नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

मोबाईल आणि मी

मोबाईल मुळे फक्त माणसेच जवळ आली पण त्यांची मने मात्र कायमची दूर गेली. पूर्वी प्रेम डोळ्यातून मेंदूपर्यत पोहचत असे पण हल्ली ते कानातून मेंदूपर्यत पोहचत असावं मोबाईलच्या माध्यमातून. सध्याच्या तरूण – तरूणी मोबाईलवर दिवस- रात्र काय बोलत असतात हाच सध्या एक संशोधनाचा विषय झालेला आहे.  […]

व्यस्त राहण्याचा मार्ग

मराठी ब्लॉगची पध्दत, संगणाकावर नुकतीच सुरु झाली होती. थोडक्यांत वर्णन करायाचे म्हणजे हे एक प्रकारे आपल्या नावाचे एक खाते काढणे असते. ह्य़ाला करआकारणी वा फी नव्हती. आपल्या नावाचा ई-मेल काढून ब्लॉग काढणे. एक प्रकारे वेबसाईट काढण्यासारखेच आहे. ह्य़ा खात्यावर तूम्ही लेख, कविता, माहिती, फोटो इत्यादी देऊ शकतात. वाचक वर्ग ती वाचतात. जर कुणी प्रतिक्रीया दिल्या तर […]

डुकरू

अजून उजाडलं ही नव्हतं. इतक्यात डुकरुची हुसहूस सुरू झाली. इकडे तोंड खुपस, तिकडचा वास घे. इकडे लाथा मार, तिकडे लोळण घे. डुकरुच्या ह्या हुसहुशीमुळे त्याची बाकीची भावंडं पण चाळवली. डुकरीण आई रागावली. “फर्रऽऽफूऽऽक” करत आईने डुकरूला हाक मारली. आईचा आवाज ऐकताच, मान खाली घालून डुकरू जोरात धावतच आला. आईने पटकन त्याला कुशीत घेतलं. पण डुकरुने आईला […]

नटसम्राट नक्की कुणाचा?

‘नटसम्राट’ हा चित्रपट नक्की कुणाचा? तो फक्त विश्वनाथ दिनकर पाटेकर (वि.दि.पाटेकर) म्हणजेच नाना पाटेकर यांचाच? कारण जाहीरातीमध्ये तर त्यांचाच चेहेरा दिसतो? पण चित्रपट पाहिल्यावर लक्षात येते की हा चित्रपट फक्त वि.दि.पा. म्हणजेच नाना पाटेकरांचाच नाही तर अनेकांचा आहे. हा चित्रपट विक्रम गोखले यांचा पण आहे. तसे पाहीले तर विक्रम गोखले यांची भूमीका तशी दुय्यम आहे. नानाच्या […]

लग्न आणि मध्यमवर्ग

मध्यमवर्गीय माणसांच्या आयुष्यातील सर्वात आनंदाची आणि स्मरणात ठेवण्याजोगी कोणती घटना असील तर ती घटना म्ह्णजे लग्न ! मध्यमवर्गीय माणसाच संपूर्ण जीवनच म्ह्णा ना ! लग्न या संकल्पनेच्या आवती – भोवतीच गुंफलेलं असतं. मध्यमवर्गीय माणसाची लग्न या विषयापर्यत पोहचल्यावर सर्वसाधारणतः विचार करण्याची क्षमताच नष्ट होते. त्याची बुध्दी निषक्रीय होते. मध्यमवर्गीय माणसांनीच आजकाल लग्नाचा बाजार मांडलाय आणि त्या बाजाराला काही जोडधंदयांचा आधार ही दिलेला आहे. […]

सांगायलाच ह्वंय, असं नाही…

सांगायलाच ह्वंय, असं नाही… हा भगवान निळे यांचा सृजन प्रकाशनचा नुकताच प्रकाशित झालेला कवितासंग्रह वाचला. मी म्ह्णजे, तुम्हीही! या पहिल्याच कवितेत कवी सर्वसामान्य लोकांच प्रतिनिधित्व करताना दिसतो. तेव्हाही आजच्यासारखे… ही कविता अजूनही आपल्या समाजव्यवस्थेत फार आशादायी असे बदल झालेले नाहीत हे पटवून देते . अशी कित्येक वर्षे लोटतील या कवितेतून कवीने आपण आजही कसं भीतीच्या सावटाखाली […]

प्रामाणिकपणा

दुसर्‍या उपयोग मात्र झालाय याच मला समाधानच आहे. काही लोकांना दुसर्‍यांच्या हक्काच्या मेहनतीच्या पैशावर ही डल्ला मारून स्वतःचा गल्ला भरण्याची सवय असते अशी लोक माझ्यासारख्यांच्या प्रामाणिकपणाचही भांडवल करून स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी बर्‍याचदा प्रयत्नशील असतात अशा लोकांचा आपमान मी त्यांच्या तोंडावरच करतो कारण आमच्या प्रामाणिकपणावर लोकांच्या असणार्‍या विश्वासालाच ते तडा देत असतात. […]

आजची शिक्षण पद्धती आणि पालक

आजची आपल्या देशातील एकूणच शिक्षण पद्धती पाहिल्यावर शाळेत नक्की जातं कोण पालक की पाल्य तेच कळ्त नाही आणि या सर्वात शिक्षक नेमकी कोणती आणि कशी भूमिका बजावतात या बद्दल बर्याच लोकांच्या मनात प्रश्न चिन्ह निर्माण होत. त्याला आंम्हीही आपवाद नाही. आज इतक्या वर्षानंतराही आपल्या देशातील शिक्षण पद्धती सुधारलेय की ढासळ्लेय तेच कळायला काही मार्ग उरला नाही.
[…]

तर्कतीर्थ

विद्वत्ता माणसाला प्रतिभेसारखीच उपजत मिळत असते, तो एक सहज गुण आहे. विद्वत्तेला अध्ययनाने आणि अभ्यासाने विकसित करता येते आणि विद्वान व्यक्ती ही आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत अध्ययनरतच रहात असते. त्या व्यक्तीच्या अवती भोवती विद्वत्तेचे प्रखर तेज प्रकाशत असते, पण तो विद्वत्सूर्य मात्र चंद्रासारखा शीतल आणि पिकलेल्या फळांनी फलभारित झालेल्या झाडाप्रमाणे अवनत रहातो.
[…]

1 460 461 462 463 464 515
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..