साहित्य
विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…
समलेंगिकता एक विकृती
परमेश्वरच्या मनात एका पासून अनेक होण्याची इच्छा निर्माण झाली आणि सृष्टीच्या निर्मितीची सुरवात झाली. वैज्ञानिक भाषेत याला “बिग बैंग” असे म्हणतात. त्या क्षणापासून परमात्मा रचित प्रत्येक जीव “एका पासून अनेक होण्याची” इच्छा मनात धारण करून सृष्टी निर्मितीची परमेश्वराची इच्छा पूर्ण करीत आहे. एक कोशकीय जीव स्वत:ला विभाजित करून एका पासून अनेक होते. परमेश्वराने स्त्री-पुरुष या रूपाने मानवजातीची निर्मिती केली आहे. अन्य जिवांप्रमाणे ‘एका पासून अनेक होण्याची’ परमेश्वरी इच्छा मानवा मधे ही आहे.
[…]
रेनवॉटर हार्वेस्टींग काळाची गरज
वाढत्या लोकसंख्येच्या रेटयाने माणसांच्या मुलभूत गरजा भागवीताना सुखसोयी व विकासाच्या नावाखाली सुंदर वसुंधरेचे अगणित लचके तोडले जात आहेत याला कुणीही अपवाद नाही. पर्यावरणाचे ऐवढया प्रमाणात प्रदुषण होत आहे की तापमान वृद्धीने नैसर्गिक ऋतू बदलत आहेत. पाऊस कुठे कमी तर कुठे जास्त तर कधी अवेळी पडल्याने शेतकर्यांचे व नागरिकांचे अतोनात नुकसान होत आहे. पाणी टंचाईने शहर व गावातील माणसांना टँकरने किंवा मैलोंनमैल लांब जाऊन पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
[…]
ट्रेड युनियन्स् आणि संप
जागतिक आर्थिक मंदिमुळे देशात औद्योगिक व इतर क्षेत्रात मरगळ आली आहे. काही कंपन्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत तर बर्याच ठिकाणी कामगार कपात चालू आहे. आपला हट्ट पुरा करून हवे ते हवे तेव्हां पदरात पाडून घेण्यासाठी लहान मुले ज्या मानसशास्त्राचा वापर करतात त्याच प्रकारे आज सर्वच क्षेत्रातील ट्रेड युनियन्स् आपल्या मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी संपाचे तंत्र वापरताना दिसतात. प्रथम भारतात ट्रेड युनियन कशी आली ते बघू.
[…]
मुंबईत घर मिळेल का घर?
घर बांधण्यासाठी लागणाऱ्या सर्वच वस्तूंच्या किमंती/भाव गगनाला भिडल्याने घराच्या किंमती वारेपाम वाढल्या आहेत. त्यामुळे भारतात कुठेही घर घेणे सोपे नाही. त्यातून प्रत्येकाचे स्वप्न असते की माझे मुंबईत घर असावे. घर विकत घेण्यासाठी लागणारे भांडवल किंवा स्वत:कडील पुंजी कमी पडते म्हणून बँकेतून कर्ज काढून घर घेण्याचेही धाडस होत नाही. कारण बँकांच्या व्याजाचे दर सर्व सामान्य माणसांच्या आवाक्याच्या बाहेर आहेत. मुद्दल अधिक व्याज फेडण्यामध्ये उभ आयुष्य सरून जाईल.
[…]
मुंबईचे शांघाय करण्याआधी !
