नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

मराठी विश्वकोश, अठरावा खंड : काही निरीक्षणे

शेख अमर (शाहीर अमर शेख) ते सह्याद्रि (नोंदशीर्षकांतील तत्सम शब्द संस्कृतप्रमाणेच) एवढ्या नोंदींचा या खंडात समावेश आहे. ‘शेतकामाची अवजारे व यंत्रे’ ही प्रस्तुत खंडातील पहिली विस्तृत नोंद असून ‘संस्कृत साहित्य’ ही या खंडातील सर्वाधिक विस्तृत नोंद ठरते. रामदेवबाबा व रविशंकर यांच्यावरील नोंदी तितक्याशा तटस्थ व विश्वकोशीय प्रकृतीला मानवणाऱ्या गंभीर प्रकृतीच्या वाटत नाहीत. रामदेवबाबांच्या नोंदीतील गुगल या संकेतस्थळावर त्यांचा कार्यक्रम व यौगिक साधना यांना १७,५०० पृष्ठे दिलेली आहेत हे वाक्य या नोंदीचा दर्जा दाखविण्यास पुरेसे आहे. (पृष्ठ १९७).
[…]

कॉमनवेल्थ (4) कृष्णमेघ आणि कॉमनवेल्थसाठी बनलेले दिल्लीचे रस्ते

– थोड्या पाऊसातच दिल्लीच्या रस्त्यांचे काय हाल होतात – आपण वर्तमान पत्रात वाचतच असाल. कॉमनवेल्थ आणि दिल्लीचे रस्ते ही फक्त एक वात्रटिका आहे ….
[…]

आम्ही सार्‍याच गांधारी

किती युगं लोटली गांधारी होऊन गेल्याला. गांधारी! नव्हे, नव्हे- पतिपरायण गांधारी. सती-साध्वी गांधारी. किती शतकं उलटली

पतिपरायण गांधारी होऊन गेल्याला. काळाची उलथापालथ झाली. कलियुग अवतरलं. वर्णसंकर झाला. वर्णसंकराचा बाऊ वाटेनासा

झाला. माणसांचीही उलथापालथ झाली. पोशाख बदलले. आचार-विचार बदलले. पाश्चात्त्य-पौर्वात्य भेदाभेदातलं अंतर फारसं उरलं

नाही. स्त्री- पुरुषांच्या कुटुंबातल्या जबाबदाऱ्यांची सरमिसळ झाली. आर्थिक सहभागाची तिला मुभा मिळाली. शिक्षणाची दारं तिच्यासाठी खुली झाली. बदलली नाही ती स्त्रीविषयक धारणा. पुरुषांची तर नाहीच नाही. सुखासुखी हाती आलेले सर्वाधिकार

फारच थोडे सोडू शकतात. बव्हंशी (मूठभर 20 टक्के सोडून) स्त्रीचीही स्वत:विषयीची धारणा बदलली नाही. पतिपरायणतेचं बिरुद मिरविण्याची स्त्रीची हौस फिटली नाही आणि पतिपरायण स्त्री ही पुरुषाची हावही सुटली नाही. कारण आम्हाला हव्या आहेत फक्त गांधारी.
[…]

कविता (१) / प्रोडक्ट कविता

शब्दांच्या साच्यात आम्बट – गोड, कडू – तिखट भावनांचा रस ओततो आणि तैयार करतो फास्टफूड सारखा स्वादिष्ट प्रोडक्ट ‘कविता’. — विवेक पटाईत

न्हैचिआड

वेंगुर्ल्याहून शिरोड्याकडे जातान वाटेत मोचेमाडची खाडी लागते. ही खाडी ओलांडली की डाव्या कुशीला जे गांव येतं ते आमचं न्हैचिआड. न्हय म्हणजेच नदीच्या अथवा खाडीच्या आड ते न्हैचिआड ! आमचं हे न्हैचिआड डोंगराच्या उतारावर वसलेलं आहे. गावात आम्हा इनामदार रेग्यांची पाच घरं आणि इतर शेतकर्‍यांची म्हणजेच इथल्या भाषेत कुळांची चाळीस पन्नास घरं. गावात वरचा वाडा आणि खालचा वाडा असे दोन भाग येतात. आमची घरं खालच्या वाड्यातली.
[…]

1 492 493 494 495 496 506
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..