काही दिवसापूर्वी एक लग्नपत्रिका माझ्या पाहण्यात आली. त्या लग्नपत्रिकेत वधू-वरांच्या नावासमोर कंसात त्यांच शिक्षणही लिहलेल होत. दोघांचही शिक्षण सारखंच होत मला वाटत त्यांच वय, समाजातील आर्थिक स्तर, जात-धर्म, रंग,उंची शारिरीक बांधा ही सारखाच असावा त्याचबरोबर त्यांच्या आवडी-निवडी आणि व्यसनेही सारखी असावीत येथे व्यसने हा शब्द मी दारू वगैरे पिण्यासंदर्भात वापरलेला नाही. सांगायच तात्पर्य इतक लग्न ठरण्यापासून ते होईपर्यत समानतेला फारच मह्त्व आहे आपल्या समाजात म्ह्णूनच तर आपल्यापेक्षा कमी शिकलेल्या तरूणाशी लग्न करण्याचा निर्णय एखाद्या तरूणीने घेतल्यास लोक नाक मुरडतात. […]
दिवाळी अंकासाठी मी गेली 12 वर्षे सतत लिखाण करतोय पण मोजकच. 2002 सालच्या माझं कोकण दिवाळी अंकात माझी ‘माऊली’ ही तिसरी कथा प्रकाशित झाली. त्यापुर्वी नवाकाळ मध्ये माझ्या दोन कथा प्रकाशित झाल्या होत्या. माझ कोकण दिवाळी अंकासाठी आई या विषयावर साहित्य मागविण्यात आले होते त्यामुळे आईला केंद्रस्थानी ठेवून मी ही प्रेम कथा लिह्ली होती. […]
चित्रपटातील एखादे नायक – नायिका जेंव्हा आपल्याला आवडत असतात तेंव्हा त्यांच चालणं, बोलणं, ह्सणं, रडणं, नाचणं सारच आपल्याला आवडत असत. पण याचा अर्थ आपलं त्यांच्यावर प्रेम आहे असा होत नाही ना, सांगायच तात्पर्य इतकच आवड आणि प्रेम या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. […]
“ते ची प्रिया” या ललिता ताम्हाणे लिखित आत्मचरित्राच्या माध्यमातून अभिनेत्री प्रिया तेंडुलकर यांचा नवीन प्रवास तसंच त्यांनी कला क्षेत्रासाठी दिलेल्या योगदानाबद्दलचा अगदी हळूवारपणे ठाव घेण्यात आलेला आहे. या पुस्तकाचा वेध घेऊन त्यांच्या स्मृतींना वाहिलेली मन:पूर्वक शब्दांजली.
“मानवी भाव भावनांचं रहाणीमानाचं आणि समाजाचं प्रतिबिंब आपल्याला चित्रपटामधून उमटलेलं दिसतं. सणासुदींची परंपरा, व्रत वैकल्ये यांसारखे विषय हिंदी व प्रादेशिक चित्रपटांना अपवाद नव्हते; मग दिवाळी सारखा “राजेशाही सण” तरी कसा चित्रपटांपासून लांब असेल.. […]
माईकचा शोध लागला नसता तर काय झाले असते? तसे काहीच झाले नसते. माईक नव्हता तेव्हा सभा, बैठक होतच होत्या की! महाभारताच्या युध्दात माईक नसतानाही इकडचे सेनापती आणि तिकडचे सेनापती आपआपल्या बाजूंच्या सैनिकांना इन्स्ट्रक्शन देतच होते की! त्यामुळे माईकचा शोध लागला नसता तरी काहीच फरक झाला नसता.. […]