आज सरकार मुंबईचे शांघाय करण्याचा घाट घालीत आहे पण मुंबईत राहणाऱ्या काही नागरिकांच्या व सतत येणाऱ्या लोंढ्यांच्या नसानसात भिनलेला अस्वच्छतेचा निचरा कोण करणार? नागरिकांच्या मानसिकतेवर रत्यांची तसेच सार्वजनीक वाहानांची व ठिकाणांची स्वच्छता अवलंबून असते. स्वतंत्र भारताचे मंत्री, पुढारी व सुजाण नागरिक देशाच्या प्रमुख कार्यक्रमांच्या वेळेस सार्वजनीक ठिकाणी स्वच्छता राखण्याच्या आणि कश्याकश्याच्या शपथा घेतात. समारंभ झाल्याझाल्या मंत्रीच रस्त्याच्या बाजूला पण तंबाखू किंवा गुटख्याची पिचकारी मारून शपथेला हरताळ फसताना आपण बघतो. निवडणुकींच्या वेळी शपथेवर दिलेली आश्वासने जशी सोईस्कररीत्या विसरली जातात तसेच हे. “गरज सरो आणि वैद्य मरो”.
[…]
कालाय तस्मै नम: !
विज्ञान व तंत्रज्ञानातील शोधामुळे सगळ्या गोष्टी सहज व विनाकष्ट उपलब्ध झाल्याने माणूस जसा सुखी झाला तसा तो आळशी व ऐतोबा होऊन सवईचा गुलाम झाला. सवय ही काळ, वेळ व कारणांनी बदलत जाते. आज आपण पहातो सर्वच स्त्री व पुरुषांचे जीवन सवईमुळे बदलल्याने शारीरिक व्याधीत वाढ होताना दिसते. पूर्वी पैसा कमाविण्यासाठी घाम गाळायला लागायचा आता घाम गाळायला पैसा खर्च करावा लागतो यातच सर्वकाही आलं.
[…]
कळत न कळत
आपल्या आजूबाजूला वावरतांना नीट लक्ष देऊन ऐकाल व लक्षात ठेवालं तर कुठल्या ना कुठल्यातरी संधर्भात काही शब्द आपण वारंवार उच्चारताना पाहतो. अर्थात हे शब्द मुद्दामून वापरले जात नाहीत तर सहज ओठावर दररोजच्या चांगल्या का वाईट सवयींमुळे का शिष्ठाचाराने येतात हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे एवढे खरे. पण काही शब्द काळ, वेळ, कारण व प्रसंगाचे भान न ठेवता वापरल्यास अर्थाचा अनर्थ होऊन आपण एका चांगल्या मित्राची/मैत्रिणीची एवढ्या वर्षाची मैत्री गमाविण्याची पाळी येऊ शकते.
[…]
माझी पहिली वारी
जून महिन्याच्या दुसर्या आठवड्यात श्री. करंदिकरांनी मला वारीला येण्यासंबंधी विचारले. मी अजून पर्यंत वारीला गेलेलो नसल्याने मला तर जाण्याची इच्छा होती. करंदिकरांना तसे कळवताच ते त्या तयारीस लागले. त्यांनी आपल्या पुण्यातील मित्राशी संपर्क साधला व पुणे सासवड या प्रवासाची तयारी केली. सासवडला राहण्यासाठी त्यांनी त्यांच्या मित्राला फोन करून हॉटेल बुकिंग संबंधी कळवले, व मला तसे कळवले. माझ्या परिचयातील सौ. भोसेकर यांचे कोणी नातेवाईक तेथे राहात असल्याचे माझ्या ऐकिवात होते म्हणून मी त्यांना आमच्या सासवडला जाण्याच्या कार्यक्रमाविषयी बोललो. त्यांनी सासवडला त्यांच्याच घरी राहाण्याचा आग्रह केला व तसे श्री. करंदिकरांनाही कळविण्याबद्दल त्यांनी मला सांगितले. त्यांच्या घरचा पत्ता व तेथे राहण्यासाठी संपर्क म्हणून त्यांच्या भावाचा फोन नंबरही कळवला. […]
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे
संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जर डोळय़ांसमोर आली तर, या चळवळीत योगदान दिलेले शाहीर त्यांच्या कर्तृत्वाने डोळय़ांसमोर उभे राहतात. शाहीर गवाणकर, शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर आत्माराम पाटील, शाहीर चंदू भराडकर, जंगम स्वामी, शाहीर लीलाधर हेगडे, शाहीर कृष्णकांत जाधव अशा अनेक लोककलावंतांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जागवली. […]