हल्लीच्या शिक्षण पद्धतीत होत असलेली देशी भाषांची अवहेलना, नीती व धर्मशिक्षणाचा अभाव, उद्योगधंद्यांची नव्या तऱ्हेची माहिती मिळण्याचा असंभव, कोणत्याही प्रकारे विद्येची खरी अभिरुची उत्पन्न होण्यास जी साधने लागतात त्यांचा अभाव आणि देशासंबंधाने एक प्रकारचा जो योग्य अभिमान उत्पन्न व्हावयास पाहिजे तो उत्पन्न होणे तर दूरच, पण तो उत्पन्न न होण्याबाबत घेतलेली खबरदारी हे हल्लीच्या शिक्षण पद्धतीतील ठळक दोष होत. […]
‘जो धारणा करतो तो धर्म’ अशी धर्माची व्याख्या केली जाते. त्यातून समाजसुधारणेसाठी, तो सुव्यवस्थित चालावा यासाठी धर्म आहे हे सूचित होते, पण कित्येक वेळा धर्मातील अनिष्ट रूढींमुळे किंवा धर्मामधील भांडणामुळे समाजाची घडी विस्कटते. त्याची प्रगती खुंटते. तेव्हा आजच्या या विज्ञानयुगात धर्म आवश्यक आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. […]
जगातल्या उपलब्ध असणाऱ्या सर्व साहित्यामध्ये, अन्नासंबंधी अथवा भोजनासंबंधीचे सर्वात प्राचीन असे उल्लेख आढळतात ते भारतीय ग्रंथांमध्ये. ऋग्वेद हा जगातला सर्वात प्राचीन ग्रंथ मानला जातो. या ऋग्वेदामध्ये परिपूर्ण आहारासंबंधी अनेक सूक्त आहेत. […]
प्रबोधन पर्वात वृत्तपत्रांना खूप महत्त्व प्राप्त झाले. या वृत्तपत्रांनी आणि नियतकालिकांनी समाजमन घडवण्याचे महत्त्वाचे कार्य केले. जाणीव जागृती केली. स्वातंत्र्याच्या आकांक्षाबरोबरच नवप्रेरणा, जिज्ञासा यांचे खुले आकाश समाजासमोर उभे केले. अगदी त्याच प्रकारे मागच्या दहा-पंधरा वर्षात समाज माध्यमांनी नवी क्रांती घडवून आणली आहे. […]
काल पु.ल. वाचत बसलो होतो. ते एके ठिकाणी म्हणतात “तुम्हाला ‘मुंबईकर’ व्हायचं असेल तर तुम्हाला मुंबईत जन्माला येणं अत्यंत आवश्यक आहे, कारण तुमच्या रहाण्याच्या जागेचा प्रश्न हा तुमच्या जन्मदात्यानीच सोडवायला हवा.” मी हे वाक्य वाचता वाचता विचारात पडलो… ‘अरे, हे तर अगदी माझ्या मनातले शब्द पुलं नी लिहिलेत’. कारण माझा ही जन्म मुबंईचाच की. […]
काही दिवसांपूर्वी गौरी गणपतीसाठी आईकडे गेले होते. या वर्षी, मी गौरीसाठी माहेरी आल्याने आईला खूपच आनंद झाला आणि एरवी ती जे शॉर्टकटमध्ये करत असे ते आता दोघी होतो म्हणून आम्ही दोघींनी मिळून सगळं अगदी साग्रसंगीत केले. आईकडे गौरी येते ती पाणवठ्यावरून. माझी आजी पूर्वी असा कलश नदीवरून भरून आणत असे. […]
साल कुठलं नेमकं आठवत नाही पण उन्हाळ्याच्या सुट्टीत आत्याच्या गावी गेलो होतो.नुकताच नोकरीला लागलो होतो.सकाळच्या अकरा वाजल्या असतील . इकडच्या तिकडच्या गप्पा चालू होत्या रविवारचा दिवस असल्याने डवरी पतर भरण्यासाठी ( वाळलेल्या भोपळ्याचे पात्र,डमरु त्रिशूळ वगैरे घेऊन) भिक्षा मागण्यासाठी आला होता.त्यांच वय बरंच झालं होतं पण तरीही ते घोड्यावरून फिरत असतं.मला नवागत बघून विचारलं. […]