खरं सांगते, कालचा गोड-गोड अनुभव मी माझ्या आडव्या आयुष्यात (अजून मी ‘उभी’ राहात नाही ना,म्हणून म्हंटलं) कधीही विसरणार नाही! क्षणभर, माझा अजुनही विश्वास बसत नाही. पण… मी दोन कानांनी ऐकलं. दोन डोळ्यांनी पाहिलं. आणि एका नाकाने वास घेतला, म्हणून माझा विश्वास बसला! रात्री दूध प्यायल्यावर थोडीशी टंगळमंगळ केली की मी ढाराढूर झोपत असे. मी दूध पीत […]
संध्याकाळ झाली. हवेत मस्त गारवा होता आणि घरात छान उबदार वातावरण. तो घरात गादीवर आरामात पडला होता. इतक्यात ती घरात आली. ही नुसती आली नाही तर गुणगुणत आली. हिला सदानकदा गुणगुणण्याची सवय आहे. ही हसत हसत गुणगुणली,“एऽऽ, तुला एक सॉलीड जोक सांगते. हा जोक जगातला सगळ्यात लहानात लहान जोक आहे. फक्त एका वाक्याचा जोक! या जोकची […]
सकाळ झाली. त्याने भराभर आंघोळ केली. दोन वाट्या पाणी प्यायला. थोड्याच वेळात त्याने एक कचकचून शिटी वाजवली. या आवाजाने बाबांची झोप चाळवली. शिटी ऐकून त्याचे इतर मित्र मैत्रिणी गोळा झाल्या. मग त्याला ही चेव चढला. त्याने पुन्हा एकदा शिटी वाजवली! बाकीच्या मित्रांनी पण शिटी वाजवायचा प्रयत्न केला. पण कुणालाच जमलं नाही. त्याने आता जोरात शिटी नाही […]
विंदाच्या बालकविता भन्नाटच आहेत. कारण त्या दोन पातळीवर आहेत. जेव्हा त्या कविता मुलं वाचतात तेव्हा त्या त्यांना त्यांच्या वाटतात. आणि जेव्हा मोठी माणसं त्या बालकविता वाचतात तेव्हा त्या कविता त्यांना मुलांकडे पाहण्याचा, मूल समजून घेण्याचा नवीन दृष्टीकोन देतात. या बालकविता मोठ्या माणसांना अधिक प्रगल्भ करतात. मुलांसोबत विंदांच्या बालकविता वाचताना तर मी अनेकवेळा थरार अनुभवला आहे. त्यांची […]
लोकराज्यचे 1956 पासूनचे अंक मी ग्रंथालयात अनेकवेळा चाळले होते. मात्र त्यापेक्षाही जुने प्रारंभीचे अंक मिळणार म्हणून मी जरा जास्तच आनंदात होतो. मनात विचारांची गर्दी जमली होती. लोकराज्यची मोठी परंपरा नजरेसमोर येत होती. लोकराज्य हे केवळ नियतकालिक नाही तर तो आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीचा साक्षीदार आहे. गेल्या सहा दशकात लोकराज्यने खूप काही अनुभवले आहे. […]
युनिसेफ साठी शिक्षण सल्लागार म्हणून काम करत होतो. त्यावेळी दोन जिल्ह्यातील तीन हजार प्राथमिक शाळांच्या शिक्षकांचे प्रशिक्षण असे काम माझ्याकडे होते. त्याचवेळी महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातल्या मास्टर टिचर्सना प्रशिक्षण व भारतातील अन्य प्रयोगशील शाळांना/शिक्षकांना भेटी देऊन शैक्षणिक प्रयोगांचे आदान-प्रदान असे एकंदर कामाचे स्वरुप होते. ‘त्या दोन जिल्ह्यात’ मी जाण्याआधी युनिसेफने कोट्यवधी रुपये शैक्षणिक साहित्य निर्मितीसाठी खर्च केले […]
एका गावाच्या बाजूला एक मोठा डोंगर होता. या डोंगरावर वेगवेगळ्या फळांच्या फळबागा होत्या. सुंदर सुवासिक फुलांच्या फुलबागा होत्या. भाज्यांचे तरारलेले मळे होते. मलांसाठी खेळायला मस्त प्रशस्त बाग होती. बागेत थुईथुई उडणारं कारंजं होतं. या बागेतून त्या बागेत जायला लाल नागमोडी रस्ते होते. डोंगराच्या वरच्या बाजूला घनदाट जंगल होतं. या डोंगरावर झुळझुळणारे झरे होते. तुडुंब भरलेल्या विहिरी […]
एका सभागृहामध्ये सत्संगचा कार्यक्रम होता. मी त्याचा आस्वाद घेण्यसाठी गेलो होतो. हालके हालके श्रोते जमू लागले. प्रवेश दारावर मी आलो. अचानक माझी नजर एका छोट्या किड्यावर पडली. दाराच्या बाजूस तो पडला होता. त्याच्या हालचाली वरून त्याला दुखापत झालेली असावी असे वाटले. त्याची तगमग चालू असून तो उलटा पडलेला होता. त्याच्या अवस्थे विषयी भूतदया वाटली. क्षणात एक […]
बदलते भाव कसा वागतो दोन प्रकारे, दिसून सर्वा येते राग दाखवी क्षणात, आणि प्रेमळ ही वाटते….१ देहस्तरावरले प्रश्न सारे, सुख-दु:खानी भरले अंतर्मनातील भाव परि, आनंदीच वाटले….२ देहाशी त्या येवून संबंध, राग लोभ दाखवी केवळ त्यातील आनंद शोषण्या, अंतरात्मा शिकवी…३ जड होता पारडे एकाचे, भाव येई दिसून भावांचे रंग बदलती, अंतर बाह्यावरून…४ डॉ. भगवान नागापूरकर […]