नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

आशा आणि अपेक्षा..

आशा आणि अपेक्षा या दोन जुळ्या बहिणी…. जिथे जिथे आशा असेल तिथे तिथे अपेक्षा भेटणारच… मनुष्यप्राणी आशेवरच जगतो… आणि सतत कसलीतरी अपेक्षा करतोच करतो.. माणुसच कशाला.. अगदी कोणताही प्राणी तेच करतो.. आपण कोणाकडूनतरी कसलीतरी अपेक्षा करतो.. आपल्याला आशा असते की आपली ती अपेक्षा पूर्ण होईल.. कधीकधी आशा आणि अपेक्षा अगदी १०० टक्के पावतात आणि सहजगत्या प्राप्त […]

अमेरिकेत येणारी मराठी मंडळी

नुकताच घडलेला हा किस्सा आहे. अमेरिकेतून परत येताना मला सेओलच्या विमानतळावर एक मराठी गृहस्थ भेटले. त्यांनी आपणहून माझी ओळख करून घेतली. चांगले ‘कोकणस्थ ब्राह्मण’ होते. सहा महीने अमेरिकेतील मुलीकडे राहून परत निघाले होते. ते कोणत्यातरी खासगी बँकेत नोकरीला होते व ती बँक आर्थिक संकटात सापडल्यामूळे त्या बँकेचे एका सार्वजनीक बँकेत विलिनीकरण झाले होते. त्यांच्या पत्नीचा टि. […]

टिप्पणी – ८ : ‘ये मेरा प्रेमपत्र पढ़कर’

बातमी : ‘संगम’ सिनेमातील गीत , ‘ये मेरा प्रेमपत्र पढ़कर’ संदर्भ : लोकसत्ता, मुंबई आवृत्ती, लोकरंग पुरवणी, दि. ०७.०८.१६ मधील, ‘पडसाद’. • वर उल्लेखलेल्या ‘पडसाद’ मध्ये वसंत खेडेकर यांची, ‘आधी कोंबडी की .. ?’ या शीर्षकाची प्रतिक्रिया आलेली आहे. त्यात उल्लेखलेल्या , ‘संगम’ सिनेमातील गीतावर ही टिप्पणी. • पुढे जाण्यापूर्वी एक लहानशी चूक आपण सुधारूया. खेडेकर […]

योगा-योग ( काल्पनिक दीर्घ कथा )

विजय त्याच्या लॅपटॉपवर काहीतरी टाईप करण्यात व्यस्त होता इतक्यात दरवाजा ह्ळूच आता ढकळत प्रतिभा गोड आवाजात म्ह्णाली ‘मे आय कम इन सर !’’ तिचा गोड आवाज ऐकुण विजयने लॅपटॉपमधे खुपसलेले आपले डोके वर काढले आणि डोळे वर करून प्रतिभाकडे पाहात म्ह्णाला, प्लीज कम इन! प्रतिभा त्याच्या टेबला जवळ येताच त्याला म्ह्णाली, ‘ बाहेर तुमचे बाबा आलेत […]

शब्दनाद – चिकू मारवाडी

‘मारवाडी’ या शब्दाचं ‘चिकूशी’ घनिष्ट मेतकूट असल्याचं आपण लहानपणापासून ऐकत आलोय. प्रत्यक्षात आपला संबंध घोलवडच्या खाण्याच्या चिकूशीच जास्तं येत असल्याने, राजस्थानातील मारवाड्याशी त्याचा काय संबंध, असा प्रश्न कधीना-कधी आपल्याला पडतोच. ‘मारवाड्या’चा अविभाज्य भाग असलेल्या ‘चिकू’चा आपण समजतो तसा खाण्याच्या चिकू नामक फळाशी काहीही संबंध नाही हे थोऽऽडा विचार केला तर लक्षात येतं. मारवाड्याचा संबंध कंजूसपणाशी येतो […]

एक आगळीवेगळी मुलाकात – डास राणी सोबत

दिनांक ५.८.२०१६ रात्रीचे दहा वाजले होते. रियो ऑलम्पिकचा उद्घाटन समारोह उद्या सकाळी चार वाजता आहे, म्हंटले जरा लवकर झोपावे. पण माझ्या मनात एक तर नियतीच्या मनात काही वेगळेच असते. अचानक वीज गेली. आमचे इमानदार सत्यवादी मुख्यमंत्री म्हणतात दिल्लीत विजेची कमतरता नाही. पण जो पर्यंत नमो प्रधानमंत्री आहे, दिल्लीची जनता चैनीत झोपू हि शकणार नाही. नमोच्या इशार्यावर […]

मुंबई महानगरपालिकेची अगम्य नावांची वॉर्ड सिस्टीम

मुंबई महानगरपालिकेची सध्या प्रचलीत असलेली महानगरपालिकेच्या हद्दीतील वॉर्डांना ए, बी, सी ते पुढे एक्स, वाय, झेड अशी इंग्रजी बाराखडीची नांवं देण्याची पद्धत अगम्य आहे.. सर्व कारभार मराठीतून करायचा (म्हणजे तसा ठराव करायचा, प्रत्यक्ष नाही केला तरी चालेल) आणि वॉर्डांची नांवं मात्र इंग्रजी अक्षरांची ठेवायची हा प्रकार माझ्यासारख्या अल्पबुद्धी माणसाला समजण्याच्या पलिकडचा आहे. मित्रांनो, तुम्ही ज्या विभागात […]

आॅडी

रस्त्यावर, बस-ट्रेनमधे आपल्याला भेटणारी सर्वसामान्य माणसं आपल्याला त्यांच्या नकळत काय ‘दृष्टी’ देऊन जातात..! अट एकच, आपण त्यांच्याशी बोलायचं किंवा त्यानी बोलायचा प्रयत्न केला तर प्रतिसाद द्यायचा.. काल असाच रस्त्यावरच्या एका चहाच्या टपरीवर चहा पिण्यासाठी उभा होतो. चहावाल्याकडे नेहेमीप्रमाणे दोन-चार रिक्शावाले चहा पिण्यासाठी आले होते. त्याच्या रिक्शांच्या पलिकडे एक ‘आॅडी’ पार्क केलेली होती आणि त्या गाडीची किंमत […]

कोकणी माणसाचं सुपिक डोकं..!!

कोकणातल्या प्रत्येक मुक्कामात काही न काही नविन शिकायला मिळते. काल परवा देवगडात मुक्कामाला होतो. पावसाने थोडी उसंत घेतल्याने सहज भटकायला बाहेर पडलो होतो.हवेत छानसा ओलसर गारवा जाणवत..चहा प्यायचं मन झालं. एका साध्याशा टपरीत शिरलो. काऊंटर वर एक कोकणी वर्णाची मध्यमवयीन बाई बसली होती. चहा सांगितला आणि सहज इकडे-तिकडे बघत बसलो. माझ्या नजरेला त्या टपरीतली एक वेगळी […]

मुंगी आणि झाडाचे पान

एक धनाढ्य, श्रीमंत व्यापारी होता. त्याचा भला मोठा बंगला होता. त्याच्या बंगल्याला एक सुरेख टेरेस होता. त्या टेरेसवर एक झोपाळा होता, बरीच फुलझाडे लावलेली होती. विश्रांती घेण्याची ही जागा त्याची अत्यंत आवडती जागा होती. एके दिवशी तो व्यापारी झोपाळ्यावर विश्रांती घेण्यासाठी पहुडला होता. तेव्हा त्याचे लक्ष एका मुंगीकडे गेले. ती मुंगी झाडाचे एक वाळलेले पान घेऊन […]

1 451 452 453 454 455 515
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..