नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

रुखरुख

आज एक आठवडा झाला. त्या लहान मुलाला मी रस्त्यावर नकळत शोधण्याचा प्रयत्न करते आहे. पण तो कुठेही नजरेस पडत नाही आहे. कुठे असेल तो? मागच्याच मंगळवारची गोष्ट आहे. मी सकाळी दुध आणायला गेले असताना तो माझ्या गाडीच्या समोर धावत धावत आडवा गेला होता. कसाबसा जोरात ब्रेक मारून मी गाडी उभी केली होती आणि गाडी बाहेर येऊन […]

एक स्पर्श

संध्याकाळी शिंप्याकडे जायला निघाले होते. रस्ता ओलांडताना मोबाईल वाजला म्हणून बाजूला उभी राहून बोलत होते. बोलता बोलता सहज समोरच्या रस्त्याकडे लक्ष गेले. एक वयोवृद्ध आजी आजोबा एकमेकांचा हात धरून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होते. दोन पावले पुढे यायचे कि समोरून भरधाव गाड्या यायच्या आणि ते परत उभे राहायचे. असा प्रकार माझे फोनवर बोलून संपले तरी चालूच […]

अन्याय

सकाळी अकरा – साडेअकराची वेळ होती. जरा बाहेरची कामे करून यावी म्हणून निघाले होते. घरात बाहेरची कामेच जास्त असतात. कधी लाईट बिल, पाणी बिल, बाजारहाट, बँकेची कामं वगैरे. आणि ही सगळी कामं सकाळीच करायला लागतात. तशीच त्या दिवशी पण बाजारात जायला निघाले होते. जवळच सेन्ट्रल स्कूल आहे. शाळा सुटली होती. सोसायटीतील लहान मुले परीक्षा संपल्या म्हणून […]

सितारा

सकाळची वेळ होती. सूर्यनारायणाचे आगमन झाले होते. हवेत थोडा गारवा होता. मॉर्निंग walk संपवून खुर्चीत विसावलो होतो. पेपर वाचत निवांत बसावे असा डोक्यात विचार चालू होता. पाहिले तर पेपेर अजून आलेच नव्हते. शेवटी त्यांची वाट बघत बसलो होतो. अलीकडे जरा थकायलाच होतं. उभे आयुष्य पळापळ करण्यात गेले, आता आराम करावा अशी खूप इच्छा होत असे. परंतु […]

नियतीचा खेळ

गेल्या आठ्वड्याभराच्या पूर्ण तणावानंतर डॉ. समर तिन्हीसांजेच्या वेळेस एकटेच घरासमोरच्या लॉनवर शांतपणे वरच्या आकाशाकडे बघत बसले होते. त्यांचा बंगला पण सोसायटीत अगदी एका बाजूला होता. ह्या बाजूला फारशी वर्दळ नसल्यामुळे तसे वातावरण ही अगदी शांतच होते. मधून मधून त्यांच्या ‘rocking-chair’ चा ‘कर-कर’ आवाज त्या शांततेचा भंग करीत होता. एका मोठ्या जागेवर त्यांनी आपला बंगला मागच्या बाजूला […]

नात्यांचा ताजमहाल

पाण्याने दुधासोबत मैत्री केली आणि दुधात एकरुप झाले. दुधाने पाण्याची समर्पित वृत्ती पाहिली आणि म्हणाले, ‘मित्रा तू स्वत्व त्यागून माझे स्वरुप धारण केलेस… आता मीही बघ कशी मैत्री निभावतो ते…. आता तुझे मोल हे तुझे राहिले नाही .. आता बघ मी तुझे आणि माझे मोल समान करुन तुला माझ्या मोलाने विकतो. आणि खरेच ते पाणी दुधात […]

हरवलेल्या बॅगचा शोध

आमच्या खामगाववरून आषाढी एकादशीला दरवर्षी विशेष यात्रा स्पेशल रेल्वे गाडी सोडण्यात येते. २००३ पासून रेल्वे प्रशासनाने खामगाव ते पंढरपूर ही गाडी सुरू केली आहे. सुरुवातीला एक फेरी सोडण्यात आली. परंतु नंतर दरवर्षी खामगाव, शेगावसह बुलडाणा आणि अकोला जिल्ह्यातून वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा प्रतिसाद पाहता आणि रेल्वेला मिळणारे उत्पन्न पाहता रेल्वे प्रशासनाने या फेऱ्या वाढवल्या आहेत. अाता चार […]

विदारक सत्य

काही केल्या रात्री डोळ्याला डोळा लागत नव्हता. डोक्याला थोडेसे तेल लावून झाले. एक जपाची माळही करून झाली पण डोळा काही मिटत नव्हता. कधी ह्या कुशीवर तर कधी त्या कुशीवर करत करत रात्र कुठे संपली हेच समजले नाही. सकाळी उठल्यावर नेहमीप्रमाणे रोजंदा व्यवहार सुरु झाले. आपले शरीर आणि मन ह्या आपल्या रोजच्या जीवन-व्यवहाराशी इतके एकरूप झालेले असते […]

संकटांवर मात

जीवन जगताना अनेक अडचणी येत असतात. परंतु अशी कितीही संकटे आली तरी डगमगून न जाता त्या अडचणीतून वाट काढत कसे बाहेर जाता येईल याचा शांतचित्ताने व धीराने विचार केला तर अशा संकटावर सहज मात करता येऊ शकते. या संदर्भात प्रसिद्ध तत्त्ववेत्ते टॉलस्टॉय यांच्यासंबंधी सांगितली जाणारी हकिकत मोठी मनोरंजक आहे. टॉलस्टॉय हे स्वभावाने अतिशय मिश्कील व प्रेमळ […]

…आणि बिरबल परतला

अकबर आणि बिरबल यांच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. अकबर बादशहा असूनही बिरबलची आणि त्याची खूप चांगली मैत्री होती. अनेकदा बिरबलबरोबरच्या सहवासात आपण बादशहा आहोत हे अकबर विसरून जात असे. त्यामुळे दरबारातील अनेक मंडळींना उभयतांची ही मैत्री खटकायची. बिरबलला अकबरपासून कसे दूर करता येईल यासाठी काही जणांचे सारखे प्रयत्न चालू असत. एकदा असेच कोणीतरी बिरबलबद्दल अकबर बादशहाचे […]

1 449 450 451 452 453 515
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..