सत्व गुणाला मनुष्य देहातला अत्यंत उत्तम गुण म्हणून समर्थांनी वर्णिले आहे. समाजाचे व्यवहार अविरथ चालले आहेत याचे मूळ कारण समाजात सत्व गुणी माणसे आहेत.प्रतेक माणसात सत्व ,रज आणि तमो गुण असतात. परंतु ज्यात सत्व गुणाचे प्राबल्य असते तो माणूस समाजासाठी मोठा आधार असतो.वैयक्तिक स्वार्था पेक्षा परोपकार ,सेवाभाव , करुणा ,प्रेम,समाधान ,निस्पृह व्यवहार ज्याच्या ठाई असतात तो […]
बाटलीतले पाणी विकत घेउन पिणे ही एक फॅशन झालेय का? हा प्रकार गेल्या काही वर्षातच फोफावला आहे. खरं आहे की बाटलीतलं पाणी शुद्ध असतं, त्याने पोटाचे विकार-बिकार होत नाहीत वगैरे वगैरे. पण त्यासाठी विकत घेतलेल्या बाटलीतलंच पाणी प्यायला हवं असं कुठे आहे? घरातूनही पाणी बाटलीत भरुन घेउन जाता येतंच की? पण त्याने स्टेटस खाली येतं असं […]
द्वापारयुगात कृष्णाने यमुनेच्या तीरावर प्रेमाचा संदेश दिला होता. त्याच यमुनेचाकाठी भव्य दिव्य अश्या मंचावर दैवीय प्रेरणेने सर्व पंथीय धार्मिक नेते जमले होते. तिथे पोपचे प्रतिनिधी होते, इस्लामी जगतातल्या विभिन्न पंथांचे देश-विदेशातील धार्मिक नेते हि होते. या शिवाय भारत सहित एशियातील सर्व अन्य पंथीय धार्मिक नेते हि जमले होते. या शिवाय जगातल्या आदिम जमातीतील नेते हि तिथे […]
Palindrome म्हणजे असा शब्द, वाक्प्रचार , वाक्य किंवा कोणतीही अर्थपूर्ण अक्षररचना जी शेवटाकडून सुरूवातीकडे वाचत गेलं तरी बदलत नाही. इंग्रजीत Palindrome ची रेलचेल आहे. पण मराठीत हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच. लहानपणी तर दोन तीनच माहित होते. १) चिमा काय कामाची २) ती होडी जाडी होती. ३) रामाला भाला मारा. पण अलिकडे कळलं की मराठीत Palindrome ला ‘विलोमपद’ […]
‘आर्यमा’ हा, श्रीमती चंद्रलेखा बेलसरे यांच्या कवितांचा संग्रह आहे. तो वाचल्यानंतर, त्यावर, एक रसिक वाचक म्हणून, कांहीं लिहावें, असा विचार केल्यामुळे, हा लेख. अर्थात्, त्या अनुषंगानें मनांत आलेल्या कांहीं गोष्टींचाही येथें ऊहापोह केलेला आहे . (सहज, जातां जातां म्हणून सांगतो, चंद्रलेखा बेलसरे या, ‘साहित्य चपराक’ मासिकाच्या उपसंपादक आहेत). प्रस्तुतचा मजकूर म्हणजे स्व-संवादच आहे म्हणा ना ! […]
मराठी भाषेतील एक अद्भुत गंमत बघा. एकाच वाक्यात महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांची नावे कशी आली आहेत ते बघा…. अगं कमल, उठ, पाय धु, रस, भजॆ, चहा बनव. अ :- अकोला, अमरावती, अौरंगाबाद, अहमदनगर ग :- गडचिरोली, गोंदिया क :- कोल्हापूर म :- मुंबई ल :- लातूर उ :- उस्मानाबाद ठ :- ठाणे प :- पालघर, पुणे, परभणी […]
प्रास्ताविक : माझें शैशव गेलें महाराष्ट्रातल्या ‘देशा’वर (घाटावर) , आणि त्यानंतर मी होतो शिक्षणासाठी मध्य प्रदेश व बंगालमधें. (इथें, ‘देशावर’ म्हणजे, कोकणवासी ज्याला घाटावर म्हणतात, तो महाराष्ट्राचा पठारावरील प्रदेश. ‘देश’ म्हणजे भारतदेश ही संकल्पना इथें अभिप्रेत नाहीं). त्या काळात मला ‘आगर’ हा शब्द’ भेटला संस्कृत शिकतांना आणि मराठी भाषेत एक तत्सम शब्द म्हणून. सुप्रसिद्ध समाजसुधारक आगरकर […]
एका संकेतस्थळावर बोली भाषेत भाषेत साहित्य पाठविण्याचा संदेश मिळाल्यावर विचारात पडलो माझी बोली भाषा कुठली. घरात हि हिंदी आणि मराठी मिश्रित भाषा बोलली जाते. एकांतात विचार सुद्धा कधी हिंदीत तर कधी मराठीत करतो. शालेय शिक्षण हिंदीत आणि पुस्तके वाचून शिकलेली मराठी. या दोन्ही निश्चित माझ्या बोली भाषा नाही. कारण मला हिंदीतली कुठली हि बोली भाषा अवगत […]
विजय कोणत्यातरी कामात व्यस्थ होता इतक्यात त्याचा फोन खणखणला, पलिकडून त्याच्या एका ओळखीच्या गृहस्थाने जो स्वतःला त्याचा मित्र म्ह्णवून घ्यायचा पण विजयने ज्याला आपला मित्र कधीच मानला नव्हता, खंर म्ह्णजे ! विजयची जी मैत्रीची व्याख्या होती त्या व्याख्येत तो दूरपर्यंत कोठेही बसत नव्हता. त्याने विजयला प्रश्न केला,’ कोठे आहेस ? उत्तरादाखल विजय म्ह्णाला,’’ आहे इकडे ! […]