सकाळी सकाळी प्रधानजीकडे महाराज धावतच पोहचले.हे दृष्य उभ्या आयुष्यात प्रधानजींनी बघितले नव्हते.कारण धावायची पाळी त्यांचीच असायची.राजाकडे सगळयांनी धावायचे.राजाने नव्हे.त्यामुळे महाराज दिसताच प्रधानजींनी नैऋत्य दिशेकडे बघितले.आज सूर्य तिकडून तर निघाला नाही ना,याची खात्री करुन घेतली. […]
अंबाणी दादांच्या महालाची फार चर्चा होत असते. त्या चर्चेमुळे आग्य्रातील ताजमहल आणि वाशिंग्टन येथील व्हाईट हाऊस हे राजवाडे कम महाल फिके पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवाय या दोन्ही महालांची नव्हाळी कमी झालेलीच आहे. ताजमहलाचं दर्शन बिल क्लिंटन पासून ते बाबूराव कोटलवार आणि मिशेलवहिनी ओबामा पासून मंगलाताई ओतारे यांच्यापर्यंत कुणीही,कधीही घेऊ शकतात. […]
मुलांची वाढत्या वयातील जडणघडण व त्यांच्यावर होणारे सकारात्मक संस्कार हे एकत्र कुटुंबाच्या घरात होताना दिसतात. लहानग्या सदस्यांच्या शंकांचे निराकारण एकत्र कुटुंबातील जेष्ठ सदस्याकडून होते, आता मात्र, विभक्त कुटुंबपद्धती अस्तित्वात असल्याने मुलांना आपल्या भावनांचा निचरा होण्यास अडचण निर्माण होते तसेच त्यास वेळ लागतो किंवा बंधने येतात असे वाटते. […]
कालचीच गोष्ट, कृषी भवन वरून ती मेट्रोत चढली. क्षणभराकरता नजरा भिडल्या. तब्बल तीस वर्षानंतर ती दिसली होती. रूप रंग बदलले असले तरी ही तिने मला ओळखले. एक मंद स्मित तिच्या चेहऱ्या वर उमटले. पण दुसऱ्याच क्षणी तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले, असे वाटले, वसंत ते शिशिराचा प्रवास क्षणातच घडलाकालचीच गोष्ट, कृषी भवन वरून ती मेट्रोत चढली. क्षणभराकरता नजरा भिडल्या. […]
ज्यांनी माझ्या स्मरणात आठवणीचे कायमचे घर केलेले आहे. तीच छबी जागृत झाल्याचे जाणवले. दूर बसून मी त्यांना बराच वेळपर्यंत न्याहाळले. कांही वेळाने ते उठले. चालू लागले. काय आश्चर्य त्यांच्या चालण्याची पद्धत देखील हुबेहूब तशीच. ज्यांनी माझ्या वडिलांना बघितले असेल असा कुणीही माझ्याशी सहमत होईल की त्या अनामिक व्यक्तीची शरीर संपदा माझ्या वडिलांशी मिळती जुळती होती. […]
मी सासवड येथे भरणार असलेल्या ८७ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून उभा आहे हे आपणास विदित असेलच. त्यामागील भूमिका आपणाप्रत पोहोचवावी या हेतुने हे पत्र आपणास लिहित आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे मराठी मनाचा खरा उद्गार बनायला हवे. ते साहित्य-संस्कृतीच्या मुलगामी चिंतनाचे, दिशादर्शक आणि जाणीवा प्रगल्भ करणारे आशयघन उद्गार बनावे ही माझी भावना आहे. […]
डॉक्टर आर. डी. लेले हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चीकीत्सक Physician म्हणून प्रसिद्ध. ते भारताच्या राष्ट्रपतीचे विशेष आरोग्य सल्लागार म्हणूनही नांव लौकिकाला आलेले. […]
ब्रिटनचे राजपूत्र चार्लस यांचा लेक प्रिन्स विल्यम हा भारतीय वंशाचा असल्याचा शोध डीएनए संशोधकांनी लावल्याचे वृत्त आले आणि आमच्या घरी आनंदोत्सव सुरु झाला.आमच्या सौभाग्यवतीनं सगळया कॉलनीस पेढे वाटले.संतोषी मातेच्या मंदिरात जाऊन नारळ फोडला.तिच्या चेहऱ्यावरचे तेज नुसते ओसंडून वाहत होते. […]
अशी कुरकुरित भजी आपल्या बायकांना कां करता येत नसावे हो, रावसाहेबांनी भाऊसाहेबांना विचारलं. कुरकुरित भजी हॉटेलातच. घरी फक्त बायकोचं बोलणं तेव्हढं कुरकुरित.मॉलमध्ये फक्त कुरकुरे चिप्स. […]