अकबर आणि बिरबल यांच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. अकबर बादशहा असूनही बिरबलची आणि त्याची खूप चांगली मैत्री होती. अनेकदा बिरबलबरोबरच्या सहवासात आपण बादशहा आहोत हे अकबर विसरून जात असे. त्यामुळे दरबारातील अनेक मंडळींना उभयतांची ही मैत्री खटकायची. बिरबलला अकबरपासून कसे दूर करता येईल यासाठी काही जणांचे सारखे प्रयत्न चालू असत. एकदा असेच कोणीतरी बिरबलबद्दल अकबर बादशहाचे […]
भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला महाराष्ट्रात व देशातही गणपतीची स्थापना होते. प्रत्येक घरात प्रथेप्रमाणे गणपतीची प्राणप्रतिष्ठापणा केली जाते दहा दिवसांनंतर विसर्जन होते. चतुर्थीनंतर गणेशाची माता पार्वती-म्हणजेच गौरी चे त्यापाठोपाठ आगमन होत आहे. पश्चिम महाराष्ट्रात गौरी-गणपती, तर मराठवाड्यात महालक्ष्मी असे म्हणतात. महालक्ष्मीचा हा सण तीन दिवस असतो व तो घरोघर साजरा केला जातो. खडय़ाची, कलशाची, मुखवटय़ाची अशा […]
ट्रिंग-ट्रिंग फोनची घंटी जोरजोरात घणघणली, मी उठून उभा राहतो तो पर्यंत बंद झाली. बहुतेक रॉंग नंबर असावा असा विचार करत परत झोपलो. पाच-दहा मिनिटातच मोबाईल वाजला, पाहिला तर सुधीरचा फोन. घाई-घाईत घेतला, काय रे काय झाले? काही नाही, मला माहित आहे अगदी अवेळी फोन केलाय मित्रा, sorry पण फारच बेचैन झाल्यासारखे झाले आहे, येऊ शकशील का? […]
सुखी माणसाचा सदरा मिळणे म्हणजे परीस मिळण्यासारखंच असतं..सुखी माणसाचा सदरा ही एक सुंदर कल्पना असल्याचे सर्वांनीच मान्य केले असले तरी त्या सदऱ्याचा शोध सुरूच असतो, निरंतर सुरुच राहाणार.. या सदऱ्याची कल्पना बहुतकरून मराठी जनांमधेच आहे की अन्य समाजातही आहे याची मला माहिती नाही परंतू तशी ती नसल्यास सुखासाठी अन्य काहीतरी परिधान करावं असं वाटण्यासारखं त्यांच्यातही असणारच.. […]
ॲडमिशन मिळाले! पुजा घाला …. नाही मिळाले ? पुजा घाला …. पास झालात !पुजा घाला …… नापास झालात ? पुजा घाला …. नोकरी मिळाली! पुजा घाला … नाही मिळत ? पुजा घाला …. प्रमोशन मिळाले ! पुजा घाला … नाही मिळत ? पुजा घाला … घर घेतलेत ! पुजा घाला … घेता येत […]
`गुरु ब्रह्मा, गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात परब्रह्म तस्मैः श्री गुरुवेः नमः।` आज डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस… हाच दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. डॉ. राधाकृष्णन हे भारताचे दुसरे राष्ट्रपती होते व प्रथम ते शिक्षक होते. ते ‘नीतिशास्त्र’ या विषयाचे प्राध्यापक होते. शिक्षक हा समाजाचा निर्माण कर्ता आहे. छोट्या बालकाचे देशाचा उत्कृष्ट नागरिक म्हणून […]
ज्ञानपीठ विजेत्या लेखिका कै. महाश्वेता देवी यांची एक सुंदर कविता आणि तिचा अनुवाद. अनुवादक माहित नाही… आ गए तुम? द्वार खुला है, अंदर आओ..! पर तनिक ठहरो.. ड्योढी पर पड़े पायदान पर, अपना अहं झाड़ आना..! मधुमालती लिपटी है मुंडेर से, अपनी नाराज़गी वहीँ उड़ेल आना..! तुलसी के क्यारे में, मन की चटकन चढ़ा आना..! अपनी […]
आमच्या खामगाववरून आषाढी एकादशीला दरवर्षी विशेष यात्रा स्पेशल रेल्वे गाडी सोडण्यात येते. २००३ पासून रेल्वे प्रशासनाने खामगाव ते पंढरपूर ही गाडी सुरू केली आहे. सुरुवातीला एक फेरी सोडण्यात आली. परंतु नंतर दरवर्षी खामगाव, शेगावसह बुलडाणा आणि अकोला जिल्ह्यातून वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा प्रतिसाद पाहता आणि रेल्वेला मिळणारे उत्पन्न पाहता रेल्वे प्रशासनाने या फेऱ्या वाढवल्या आहेत. अाता चार फेऱ्या धावतात. बरे असो. […]
बासरी तयार करण्यासाठी लागणारा बांबू हा तिथी पाहून तोडतात. पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी या तिथींना बांबू तोडला तर त्याला हमखास कीड लागते, असं बासरी तयार करणारे सांगतात. त्याचं कारण म्हणजे या तिथींमध्ये शेवटी ‘मी’ येतो. याच ‘मी’पणाच्या अहंकारातून कार्यनाश होतो आणि बासरी टिकत नाही, असा समज आहे. कृष्णाचं आवडतं वाद्य बासरी. एकदा कृष्णाच्या सगळ्या सख्या, […]
(काही दिवसांपूर्वी वादळी वार्यासह झालेल्या पाऊसात एक झाड जमिनीवर उन्मळून पडलेले दिसले. सहज निरखून पहिले, एक चिमणा हि जमिनीवर पडलेला दिसला. मनात विचार आला, कसे गेले असेल त्याचे आयुष्य …. वासंतिक वार्यात एका अनामिक गंधाने बैचैन होऊन चिमण्याणे घरट्यातून उड्डाण भरली. आकाशात विहरताना त्याला त्याची चिवताई भेटली. दोघांनी एका दुसर्याकडे पहिले. चिमण्याला पाहून चिवताई गालात हसली. […]