हर! ही जिंगल्स दहा सेकंद, वीस सेकंद, तीस सेकंद, चाळीस सेकंद किंवा […]
बरोबर एक वर्षापूर्वी मी माझ्या कुटुंबासहीत दिल्ली-हरीद्वार-ऋषिकेशची अक छोटीशी सफर केली होती. ट्रेनमधून जाताना दिसलेल्या जाहिरातीं व त्यातून मला उमगलेल्या तिथल्या लोकांच्या मानसिकतेवर मी एक लहानसं भाष्यही केलं होतं..ते काहीसं नकारात्मक होतं, पण चाच प्रवासात एक सकारात्मक गोष्टही घडली होती आणि मी ती साफ विसरूनही गेलो होतो. चांगल्या गोष्टी माणसं लगेच विसरतात आणि वाईट मात्र लक्षात […]