‘देव’ दीनाघरी धावला
पोस्टमन काका वास्तव्यास असलेल्या इमारतीच्या बरोब्बर खाली असलेल्या स्वीट्सच्या दुकानात नेहमीप्रमाणे गिऱ्हाकांची वर्दळ..तोचं फोनची रिंगची ट्रिंगट्रिंग..कॉऊंटरवर पैशाची देवाणघेवाण..फोनपेवर लक्ष ठेवून बसलेले.. […]
विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…
पोस्टमन काका वास्तव्यास असलेल्या इमारतीच्या बरोब्बर खाली असलेल्या स्वीट्सच्या दुकानात नेहमीप्रमाणे गिऱ्हाकांची वर्दळ..तोचं फोनची रिंगची ट्रिंगट्रिंग..कॉऊंटरवर पैशाची देवाणघेवाण..फोनपेवर लक्ष ठेवून बसलेले.. […]
अंतरा आणि अभिनय दोघे मुंबईतील वरळीच्या किनाऱ्यावर फिरत होते. दोघांनी आपले हात मागून दुसऱ्याच्या कमरेभोवती लपेटलेले होते. अंतरा आणि अभिनय दोघे मनाने एकमेकांच्या प्रेमांत आकंठ बुडालेले होते. दोघांचेही शिक्षण आता पूर्ण झालं होतं. या वर्षी ते दोघेही आपापल्या गांवी परतणार होते. अंतराला तर उद्याच गांवी जायचे होते. अभिनय आणखी तीन चार दिवसांनी आपल्या गांवी जाणार होता. […]
चीनच्या इतिहासात इ.स. ६६० मध्ये वू झाओ ही विलक्षण व्यक्तिमत्त्वाची स्त्री सम्राज्ञीपदावर विराजमान होऊन गेली. वू झाओपूर्वी किंवा नंतरही चीन देशात कुणा स्त्रीला सम्राज्ञीपद लाभले नाही. त्यामुळेच चीनची एकमेव सम्राज्ञी असे वू झाओला म्हटले जाते. […]
काही वर्षांपूर्वी स्कूटर, मोटर सायकली यांची रस्त्यावर भरमार होण्याआधी,सायकल ही एक चैन असायची..मैत्रिणींना सायकल चालवताना पाहून आपल्याला कधी चालवता येईल याचे ध्यास लागत. सर्वात आधी मी सोलापूरला असताना मुलींना सायकल चालवताना पाहिलं होतं , माझी मैत्रीण पुष्पा राठी आणि तिची मोठी बहिण सुशीला यांची दिवसांची वाटणी झालेली होती.. तीन तीन दिवसांची..तेव्हां मी सोलापूरच्या हरिभाई देवकरण शाळेत होते. […]
जगामध्ये छंद वेड्या लोकांची काही कमी नाही, जन्माला येणारी व्येक्ती काहीना काही छंद घेऊन येत असते आणि काही छंद तर आश्चर्य वाटेणारे असतात.त्यांचा छंद,त्यांची आवड लोकांच लक्षवेधुन घेत असते,त्यांचा छंद चर्चेचा विषय ठरतो.म्हणून माणसाला काहीना काही चांगला छंद असावा जेणेकरून आपण केलेल्या चांगल्या कामाची कोणीतरी दखल घेतली पाहिजे.माणसाच काम आणि कर्तृत्व लक्षवेधी असेल तर त्यांच्या कामाची दखल निश्चित घेतली जाते. […]
तसं पाहता शोभाच्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात सुखाचे, आनंदाचे म्हणता येण्यासारखे प्रसंग मोजकेच होते… वयाच्या दहाव्या वर्षी वडिलांचं छत्र हरवलं… त्यानंतर -ती आणि तिची आई- एवढंच तिचं विश्व ! घरची परिस्थिती बेताचीच. शोभाचे वडील एका खाजगी कंपनीत सिक्युरिटी गार्डची नोकरी करत होते. त्यामुळे त्यांच्या पश्चात पेन्शन वगैरेचा प्रश्नच नव्हता. त्यांच्या मृत्युनंतर कंपनीतर्फे मिळालेली खोलीदेखील सोडावी लागली होती. त्यामुळे […]
हिंदू, जैन, मुस्लिम कोणत्याही धर्मामध्ये उपवासाचं महत्त्व फार. त्यातही हिंदूंचे उपवास म्हणजे मौजच वाटते. या उपवासांना चालणाऱ्या पदार्थांची यादी एवढी असते की, लोक उपवासाच्या जिनसांचा चारी ठाव स्वयंपाक करून पोटभर जेवू शकतात. त्यातही महाराष्ट्रीय लोकांना उपवास म्हटलं की, साबुदाणा, वऱ्याचे तांदूळ वगैरे लागते तर दक्षिणेकडे उप्पीट, पोहे, पाण्याऐवजी दुधात भिजवलेल्या पिठाची भाकरीसुद्धा चालते. […]
खारच्या सोळाव्या रोडवरील “निवांत” ह्या बंगल्यात नेहमीप्रमाणेच शांतता होती. तो बंगला खाजगी डिटेक्टीव्ह यशवंत धुरंधर ह्यांचा होता. बंगल्यात ते, त्यांचा भाचा व मदतनीस चंद्रकांत नवलकर, त्यांच्या घराची व्यवस्था पहाणाऱ्या आत्या नसलेल्या पण आत्याबाई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वयस्क बाई, सदू नांवाचा एक अर्धवेळ काम करणारा पण तिथेच रहाणारा व शिकणारा गडी, रहात. निवांत जरी निवांत असला तरी […]
सन २०१९च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांचा माहौल सुरू झाला आहे. चढत्या क्रमाने त्याची रंगत वाढत जाणार आहे, रंग बदलत जाणार आहेत. भारतीय लोकशाहीसाठी तर निवडणूक हा मोठा सोहळाच. या सोहळ्याचे स्वरूप मात्र खूप झपाट्याने पालटत चालले आहे. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions