माझ्या घराजवळच बरेच दिवस मोठ्या इमारतीचे बांधकाम चालले होते . तेथून जाताना मला रोज बांधकाम मजुरांची लहान मुले ऐकमेकांचा सदरा पकडून आगगाडीचा खेळ खेळताना दिसायची . दररोज कुणीतरी इंजिन बनायचे आणि बाकिची मुले डबे व्हायची . इंजिन आणि डबे रोज बदलली जायची, पण, एक फक्त अर्धी निकर घातलेला मुलगा हातात रुमाल फिरवून गार्ड व्हायचा… आज न […]
शाळकरी वयात दिवसा शाळा व संध्याकाळी गायनशाळा हा नित्यक्रम अनेक वर्षे अगदी कसोशीने पाळल्या गेला. पं. विष्णू दिगंबर पलुस्करांच्या पुण्यतिथीचे वेध लागले की कार्यक्रमाच्या तयारीसाठी आम्हा विद्यार्थ्यांची लगबग सुरु होत असे. वय काहीही असो, पण प्रत्येक विद्यार्थ्याने पंडितजींना आदरांजली अर्पण करण्यासाठी काही ना काही सादर केलेच पाहिजे अशी आमच्या गुरुजींची आज्ञा होती व ती मोडण्याची कोणाचीही […]
गुलाबजाम आणि जिलेबी यांचे एकमेकांवर खुप प्रेम…दोघांनी नीट विचार केला आणि त्यांच्या आधी, त्यांच्या उपरोक्ष कोणी घरी सांगण्याऐवजी त्यांनीच आपले प्रेम प्रकरण आपल्या आपल्या घरी सांगून टाकले… आता गुलाबजामचे वडील श्रीखंड आणि आई बासुंदी ही साधी माणस…रितीरिवाज जपणारी, सणवार सांभाळणारी आणि तरीही आधुनिकतेची जाणीव असणारी…त्यांचा फारसा विरोध झाला नाही.. जिलेबिचे वडील बूंदीचे लाडू व आई ईमरती […]
एक माणूस स्वच्छतेचा फारच भोक्ता होता. मात्र त्याचा अतिरेक एवढा वाढला की, या स्वच्छतेच्या नादापोटी त्याला सगळ्या गोष्टी अमंगळ वाटू लागल्या. घरामध्ये दैनंदिन कामे करताना जी अस्वच्छता व्हायची तिलाही तो कंटाळला व एके दिवशी स्वतःचेच घर सोडून तो दुसऱ्या गावी गेला. परंतु तेथेही त्याला जिकडेतिकडे घाण दिसू लागली म्हणून तो जंगलात गेला. तेथे एका झाडाखाली बसला […]
सावरकर… त्यांची भिती किती आणि कोणाला वाटायची ह्याची ही कथा ! दिल्लीचे पालम विमानतळ! विमानप्रवास फार दुर्लभ वाटावा असा तो काळ! विमानतळावर एक केंद्र सरकारचा टपाल खात्याचा मोठा अधिकारी आपल्या विमानाची वाट बघत होता. भोपाळ येथील टपाल विभागाचा तो मुख्य अधिकारी होता. त्याच्या शेजारीच एक माणूस येऊन बसला. हे वयोवृद्ध गृहस्थ होते. हा माणूस फार फार […]
काल सकाळी दादर वरून लालबागला जाण्यासाठी ट्रेन पकडली..ट्रेनमधे फारशी गर्दी नव्हती..आत गेलो तर चार पोलिस शिपाई दोन पोलिस डाॅग्सना घेऊन उभे होते..मस्त राजबिंडे कुत्रे होते..एक लॅब्राॅडाॅर आणि एक लांड्या शेपटीचा डाॅबरमन..छानपैकी दरवाजात उभे होते..मी त्या शिपायांना त्या कुत्र्यांची नांवं विचारली. एकाचं ‘मार्शल’ आणि दुसऱ्याचं ‘डॅन’.. पोलिसांची आपसात चर्चा चालू होती..तेवढ्यात स्टेशन आल्याने एका पोलिसांने त्याच्याकडे असलेल्या […]
भली मोठी वैचारिक पोस्ट लिहूनही लाईक्स न मिळाल्याने अर्जुनाने जेंव्हा मोबाईल खाली ठेवण्याचा निर्णय घेतला तेंव्हा श्रीकृष्णाने फेसबुक आणि व्हाटस्अप बाबत तीन सत्ये अर्जुनास समजावली… 1)ज्यांना तुझे विचार आवडतात, ते न वाचताही तुझी पोस्ट लाईक करतील.. 2)ज्यांना तुझी पोस्ट आवडूनही,नाईलाजास्तव जे लाईक करू शकणार नाहीत,ते तुझी खाजगीत प्रशंसा नक्की करतील.. 3)जे तुझ्या विरोधी विचारसरणीचे आहेत, त्यांना तुझी पोस्ट कितीही पटली तरी ते कधीच ती लाईक करणार नाहीत..!! […]
एक होती चिवताई इटुकली-पिटुकली. चिव-चिव करत आंगणात यायची, चिवताई ये दाणा खा, पाणी पी आणि भुर्रर्र उडून जा. आजी! चिवताई खरंच असते का? कशी दिसते? हुशार ग माझी सोनुटली, तुझ्या बाबांना सांगते, चिवताईचा फोटू आणायला…. एक होता काऊ, काळाकुट्ट, मोठे मोठे पंख, नेहमी चिवताईला त्रास द्यायचा. हा! हा! हा!, आजी किती ग!खोट्ट-खोट्ट बोलते तू, काऊ असते […]