नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

जीवन म्हणती याला

    जीवन म्हणती याला   त्याची ऐकूनी करूण कहाणी, डोळे भरून आले पाणी हृदय येता उंचबळूनी, निराश झाले मन ।।१।। आघात होता त्याच्या जीवनी, तो तर नव्हता माझा कुणी तरी का आले प्रेम दाटूनी, उमजेना काही ।।२।। दु:ख दुजाचे समोर आले, मनास ज्याने कंपीत केले दोन जीवांच्या हृदयामधले, अदृष्य हे धागे ।।३।। मानव धर्म एक […]

समत्व बुद्धी

समत्व बुद्धी   एका टोंकावरती जातां, शांत न राही झोका तेथें, विलंब न करता क्षणाचा, जाई दुजा टोका वरती ।।१।।   जीवनांतील झोके देखील, असेच सदैव फिरताती, बऱ्या वाईटातील अंतर, नेहमी चालत असती ।।२।।   समाधान ते मिळत नसे, जेव्हां बघता तुम्हीं भोग, त्यांत देखील निराशा येते, मनीं ठरविता जेव्हां योग ।।३।।   जवळपणाच्या नात्यामध्यें दुरत्वाचे […]

ज्ञान साठा

  ज्ञान साठा   जमीन खोदतां पाणी लागते, हीच किमया निसर्गाची, कमी अधिक त्या खोलवरती, साठवण असे जलाशयाची ।।१।।   प्रत्येक जणाला ज्ञान देवूनी, समानता तो दाखवितो, अज्ञानाचा थर सांचवूनी, आम्ही आमचे ज्ञान विसरतो ।।२।।   एक किरण तो पूरे जाहला, अंधकार तो नष्ट करण्या, ज्ञान किरण तो चमकूनी जातां, फुलून येते ज्ञान वाहण्या…..३ डॉ. भगवान […]

जिवंत चित्र

चित्रकला, आणि निबंधाच्या दरवर्षी आंतरशालेय स्पर्धा होतात. या स्पर्धेसाठी प्रत्येक शाळेतून फक्त एकच विद्यार्थी निवडला जाई. यावर्षी रैनाच्या शाळेतून तिची निवड निबंध स्पर्धेसाठी झाली होती. रैनाला वाचनाची आवड आहे. तिच्याकडे गोष्टीची आणि वेगवेगळ्या विषयावरची अनेक पुस्तकं आहेत. तिचे आई बाब तिला वाढदिवशी खूप पुस्तकं भेट देतात. तिला चित्र काढण्यापेक्षा वाचायला, लिहायला अधिक आवडतं. रैनाने शाळेच्या मासिकात […]

गावोगावी गंमत शाळा

‘एकदा काही मुले गांधीजींना भेटायला गेली. गांधीजींनी मुलांना विचारले,’तुमचे शिकण्याचे माध्यम कोणते?’ काही मुले म्हणाली,’हिंदी’ तर काही मुले म्हणाली,’इंग्रजी’. गांधीजी म्हणाले,’अरे या तर आहेत भाषा! मी तुम्हाला शिकण्याचे माध्यम विचारतो आहे?’ आता मुले गोंधळली. मुलांना जवळ घेत गांधीजी म्हणाले,’अरे भाषा, गणित, विज्ञान असा कोणताही विषय शिकण्यासाठी तुम्ही तुमचे हात वापरता का? प्रत्यक्ष अनुभव घेता का? ही […]

खरं गणित

नेहमी शेवटचा पेपर गणिताचा असतो. रैना, प्रिया, अर्णव आणि राधा या चौघांनी ठरवलं की यावेळी आपण गणिताचा सॉलीड अभ्यास करायचा आणि भरपूर मार्क मिळवायचे. गणितात दोन प्रकारच्या परीक्षा असतात. लेखी आणि तोंडी. रैना आणि अर्णव लेखी परीक्षेत हुशार. प्रियाला फक्त तोंडी परीक्षेची अजिबात भीती वाटत नाही. राधाला मात्र सगळ्याचीच भीती वाटते. राधाचे बाबा म्हणाले, “अरे मग […]

त्यांची शाळा

आंस लागली मजला, बघून याव्या त्या शाळा ।। देहू, आळंदी, परिसर, जाऊनी तो धुंडाळला ।।१।। कोठे शिकले तुकोबा, ज्ञानोबांना ज्ञान मिळे ।। साधन दिसले नाहीं, परि तेज भासे आगळे ।।२।। विचार झेंप बघतां, आचंबा आम्हां वाटतो ।। कोठून शिकले सारे, मनी हा प्रश्न पडतो ।।३।। त्यांची शाळा अतर्मनीं, गंगोत्री ज्ञानाची ती ।। वाहात होती बाहेरी, पावन […]

गोलम गोल पाने.

फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही. त्यावेळी सगळ्या सगळ्या झाडांची पानं अगदी सारखीच होती. सगळी पानं एकदम गोलम गोल होती. सगळ्या झाडांची, झुडुपांची, वेलींची पानं एकदम गोलम गोल होती. सगळ्या झाडांवर लहान लहान गोल गोल पानं. तर काही झाडांवर मोठी मोठी गोल गोल पानं. झाडांवरच्या वेलीसुध्दा गोल गोल. त्या वेलींची पानं सुध्दा गोल गोल गोल. झाडाखालचं […]

लव्ह स्टोरी

ते रोज एकमेकांना लांबूनच पाहायचे. पण.. बोलणं कधी झालं नाही. कधी कधी ते एकाच तलावात पोहायला जायचे. पण.. त्यावेळी इतकी गर्दी असायची की त्यांना काही बोलता यायचं नाही. कधी ते फिरायला गेले तर लांबूनच चालाचये. त्यामुळे.. बोलणं नाही तर फक्त बघणं व्हायचं. गेलं वर्षभर तो तिच्याशी बोलण्याची वाट पाहात होता. आज तो हात ताणून आरामात निवांत […]

1 463 464 465 466 467 515
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..