वेंगुर्ल्याहून शिरोड्याकडे जातान वाटेत मोचेमाडची खाडी लागते. ही खाडी ओलांडली की डाव्या कुशीला जे गांव येतं ते आमचं न्हैचिआड. न्हय म्हणजेच नदीच्या अथवा खाडीच्या आड ते न्हैचिआड ! आमचं हे न्हैचिआड डोंगराच्या उतारावर वसलेलं आहे. गावात आम्हा इनामदार रेग्यांची पाच घरं आणि इतर शेतकर्यांची म्हणजेच इथल्या भाषेत कुळांची चाळीस पन्नास घरं. गावात वरचा वाडा आणि खालचा वाडा असे दोन भाग येतात. आमची घरं खालच्या वाड्यातली. […]
अमेरिकेला जाऊन आल्यानंतर अगदी महिन्याभरातच ऑस्ट्रेलियाला जाण्याचा योग जुळून आला. एका महासत्तेला भेट दिल्यानंतर या दुसर्या प्रगत देशाला जाताना दोघांची तुलना करण्याचे विचार उमटणं साहजिकच होतं. […]
त्यानी मुठ उघडुन दाखवली, हातातले ५० रु. आजीकडे दिले व शेठनी “जा मी तुला माफ़ केलेय. हे पैसे घे आणि घरी जा या पैशाची मिठाई खा.” अस सांगीतल्याच सांगीतल. आजीला सुजलेला सख्याचा गाल दिसत होता, उपाशी दुसरी दोन नातवंड दिसत होती. आज घरात खायला काहीच नव्हत. आणखीन दोन दिवस उपाशी राहाव लागणार होत. तीनी ते पैसे देवासमोर ठेवले. सख्याला जवळ घेतल त्याच्या दुखर्या गालावरुन हळुवार हात फ़िरवत म्हणाली “सख्या, अरे ते मोठे लोक आहेत. आपण फ़ार लहान आहोत. शेठेनी मारल तर काय होतय ?तेच आपले अन्नदाते आहेत.” […]
गोव्याला आमच्या श्री. शांतादुर्गा देवीचं देऊळ आहे. श्री. शांतादुर्गादेवी ही आमची कुलदेवता. कोकणातल्या गावातला गणपती उत्सव साजरा करुन मुंबईला परतण्याआधी गोव्याला जाऊन देवीचं दर्शन घेणं हा रिवाज आम्ही अनेक वर्षे पाळतो आहोत. […]
सुट्टीच्या दिवसांत जनकपुरितल्य़ा डिस्ट्रीक्ट पार्क मध्ये फिरायला जात असे – ताश खेळणाऱ्या पेंशनर म्हात्यारांच्या डोळ्यांत मला जे दिसल….मरण येत नाही म्हणून जिवंत … […]
९/९, विश्वास निवास, परळ, मुंबई – १२ हा आमचा परळच्या घराचा पत्ता. आयुष्यातील पंचवीस वर्षे मी परळला काढली. जन्मल्यापासून म्हणजेच १९४९ सालापासून ते १९७४ पर्यंत. थोडक्यात माझं सर्व बालपण परळला गेलं. बालपण आणि तरुणपणातील काही सुरुवातीची वर्ष. आज साठीच्या दाराशी घुटमळत असतानाही मनात बालपणीच्या आठवणी टवटवीत आहेत. परळ ओलांडून पुढे जाताना या सर्व आठवणी जागृत होतात. परळचा रस्तान् रस्ता, तिथल्या इमारती, तिथली गजबज सारं काही पुन्हा आठवतं. क्षणार्धात काळ तीसएक वर्ष मागे झेपावतो. मी पुन्हा परळचा होऊन जातो आणि परळ माझं. […]
खुसरो रैन सुहाग की जागी पी के संग, तन मेरो मन पिऊ को दोउ भए इक रंग. लैला मजनूच्या प्रेमाच्या गोष्टी ऐकल्या होत्या. मजनूच्या पाठीवर पडणार्या कोड्यांचे व्रण लैलाच्या पाठीवर उमटायचे. कारण शरीराने अलग-अलग असले तरी त्यांचे ह्रदय एक होते. लैला मजनूच प्रेम हे खरं प्रेम होत. आजच्या तरुण पीढ़ीच्या प्रेमाच्या कल्पना काय? तो स्मार्ट – […]
एका घरामध्ये एक गोजीरवाणं बाळ जन्माला आले. गोरे, गोरेपान. गोबरे, गोबरे गाल. लालचुटुक जिवणी. पाणीदार डोळे, मानेवर रुळणारे कुरळे जावळ आणि इवले, इवलेसे हातपाय. त्या गुटगुटीत बालकाला पाहून सर्वजण मोहून जायचे. त्याला अंजारायचे, गोंजारायचे. […]