मनावर ताबा मिळविणे, त्याचा संयम करणे किती कठीण गोष्ट आहे ! मनाची एखाद्या वेड लागलेल्या माकडाशी तुलना केली जाते ती अगदी योग्यच होय. एक माकड होते. माकडाचीच जात ती! सगळ्या माकडांप्रमाणेच तेही स्वभावतःच चंचल होते. त्याचा तो स्वभावसिद्ध चंचलपणा कमी वाटला म्हणून की काय, एकाजणाने त्याला यथेच्छ दारू पाजली. माकडाच्या चंचलपणाला आणखीच बहर आला. भरीत भर […]
धनचंद नावाचा एक हिऱ्याचा एक व्यापारी होता. अनेकदा अत्यंत मौल्यवान हिरे घेऊन तो प्रवास करायचा. खरे तर किमती हिरे घेऊन प्रवास करायची मोठी जोखीमच होती. परंतु धनचंद हा अतिशय चतुर व प्रसंगावधानी होता. त्यामुळे आलेल्या संकटातून तो बऱ्याच वेळा वाचला होता. एकदा दुसऱ्या एका हिरे व्यापाऱ्याशी सौदा करून धनचंद काही किमती हिरे घेऊन रेल्वेने प्रवास करीत […]
रमेश विजयची वाट पाहात हॉटेलात एका टेबलावर बसलाय…वेटर जवळ येऊन मेनू कार्ड देतो विजय तो तसाच समोर ठेवत एक चहा आणायला सांगतो, चहा पिता – पिता रमेश समोर च्या टेबलावर बसलेल्या सुंदर तरुणीकडे पाहात असतो ती तरूणीही मधे – मधे चोरून त्याच्याकडे पाहात असते इतक्यात रमेश समोरून येताना दिसतो त्याला पाहून विजय जागेवर उटून उभा राहतो […]
गडसम्राट गोपाळ नीलकंठ दाण्डेकर ह्यांच्या सहवासातील संस्मरणीय सोनेरी क्षण : वंदनीय आप्पांच्या जन्मशताब्दी वर्षाचा आज ८ जुलै २०१६ सांगता दिन मला लहानपणापासूनच गड-किल्ल्यांची, इतिहासाची आवड ! त्याला कारणही तसेच आहे. वंदनीय श्रीशिवछत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ज्या शिवनेरी किल्यावर झाला, त्याच शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेल्या जुन्नर गावचा माझा जन्म ! त्यामुळे पूज्य गो. नी. दाण्डेकर ह्यांच्या पुस्तकांची […]
अकबर बादशाहच्या पदरी असलेल्या बिरबलाच्या चतुरपणांच्या गोष्टी प्रसिद्ध आहेत. त्यातीलच ही एक कथा. अकबराच्या दरबारात एकदा एका गवयाचे गाणे झाले. ते गाणे अकबराला इतके आवडले, की त्याने त्या गाण्याला एक हत्तीच भेट दिला. ती भेट पाहून गवई आनंदी व्हायच्या ऐवजी दुःखीच झाला. कारण आधीच त्याच्या कुटुंबाचा चरितार्थ नीट चालत नव्हता. त्यात पुन्हा एवढ्या मोठ्या हत्तीला पोसणे […]
निराश असा एक माणूस नदीकाठी बसला होता. बाजूला त्याचे गाठोडे पडले होते. नदीच्या प्रवाहाकडे तो उदासपणे पहात होता. तेवढ्यात एक साधू तिथे आला आणि त्याच्या शेजारी उभा राहिला. दोघांची दृष्टादृष्ट झाली. त्या माणसाच्या डोळ्यात अश्रू आलेले पाहून साधू सहानुभूतीने त्याची विचारपूस करू लागला. तो माणूस म्हणाला, ‘माझे नशीबच वाईट आहे. जवळ पैसे नाहीत, कष्ट उपसूनही वीट […]
‘क’ च्या कथानकातली ‘तुलसीभाभी’ तुम्हाला आठवते का? आतासारखी चॅनेल्सची गर्दी तेव्हा नव्हती. त्यामुळे ‘तुलसीभाभीने’ घराघरात घर केलं होतं. त्यातला हँडसम हिरो ‘मिहीर’अॅक्सिडेंटमध्ये गेला हे प्रेक्षकांना अजिबात रुचले नाही. सगळीकडे एकच चर्चा. अगदी लोकलच्या लेडीज डब्यातला तो जिव्हाळ्याचा प्रश्न झाला होता. आता सिरीअल न पाहण्याचा निर्णय कित्येकांनी घेतला आणि त्याला पुन्हा अवतरावे लागले. कसा काय ते तुम्हाला […]
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या इतिहासात डोकावले तर अनेक मजेशीर गोष्टी लक्षात येतात. या संमेलनाच्या आयोजनातून अनेक योगायोगही जन्माला येत असतात. अशाच काही योगायोगांचा आढावा. पहिली पाच संमेलने ग्रंथकार संमेलने या नावाने भरली. या संमेलनांना स्वागताध्यक्ष नव्हता. १९०८ च्या पुणे संमेलनाला प्रथमच स्वागताध्यक्ष लाभले आणि ते होते वा.गो.आपटे. न्यायमूर्ती म.गो.रानडे १८७८ मध्ये पुण्यात भरलेल्या साहित्य संमेलनाचे […]
स्वातंत्र्यवीर सावरकर हे महान क्रांतीकारक, साहित्यिक, लेखक होते. त्यांनी कायम हिंदुत्त्ववाद मांडला म्हणून ते कायम दुर्लक्षित राहीले. मात्र खरे म्हणजे सावरकर जरी हिंदुत्त्ववादी होते तरीही त्यांनी इतर धर्मांचा नेहमीच आदर राखला. आजच्या तथाकथित बाजारबुणग्या सेक्युलरवाद्यांसारखे नव्हते. आजचे सेक्युलरवादी म्हणजे केवळ हिंदूविरोधी असतात. आपल्या देशात ज्यांना हिंदूंनी निवडून दिले ते स्वत:ला हिंदू म्हणायला तयार नाहीत. दिवंगत राजीव […]
संदर्भ : एक टी.व्ही. सीरियल एका प्रसिद्ध टी.व्ही. चॅनलवरील एक सीरियल.( नांवाची ज़रूर आहे कां ?). एका बाजूला कर्मकांडावर विश्वास नसलेलें नास्तिक मुलीकडचें कुटुंब ; आणि दुसर्या बाजूला कर्मकांडावर, पत्रिकेवर, संपूर्णपणें श्रद्धा असलेलें मुलाकडचें कुटुंब. हें सीरियलच काय , अशी अन्य अनेक सीरियल्स आहेत, जी अंधश्रद्धा, पुराणमतवादीपणा, जुनाट कालबाह्य परंपरा, अशा अनेक गोष्टी दाखवत असतात, जस्टिफायसुद्धा […]