हल्ली गजबजलेला झांझीबार शहरमध्यात असला तरी त्यावेळी ‘स्टोनटाऊन’ला समुद्रमार्गाने पोहोचता यायचे. गुलामांसाठी पंधरा कारागृहे होती. छप्पर खालच्या पातळीवर असे व आत छोटी गवाक्षे होती. पुरूषांसाठी व स्त्रियांसाठी वेगळी कारागृहे होती. […]
तो दिवस आजही मला लख्खपणे आठवतो आहे. आम्ही दोघी सहज तुळशीबागेत फिरायला गेलो होतो. तरुण मुलींप्रमाणे हातगाडीवरुन कानातले वगैरे चांगले घासाघीस करुन हौसेने घेतले. मग आवडत्या हॉटेलमध्ये जाऊन आवडीच्या पदार्थांचा मस्त आस्वाद घेत बसलो. […]
1982 सालची गोष्ट. रात्रीचे दोन वाजले होते. ‘मर्लीन टटल’ नावाची वन्य प्राणीशास्त्रज्ञ पूर्व आफ्रिकेत झिंबाब्वेच्या नदीच्या गुडघाभर पात्रात जवळपासच्या वटवाघळांचा शोध घेत होती. तिने एक विचित्र आवाज ऐकला. वास्तविक परिसरात त्यावेळी सिंह, तरस याचे डरकावणे सतत चालू असायचे, जंगली म्हशी उंच गवतात स्वैर धूडगूस घालत होत्या. पण या कोलाहलात एक कर्कश्श आणि अगदी विचित्र आवाज घुमला. मर्लीनने आवाजाचा मागोवा घेतला पण तिला आवाजाचे उगमस्थान नीटसे शोधता आले नाही. […]
आफ्रिकन काव्यात स्थित्यंतरे चालूच आहेत. हल्लीची गीते, कथानके-कथाकथने, नृत्ये या माध्यमांतून हा बदल दिसून येतो. त्यातच आता नव्या विद्युत् माध्यमांचा प्रभावही पडत आहे. यात गेल्या दहा पंधरा वर्षातील उभरते व विश्र्वव्यापक ‘इंटरनेट’च्या माध्यमात प्रसिध्द होणाऱ्या साहित्याचा या क्रांतीमध्ये सिंहाचा वाटा आहे. ‘वोल सोयिंका’ हे नायजेरियन कवी. बरीच वर्षे त्यांना देशाबाहेर राहावे लागले. स्वातंत्र्यासाठी व लोककल्याणासाठी झगडण्यात […]
आयुष्यात काहीतरी करायचं, या उद्देशाने जीवनाचं सार्थक करण्यासाठी जीवापाड प्रयत्न करीत होतो. पण त्याच वेळी गावाकडला आप्तस्वकीयांची, आई- वडिलांची आठवण आली की, एक एक क्षण युगासारखा वाटायचा. […]
ग़ालिब म्हणतो, ख़्याल उनका सुख़न मेरा, ज़बाँ उनकी दहन मेरा बहार उनकी, चमन मेरा गुल उनके, गुलिस्ताँ मेरा ! (विचार त्याचे पण भाषा माझी, त्याचा स्वर,पण माझे मुख; त्याचा वसंतऋतु, बगिचा माझा; त्याची फुलं नि वाटिका माझी.) “कोसला”कार भालचंद्र नेमाडेंच्या शब्दांत सांगायचे तर उदाहरणार्थ मी आज मिलिंद शंकर नेरुरकरवर लिहिणार आहे. तुम्हाला पहलेछूटच सांगून टाकतो की […]
एक एवढासा, पिटुकला, तुच्छ व काहीसा किळसवाणा जीव उंदीर! तो एकटाच आणि त्याच्या विरुद्ध आम्ही दोन माणसं. गनिमीकाव्याने आमचे युद्ध सुरू होते. प्रश्न त्याच्या जीवन-मरणाचा होता. अस्तित्वाची लढाई तो निकराने लढत होता. आम्ही आमची बुद्धी पणाला लावून त्याला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करत होतो पण तो आमचे सर्व प्रयत्न शिताफीने धुळीला मिळवत होता. […]
सर्जेरावांनी लेखन करताकरता गेल्या काही वर्षात रंगांशी खेळता खेळता त्यांचे हात इतके सरावले की आज पर्यत त्यांनी केलेल्या पेंटिंग्सपैकी सर्वोत्कृष्ट चित्र म्हणून जयवंत पाटलांच्या या चित्रांची गणना होईल, हे नक्की. संस्थेच्या लोभापोटी, आपली संस्था आपुलकीच्या नात्यांसवे सौहार्दपूर्ण कलाकारांच्या उन्नतीचे व्यासपीठ आहे. […]
आता हेच बघा नं…. Tag आणि लोकमत आयोजित, नातं खास.. नृत्य झकास..स्पर्धेची ad हर्षदानी मला पाठवली. मी आणि गीतानी हिंमत करुन भाग घेतला. फक्त २ दिवस जमके practice केली. जमेल नं या वयात? असं मनातही आणलं नाही. […]