त्यांच खरं नांव नरेंद्रनाथ दत्त. त्यांच्या वडीलांच नाव विश्वनाथ आणि आईच नांव होतं भुवनेश्वरी देवी. त्यांचे वडील कलकत्ता हायकोर्टाचे वकील होते. ते थोडे उदारमतवादी आणि बुध्दीप्रामाण्यवादीही होते. तर विवेकानंदांची आई ही अत्यंत धार्मिक होती. […]
सकाळी उठलं की, सर्वात आधी घरी चहा बनतो. चहासोबत काहीजण नाश्ता पण घेतात. चहा घेत नाही अशी व्यक्ती एखादीच असते! चहाची आपल्याला इतकी सवय झाली आहे की, सकाळी चहा भेटला नाही की, अख्खा दिवस खराब जातो. […]
मुंबईतील मराठी टक्का झपाट्याने घसरत असल्याचे २०११ च्या भाषिक जनगणनेनुसार आढळून आले असून, हा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर मराठी माणसाच्या पोटात गोळा आला आहे. मराठी भाषेच्या आणि माणसाच्या नावाने राजकारण बरेच झाले; परंतु मराठी टक्का कमी का होत आहे, यावर अभ्यास आणि उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत. […]
भर थंडीच्या दिवसात अकबर आणि बिरबल तळ्याभोवती फेऱ्या मारत होते. बिरबलच्या मनात विचार आला की, पैशासाठी माणूस काहीही करू शकतो. बिरबलने आपल्या मनातले विचार व्यक्त केले. अकबराने तत्काळ त्याचे बोट पकडले आणि तळ्यातल्या पाण्यात बुडवले; बिरबलने चटकन आपले बोट मागे घेतले, कारण तळ्यातल्या थंड पाण्याने ते गारठले होते. […]
त्या दिवशी रानबा सकाळच्या उन्हाला बाहेर शेळ्यांजवळ जाऊन बसला होता.आत त्याची सून झुंबर नवऱ्याला म्हणत होती “ ऐकलं का,बिरोबाच्या जत्राला गावात भांड्यांचं दुकान लागलं का जुन्या पाण्या भांड्यांची मोड करून एक पितळाचं भगुलं घ्याचं हाये आपल्याला, अन् आढ्याला तुमच्या आईनं किती दिसापासून फडक्यात सर्जा राजाच्या शेंब्या ठेवल्यात गुंडाळून त्या सुद्धा ध्यान करून काढा मोडायला!! […]
जगद्गुरू शंकराचार्य यांनी जिचा गौरव- ‘नित्यानंदकरी वराभयकरी’ (नित्य आनंद देणारी, श्रेष्ठ आणि अभय देणारी) म्हणून केला आहे, अशी अन्नपूर्णा देवी, भारतीय घराघरात गृहिणीच्या रूपात नांदत असते. परंतु इतरांना जाऊ दे, या अन्नपूर्णेला तरी तिच्या या ‘स्वरूपाची जाणीव आहे का?’ […]
उठा उठा, एक जानेवारी जवळ आली, नवीन resolution करण्याची वेळ झाली! म्हणजे मी तरी निदान एक तारखेला नवीन resolution करते. शास्त्र असतय ते! आणि ते दोन तारखेला मोडते. पण नवीन resolution करण्यात पण एक गंमत असते. आता त्यातही एवढे जास्त प्रकार आहेत की “मोडायचच आहे तर चला, जरा कठीण resolution करू ” […]
मी लेखन करायला लागलो, त्याला आज काही वर्ष उलटून गेली. एखादी गोष्ट,व्यक्ती भावते, एखादा सुंदर अविस्मरणीय अनुभव येतो, मनात ठसलेल्या काही गतस्मृती जाग्या होतात, काही खूप आनंद देणारे प्रसंग घडतात आणि मग मात्र ते शब्दरूपात उतरल्याशिवाय शांत बसवत नाही. अधूनमधून काही वैचारिक स्फुरतं. […]